Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आरबीआयकडून गृहकर्ज आणि कार लोन घेणाऱ्यांसाठी नवीन धोरण; दिलासादायक नवीन नियमावलीची लवकरच अंमलबजावणी

RBI MPC Meet 2024 : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात जरी काही बदल केला नसला तरीही नवीन कर्ज घेणाऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे. गृहकर्ज किंवा कार लोन घेणाऱ्या नवीन ग्राहकांना आता कर्ज प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 08, 2024 | 05:13 PM
आरबीआयकडून गृहकर्ज आणि कार लोन घेणाऱ्यांसाठी नवीन धोरण; दिलासादायक नवीन नियमावलीची लवकरच अंमलबजावणी
Follow Us
Close
Follow Us:

RBI MPC Meet 2024 : आरबीआयकडून घरकर्ज घेणाऱ्यांसाठी दिलासा देण्यात आला आहे. RBI ने 2024 चे पहिले आर्थिक धोरण जारी केलं असून रेपो दरात कोणताही बदल करण्यात आला नाही .फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो दरात शेवटचा बदल करण्यात आला होता. आता गृहकर्ज आणि कार लोन घेणाऱ्यांसाठी रिझर्व्ह बँकेचे पतधोरण (Monetary Policy Committee MPC) जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये कर्ज घेणाऱ्यांसाठी मोठा दिलासा देण्यात आला आहे. या नव्या नियमानुसार, गृहकर्ज किंवा कार लोन घेणाऱ्या नवीन ग्राहकांना कर्ज प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही. आरबीआयने (Reserve Bank of India) रेपो रेट 6.5 टक्के (Repo Rate) इतका कायम ठेवल्याने कर्जाचा ईएमआय (Loan EMI) स्वस्त झालेला नाही. परंतु जे आता नवीन कर्ज घेतील त्यांना कागदपत्रे, प्रक्रिया शुल्क आणि इतर प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. हे त्यांच्या कर्जावरील व्याजात जोडले जाईल.

गुरुवारी चलनविषयक धोरण सादर

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी चलनविषयक धोरण सादर केले. त्यामध्ये हा निर्णय जारी करण्यात आला आहे. आरबीआय दीर्घकाळापासून ग्राहकांसाठी कर्ज आणि त्याच्याशी संबंधित प्रणाली पारदर्शक करण्याचा प्रयत्न करत आहे. मग ते कर्ज वसुलीसाठी नियम बनवणे असो किंवा कर्जावरील व्याज रेपो दराशी जोडणे असो. आता आरबीआयने कर्ज प्रक्रिया शुल्क आणि दस्तऐवजीकरण शुल्काबाबतही असाच निर्णय घेतला आहे.

कर्ज प्रक्रियेसाठीचे शुल्क वेगळे भरावे लागणार नाही
ग्राहक कर्ज घेण्यासाठी जातात तेव्हा त्यांना सुरुवातीला कागदपत्रे, प्रक्रिया आणि इतर शुल्क भरावे लागतात. त्यामुळे त्यांच्या कर्जावर होणारा खर्च अधिक वाढतो. आरबीआयने आता बँकांना त्यांच्या व्याजदरात कर्जावरील इतर शुल्क समाविष्ट करण्यास सांगण्यात आले आहे. जेणेकरून ग्राहकांना कळू शकेल की त्यांना त्यांच्या कर्जावर किती व्याज द्यावे लागेल.

की फॅक्ट्स स्टेटमेंट देणं अनिवार्य
यापुढे आता बँकांना त्यांच्या कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना Key Facts Statements'(KFS) द्यावे लागणार आहे. आरबीआयने हे अनिवार्य केलं आहे. की फॅक्ट्स स्टेटमेंट्समध्ये (KFS) ग्राहकांना सर्व तपशील दिले जातात. यामध्ये कर्ज प्रक्रिया शुल्कापासून ते दस्तऐवजीकरण शुल्कापर्यंत सर्वकाही समाविष्ट आहे. RBI ने सर्व प्रकारच्या किरकोळ कर्जे म्हणजे कार, वाहन, वैयक्तिक कर्ज आणि MSME कर्जासाठी हे अनिवार्य केले आहे.

Web Title: In house loan rbi give big relief for borrowers there is no separate processing fee on new loans nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2024 | 05:13 PM

Topics:  

  • Repo Rate
  • Reserve Bank Of India

संबंधित बातम्या

रेपो दरात कोणताही बदल नाही परंतु RBI ने GDP वाढीचा अंदाज वाढवला, महागाईपासून दिलासा
1

रेपो दरात कोणताही बदल नाही परंतु RBI ने GDP वाढीचा अंदाज वाढवला, महागाईपासून दिलासा

सामान्य माणसाला आणखी एक धक्का! ‘Repo Rate मध्ये कोणताही बदल नाही’…., कर्जाचा EMI कमी होणार नाही, आरबीआयकडून जाहीर
2

सामान्य माणसाला आणखी एक धक्का! ‘Repo Rate मध्ये कोणताही बदल नाही’…., कर्जाचा EMI कमी होणार नाही, आरबीआयकडून जाहीर

सर्वसामान्यांना आता मोठा फटका बसणार; ऑगस्टमध्ये महागाईवाढीचा अंदाज, ‘या’ बाबी ठरणार कारणीभूत
3

सर्वसामान्यांना आता मोठा फटका बसणार; ऑगस्टमध्ये महागाईवाढीचा अंदाज, ‘या’ बाबी ठरणार कारणीभूत

मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देण्याची तयारी! ६ ऑगस्ट रोजी होणार मोठी घोषणा
4

मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देण्याची तयारी! ६ ऑगस्ट रोजी होणार मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.