जम्मू – आत्मनिर्भर भारत होणयाची दिशेन आता देश पाऊल टाकत आहे. दरम्यान, आता ज्या गांज्याला समाज मान्यता नव्हती किंवा नशेयुक्त पदार्थ म्हणून ज्या गांजाकडे पाहिले जायचे. त्याच गांजाचा आता जम्मूत गांजा निर्मितीसाठी मोठा प्रकल्प उभार करण्यात येणार आहे. त्यामुळं आत्मनिर्भर होण्यासाठी भारताची वाटचाल सुरु आहे. दरम्यान, केंद्रीय वैज्ञानिक आणि संशोधन महामंडळ म्हणजे सीएसआयआर (Central Scientific and Research Corporation ie CSIR) आणि भारतीय एकात्मिक औषध सेवा संस्था (Indian Institute of Integrative Medicine Services) यांच्या वतीनं जम्मूत गांजा शेती प्रकल्प उभारण्यात येत आहे. (Independent India! The first project to manufacture drugs from cannabis was set up in Jammu and Kashmir, how is the project)
गांजा शेती प्रकल्पाला केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांची भेट
दरम्यान, आलेल्या गांजा शेती प्रकल्पाला केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्रसिंह यांनी नुकतीच भेट दिली. या पदार्थाचा औषधांमध्ये उपयोग करण्यासंदर्भात संरक्षित वातावरणात ही शेती सुरू असून, त्यातून विविध प्रकारचं संशोधन सरू आहे. या पदार्थाचे औषधांसाठी उपयुक्त असलेले विविध गुणधर्म विकसित करण्यासाठीच्या प्रकल्पालाही जितेंद्रसिंह यांनी भेट दिली.
जम्मू काश्मीरच्या आर्थिक विकासाला चालना…
दुसरीकडे जम्मूत गांजा शेती प्रकल्पामुळं जम्मू काश्मीरच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, असं बोललं जातंय. कारण या प्रकल्पामुळं स्थानिकांना रोजगार मिळेल, पर्यटन वाढेल, दळणवळण, आदीमध्ये वाढ होईल परिणामी जम्मू काश्मीरची अर्थव्यवस्था देखील मजबूत होईल आणि जम्मू काश्मीरच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, असं बोललं जातंय.