India Defense Deal Navy P8i Poseidon Deal Indian Ocean Power
चीनची खैर नाही! भारताच्या ताफ्यात सामील होणार ‘हे’ अत्याधुनिक विमान, हिंद महासागरात गेम बदलणार?
India Defense Deal : जगातील सर्वांत शक्तिशाली आणि अत्यंत घातक अशा पाळत ठेवणाऱ्या विमानांची खरेदी भारत सरकार करणार आहे. यामुळे भारताची समुद्री ताकद वाढणार आहे. भारताच्या या पावलाने चीनची झोप उडाली आहे.
चीनची खैर नाही! भारताच्या ताफ्यात सामील होणार 'हे' अत्याधुनिक विमान, हिंद महासागरात गेम बदलणार? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Follow Us:
Follow Us:
चीनची खैर नाही
भारतीय नौदल ताफ्यात सामील होणार हे अत्याधुनिक विमान
हिंद महासागरात गेम बदलणार?
India Defense Deal : नवी दिल्ली: जगातील सर्वांत शक्तिशाली आणि अत्यंत घातक अशा पाळत ठेवणाऱ्या विमानांची खरेदी करण्याच्या दृष्टीने भारताने हालचाली सुरू केल्या आहेत. भारत सहा नवीन ‘पी-८१ पोसापडन’ विमाने खरेदी करण्याची तयारी करत आहे. या कराराची किमत ३.५ अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे २९,००० कोटी रुपये असणार आहे. यामुळे भारतीय नौदलाची क्षमता अधिक बळकट होणार आहे. यामुळे हिंदी महासागरात भारत सर्वशक्तिशाली बनणार आहे. अमेरिकेशी हा व्यवहार ‘फॉरेन मिलिटरी सेल्सया प्रक्रियेद्वारे पार पडेल. याचा अर्थ हा एक थेट सरकार ते-सरकार व्यवहार असणार आहे. ही अत्यंत सरळ आणि उच्च-स्तरीय मंजुरींची आवश्यकता असलेली प्रक्रिया आहे. या करारासंदर्भातील वाटाघाटी भारत आणि अमेरिका यांच्यात जवळपास वर्षभरापासून सुरू आहेत. आता हा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीसमोर मंजुरासाठी सादर केला जाईल.
२००९ मध्ये भारताने अशाच प्रकारची आठ विमाने २.१ अब्ज डॉलर्सच्या एकूण किमतीत खरेदी केली होती. त्या वेळी एका विमानाची किमत आजच्या किमतीच्या साधारणपणे निम्मी होती. त्या तुलनेत आज या विमानांची किंमत दुप्पट झाली आहे.
तरीही भारत हा करार पूर्ण करण्याच्या दिशेने पुढे वाटचाल करत आहे. याचे कारण काय? याचे कारण की, ‘पी-८१पोसायहन है काही साधेसुचे विमान नाही. हे एक ‘बहुउद्देशीय सागरी पाळत विमान’ असून, ते एकाच वेळी अनेक महत्वपूर्ण मोहिमा पार पाडण्यास सक्षम आहे.
हे विमान समुदातील शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवू शकते, ज्यामध्ये पाणबुड्याचा शोध घेऊन त्यांचा विनाश करणे, शत्रूच्या जहाजांचा मागोवा घेणे आणि ‘इलेक्ट्रॉनिक गुप्तचर माहिती गोळा करणे या बाबींचा समावेश होतो हे विमान अत्याधुनिक रहार प्रणाली, दूर पल्ल्याचे सैन्सर्स आणि पाणबुड्यांचा नाश करणारी शस्त्रास्त्रे यानी सुसज्ज आहे.
सर्वांत विशेष बाब म्हणजे, ही प्रणाली हजारी किलोमीटरच्या अंतरावरून पाळत ठेवण्यास सक्षम आहे.
हिंदी महासागरात चीनचे वाढते प्राबल्य!
गेल्या काही वधांत चीनने हिंदी महासागर क्षेत्रात आपल्या हालचालीमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. चीनची नौदलाची जहाजे आणि अगदी पाणबुडचाही भारताच्या सागरी क्षेत्राच्या अगदी जवळ वारंवार दिसून येत आहेत. या परिस्थितीचा विचार करता, भारताला अशा एका प्रणालीची आवश्यकता आहे जी प्रत्येक लहान-सहान हालचालीवर बारकाईने पाळत ठेवू शकेल. नेमक्या याच ठिकाणी ‘पीएआय (सागरी गस्त विमान) ही प्रणाली अत्यंत निर्णायक आणि गेम चेंजर ठरू शकते.
पी-8I पोसायडनची वैशिष्ट्ये
जाहिरात
जाहिरात
एकूण विमाने : ६
करार मूल्य : अंदाजे २९,००० कोटी
लांबी : ३९.५ मीटर
उंची : १२.८ मीटर
विंगस्पॅन (विस्तार) : ३७.६ मीटर
वजन : सुमारे ८५,८२० किलोग्रॅम
इंजिन :CFM56-7B27
पल्ला : ७,५०० किमी
कमाल उंची : ४१,००० फूट
कमाल वेग : ९०७ किमी/तास
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.