Operation Sindoor: जय हिंद! भारताने घेतला पहलगामचा बदला; पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांवर Air Strike
नवी दिल्ली: भारताने अखेर पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केली आहे. पहलगाम हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारत सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या हल्ल्याला चोख उत्तर दिले जाईल असे इशारा पाकिस्तानला दिला होता.
Justice is Served.
Jai Hind! pic.twitter.com/Aruatj6OfA
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) May 6, 2025
भारताने मध्यरात्रीच्या सुमारास पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केली आहे. यामध्ये अनेक महत्वाच्या ठिकाणी हल्ला करण्यात आला आहे. इंडियन आर्मी आणि संरक्षण मंत्री यांनी याबाबत पोस्ट करत माहिती दिली आहे.
भारत माता की जय!
— Rajnath Singh (@rajnathsingh) May 6, 2025
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केली आहे. यामध्ये प्रमुख दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे पाकिस्तानची भंबेरी उडाली आहे. पहालगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी देशभरातून मागणी केली जात होती. सरकारने देखील याला चोख प्रत्युत्तर मिळेल असे सांगण्यात आले होते.
या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानच्या लष्करी ठाण्यांना टार्गेट करण्यात आले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दहशतवादी तळांना केवळ संपवणे आणि दहशतवाद उखडून टाकणे हा या स्ट्राईक मागच्या हेतू असल्याचे सांगण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने लाहोर आणि अनेक एअरपोर्ट बंद केले आहेत.
भारतीय सुरक्षा दलांनी केळल्या या हल्ल्यात ब्रम्होस मिसाईलचा वापर केला गेल्याचे म्हटले जात आहे. या हल्यानंतर पाकिस्तानने एलओसीवर जोरदार गोळीबार सुरू केला आहे. तसेच राफेल, सुखोई या लढाऊ विमानांचा वापर केला गेला असल्याचे सांगितले जात आहे. भावलपूरसह अन्य प्रमुख दहशतवाद्यांचे अड्डे असलेल्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. मुजजफराबाद, चकमारू, कोटली, सियालकोट, जैश ए मोहम्मद, हाफिज सईदच्या आणि लष्करच्या तळांवर हल्ला करण्यात आला आहे. या महत्वाच्या ठिकाणी एअर स्ट्राईक करण्यात आले आहे. या स्ट्राईकमध्ये केवळ दहशतवादी तळांना टार्गेट करण्यात आले आहे.
पाकिस्तान या हल्ल्यानंतर बिथरला आहे. सीमेवर सीजफायरचे उल्लंघन करत आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताला युद्धाची धमकी दिली आहे. सियालकोट आणि लाहोर एअरपोर्ट 48 तासांसाठी बंद करण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये इमार्जनसी घोषित करण्यात आली आहे. तर पाकिस्तानने सकाळी 10 वाजता एक महत्वाची बैठक बोलावली आहे.
भारत सरकार आणि सुरक्षा दलांनी पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक करत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारताने अनेक धोरणात्मक निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी केली होती. मात्र लष्करी कारवाई कधी होणार अशी चर्चा सुरू होती. आज देशभरात 244 ठिकाणी मॉकड्रिल करण्यात येणार होते. मात्र ते करण्याआधीच भर्तणे एअर स्ट्राईक करून पहालगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे.