Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IMD Rain Alert: ‘या’ दिवशी केरळमध्ये धडकणार मान्सून; उष्णतेपासून दिलासा मिळणार

२००५ पासून ‘आयएमडी’कडून केरळमधील मान्सून आगमनाचा अधिकृत अंदाज जाहीर केला जात आहे. गेल्या २१ वर्षांपैकी २०१५ वगळता बहुतांश अंदाज अचूक ठरले असल्याचा दावा विभागाने केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 18, 2026 | 02:35 AM
IMD Rain Alert: ‘या’ दिवशी केरळमध्ये धडकणार मान्सून; उष्णतेपासून दिलासा मिळणार
Follow Us
Close
Follow Us:

मान्सून २६ मे रोजी केरळमध्ये धडकणार –  IMD चा अंदाज 
उष्णतेच्या झळांनी नागरिक झाले हैराण 
मान्सून  नेहमीपेक्षा तब्बल सहा दिवस आधी पोहोचण्याचा अंदाज

सुनयना सोनवणे /पुणे: देशभरात उष्णतेच्या झळांनी नागरिक हैराण झाले असतानाच भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिलासादायक माहिती दिली आहे. यंदा नैऋत्य मान्सून २६ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असून, तो नेहमीपेक्षा तब्बल सहा दिवस आधी पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अंदाजामध्ये चार दिवसांची त्रुटी गृहीत धरण्यात आली आहे. सामान्यतः नैऋत्य मान्सूनचा केरळमधील प्रवेश १ जून रोजी होतो. मात्र, यंदा वातावरणीय स्थिती अनुकूल असल्याने मान्सूनचे आगमन वेळेआधी होण्याचे संकेत मिळत आहेत. सलग दुसऱ्या वर्षी मान्सून केरळमध्ये लवकर दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी मान्सून २४ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता.

सध्या हिंदी महासागराच्या विस्तृत क्षेत्रावर विषुववृत्त ओलांडून येणाऱ्या नैऋत्य मौसमी वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय झाला आहे. त्याचबरोबर नैऋत्य आणि लगतच्या बंगालच्या उपसागरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, त्याच्या प्रभावामुळे अंदमान-निकोबार बेटांसह तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश किनारपट्टी भागांत सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. मान्सून आगमनासाठी आवश्यक असलेले निकष झपाट्याने पूर्ण होत असल्याने दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान-निकोबार बेटांवर शनिवारी मान्सून दाखल होऊन यंदाच्या पावसाळी हंगामाची अधिकृत सुरुवात होणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’ने वर्तवला आहे.

India Rain Alert: मोठे संकट येणार! जून महिन्यातच मान्सूनवर…; प्रशांत महासागराच्या तापमानात वाढ

मान्सून आगमनाचा अंदाज वर्तवण्यासाठी भारतीय हवामान विभागाने अत्याधुनिक स्वदेशी सांख्यिकीय मॉडेल विकसित केले आहे. या मॉडेलमध्ये उत्तर-पश्चिम भारतातील किमान तापमान, दक्षिण द्वीपकल्पातील पूर्वमान्सून पर्जन्य, दक्षिण चीन समुद्रावरील ओएलआर, आग्नेय हिंदी महासागरातील वारे, नैऋत्य पॅसिफिक क्षेत्रातील ओएलआर आणि ईशान्य हिंदी महासागरातील निम्नस्तरीय वारे अशा सहा महत्त्वाच्या घटकांचा विचार केला जातो.

२००५ पासून ‘आयएमडी’कडून केरळमधील मान्सून आगमनाचा अधिकृत अंदाज जाहीर केला जात आहे. गेल्या २१ वर्षांपैकी २०१५ वगळता बहुतांश अंदाज अचूक ठरले असल्याचा दावा विभागाने केला आहे.

Monsoon Update : 25 ते 27 मेदरम्यान केरळमध्ये दाखल होणार मान्सून, पाच राज्यांसाठी दिला ‘हा’ इशारा

केरळमधील मान्सून आगमनाच्या तारखा
(कंसात ‘आयएमडी’ने वर्तवलेली तारीख)
२०२५ — २४ मे (२७ मे)
२०२४ — ३० मे (३१ मे)
२०२३ — ८ जून (४ जून)
२०२२ — २९ मे (२७ मे)
२०२१ — ३ जून (३१ मे)
२०२० — १ जून (५ जून)

Web Title: Imd weather update monsoon enter in kerala 26 may 2026 latest updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • IMD alert of maharashtra
  • Monsoon In Kerala
  • weather updates

संबंधित बातम्या

India Rain Alert: मोठे संकट येणार! जून महिन्यातच मान्सूनवर…; प्रशांत महासागराच्या तापमानात वाढ
1

India Rain Alert: मोठे संकट येणार! जून महिन्यातच मान्सूनवर…; प्रशांत महासागराच्या तापमानात वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.