महाराष्ट्राला पावसाचा इशारा (फोटो- सोशल मीडिया)
महाराष्ट्राला पुढील काही दिवस पावसाचे संकट
नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
कोकण किनारपट्टीला पाऊस झोडपणार
Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभरात पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसून आले. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे म्हटले जात होते. यंदा मान्सूनच्या कालावधीत महाराष्ट्राने इतर वर्षांच्या तुलनेत पावसाचा वेगळा अनुभव घेतला. मान्सूनचे आगमन वेळेआधी, म्हणजे तब्बल एक महिना लवकर झाले होते. मात्र इतके दवास विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. पुढील काही दिवस राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील काही दिवस राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामानात बदल झाल्याने राज्यात पुन्हा एकदा पावसाचे संकट उभे ठाकले आहे. राज्यात यंदा अतिवृष्टी झाल्याचे पाहायला मिळाले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले पीक निसर्गाने हिरावून नेले. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. मात्र आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आल्याने चिंता वाढली आहे.
कोकण किनारपट्टी, गोवा राज्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात झालेल्या वातावरणीय बदलामुळे राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासाह पावसाची शक्यता आहे. पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्य सरकार आणि प्रशासनाने नागरिकांना काळजीचे आणि सतर्कतेचे आवाहन केले आहे.
राज्यातील काही भागात काल पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. कोकणात चिपळूण शहर आणि अन्य भागात देखील पावसाने हजेरी लावली आहे. तर पुणे शहरात देखील काल संध्याकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली.
यंदाचा पाऊस ठरला अनोखा!
यंदा मान्सूनच्या कालावधीत महाराष्ट्राने इतर वर्षांच्या तुलनेत पावसाचा वेगळा अनुभव घेतला. मान्सूनचे आगमन वेळेआधी, म्हणजे तब्बल एक महिना लवकर झाले. ७ जूनऐवजी ७ मेपासूनच तो धो-धो कोसळू लागला. त्यामुळे पावसाचा कालावधी नेहमीपेक्षा अधिक वाढल्याचे दिसून आले. जवळपास पाच महिने चाललेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे शेती नियोजन विस्कळीत झाले. पावसाच्या दीर्घ सत्रामुळे भात, भाजीपाला, फळबागा आणि हंगामी पिकांना मोठा फटका बसला.
Maharashtra Rain: यंदाचा पाऊस ठरला अनोखा! एक महिना आधी आगमन अन्…; सविस्तर वाचा
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत राज्यात एकूण ९९६.७ मिलिमीटर पाऊस पडला, जो दीर्घकालीन सरासरीच्या सुमारे १०३.६ टक्के इतका आहे. मुसळधार पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले; सुमारे साठ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली.