अनेक राज्यात पावसाची हजेरी
अनेक राज्यांमध्ये थंडी पडण्यास सुरुवात
दिवाळी आधी देशातील हवामानात बदल
आजपासून दिवळीला सुरुवात झाली आहे. दरम्यान सणाच्या दिवशी देशती हवामानात देखील अनेक बदल झालेले दिसून येत आहेत. अनेक राज्यांमध्ये पाऊस सुरू आहे. तर कुठे कडक उन्हाळा जाणवत आहे. तर पर्वतीय राज्यांमध्ये थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने आज कोणत्या राज्याला कोणता अलर्ट दिला आहे, त्याबाबत जाणून घेऊयात.
राजधानी दिल्लीत सकाळच्या वेळेस थंड वारे वाहत आहेत. तर दुपारच्या वेळेस कडक उन्हाळा जाणवत आहे. तर रात्री थंडी जाणवत आहे. पुढील काही दिवस राजधानी दिल्लीत हवामान याचप्रमाणे राहण्याची शक्यता आहे. 17 ते 22 ऑक्टोबर दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये हवामान शुष्क राहण्याची शक्यता आहे. दरम्यान सध्या तरी उत्तर प्रदेशमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही.
उत्तराखंडमध्ये थंडी पडण्यास सुरूवात
सध्या पर्वतीय राज्यांमध्ये हवामान मोकळे आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेस हवामान बदलत आहे. उत्तराखंडमध्ये अनेक भागात बर्फवृष्टी सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत उत्तराखंडमध्ये थंडी पडण्याची शक्यता आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये व जम्मू काश्मीर देखील थंडी पडण्यास सुरूवात झाली आहे.
राज्यावर येणार भयानक संकट
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभरात पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसून आले. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे म्हटले जात होते. यंदा मान्सूनच्या कालावधीत महाराष्ट्राने इतर वर्षांच्या तुलनेत पावसाचा वेगळा अनुभव घेतला. मान्सूनचे आगमन वेळेआधी, म्हणजे तब्बल एक महिना लवकर झाले होते. मात्र इतके दवास विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. पुढील काही दिवस राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील काही दिवस राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामानात बदल झाल्याने राज्यात पुन्हा एकदा पावसाचे संकट उभे ठाकले आहे. राज्यात यंदा अतिवृष्टी झाल्याचे पाहायला मिळाले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले पीक निसर्गाने हिरावून नेले. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. मात्र आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आल्याने चिंता वाढली आहे.
Maharashtra Rain Alert: राज्यावर येणार भयानक संकट! छत्री, रेनकोट बाहेर काढा; पुढील तीन दिवस…
कोकण किनारपट्टी, गोवा राज्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात झालेल्या वातावरणीय बदलामुळे राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासाह पावसाची शक्यता आहे. पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्य सरकार आणि प्रशासनाने नागरिकांना काळजीचे आणि सतर्कतेचे आवाहन केले आहे.