Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-Pakistan Ceasefire: भारताने अमेरिकेची मध्यस्थी स्वीकारली का? युद्धविरामावरून काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना थेट सवाल

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या संपूर्ण भाषणात एकदाही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावर एकही शब्द उच्चारला नाही. आता विरोधी पक्ष या मुद्द्यावरून आक्रमक झाला आहे

  • By anuradha sagar
Updated On: May 13, 2025 | 09:55 AM
India-Pakistan Ceasefire: भारताने अमेरिकेची मध्यस्थी स्वीकारली का? युद्धविरामावरून काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना थेट सवाल
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत काँग्रेस आतापर्यंत भारत सरकारला पाठिंबा दिला आहे. सर्व विरोधी पक्षांनी एकमताने केंद्र सरकारच्या प्रत्येक निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला. त्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविरामाची घोषणाही झाली. युद्धविरामाच्या घोषणेनंतर तीन दिवसांनी म्हणजे सोमवारी  ( १२ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणानंतर या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण सुरू झाले आहे.

पंतप्रधानांच्या भाषणाबाबत काँग्रेसने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या संपूर्ण भाषणात एकदाही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावर एकही शब्द उच्चारला नाही. आता विरोधी पक्ष या मुद्द्यावरून आक्रमक झाला आहे आणि भाजपला धारेवर धरले आहे.

पाकिस्तानकडून अद्यापही कुरापती सुरुच; सांबा जिल्ह्यात दिसले संशयित ड्रोन, सुरक्षा यंत्रणांना समजताच…

पंतप्रधानांना काँग्रेसचा प्रश्न

काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींकडे सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केली आहे.  “भारताने अमेरिकेची मध्यस्थी स्वीकारली आहे का? असा सवाल उपस्थित करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे जयराम रमेश यांनी सोशल मीडिया एक्स वर पोस्ट करत पंंतप्रधान मोदींच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ”

पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून करण्यात येणारे भाषण बऱ्याच काळापासून पुढे ढकलले जात होते. मात्र, अध्यक्ष ट्रम्प यांनी काही मिनिटांपूर्वी केलेल्या घोषणांमुळे ते पूर्णपणे झाकोळले गेले. पंतप्रधानांनी त्यावर एकही शब्द बोललेला नाही.भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीला मान्यता दिली आहे का? भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चर्चा एखाद्या तटस्थ ठिकाणी होण्यास भारत तयार झाला आहे का? आता भारत अमेरिकेच्या या मागण्यांना मान्यता देणार का — जसे की ऑटोमोबाईल, कृषी आणि अन्य क्षेत्रांतील बाजारपेठा उघडणे?

पंतप्रधानांनी तात्काळ सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली पाहिजे — जे त्यांनी मागील वीस दिवसांपासून मुद्दाम टाळले आहे. पुढील महिने सावध कूटनीती आणि सामूहिक निर्धाराची गरज भासवतील. केवळ एखाद-दोन ओळी बोलून या काळातील गंभीर गरजा भागवता येणार नाहीत. आपल्या सशस्त्र सैन्यांना आम्ही निःशर्त सलाम करतो आणि त्यांचा सन्मान करतो. त्यांनी देशाचा गौरव वाढवला आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी १००% आहोत. मात्र पंतप्रधानांनी अजूनही अनेक प्रश्नांची उत्तरे द्यायची बाकी आहेत.

Taliban Bans Chess : तालिबानने अफगाणिस्तानात चक्क बुद्धिबळावर घातली बंदी; बुद्धीबळ महासंघही बरखास्त

अमेरिकेकडून धमकी

दरम्यान पंतप्रधान मोदींच्या भाषणाआधी  काही वेळापूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटलं होतं, “मी दोघांनाही (भारत आणि पाकिस्तान) सांगितलं की हे थांबवा, आणि जर थांबवलं नाही, तर आम्ही व्यापार करणार नाही. त्यानंतर अचानक दोघांनीही सांगितलं की ते थांबत आहेत.  अमेरिकेने व्यापाराच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांवर दबाव टाकून सीमावर्ती गोळीबार थांबवण्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title: India pakistan ceasefire did india accept us mediation congress directly questions prime minister modi on ceasefire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2025 | 09:29 AM

Topics:  

  • Congress
  • Jayram Ramesh
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
1

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल
2

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी
3

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी
4

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.