
IndiGo Flight Cancellations:
याचिकाकर्त्याचे वकील लवकरच सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या निवासस्थानी पोहोचतील अशी शक्यता आहे. या प्रकरणावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी एक विशेष खंडपीठ स्थापन करण्यात यावे आणि या प्रकरणाची सुनावणी घ्यावी अशी मागणी करण्यात येणार आहे.
शुक्रवारी, इंडिगोने (Indigo) दिल्ली विमानतळावरून मध्यरात्रीपर्यंत सर्व देशांतर्गत उड्डाणे रद्द केली. एअरलाइनने ही आतापर्यंतची सर्वात गंभीर परिस्थिती असल्याचे म्हटले आहे. इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी एका व्हिडिओ च्या माध्यमातून या परिस्थितीवर भाष्य केलं आहे.५ डिसेंबर रोजी परिस्थिती सर्वात वाईट होती, १,००० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. पण १० ते १५ डिसेंबर दरम्यान वाहतूक पूर्णपणे सामान्य होण्याची अपेक्षा आहे. असे सांगत त्यांनी सर्व प्रवाशांची मााफीही मागितली.
इंडिगोची विमान सेवा कोलमडल्यानंतर प्रवाशांच्या अडचणींना प्रतिसाद म्हणून, रेल्वे आणि स्पाइसजेटने पावले उचलली आहेत. रेल्वेने ३७ गाड्यांमध्ये ११६ अतिरिक्त कोच जोडले आहेत. पुढील काही दिवसांसाठी स्पाइसजेट १०० जास्तीची उड्डाणे घेणार असल्याची माहिती आहे. रेल्वे विभागाकडूनही जास्त मागणी असलेल्या मार्गांवर रेल्वे चालवण्यास मान्यता दिली आहे. यामुळे एकप्रकारे अडकलेल्या प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याशिवाय रेल्वेनेदेखील अतिरिक्त कोच तात्काळ प्रभावाने जोडले जात आहेत. आयआरसीटीसीवर अजूनही जागा उपलब्ध आहेत.(IndiGo)
एअरलाइन्स पायलट्स असोसिएशन ऑफ इंडिया (एएलपीए) ने डीजीसीएच्या या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. सुरक्षा नियमांमधील हलगर्जीपणा धोकादायक उदाहरण निर्माण करू शकतो. देशाच्या हवाई वाहतुकीच इंडिगोचा वाटा ६३% आहे आणि अशा मोठ्या प्रमाणात उड्डाण रद्द झाल्यामुळे हजारो प्रवासी खोळंबले आहेत. या मुद्द्यावरून संसदेतही गदारोळ झाला.
DGCA चा FDTL नवीन नियम सर्वांना लागू, मग Indigo वर सर्वाधिक परिणाम का? जाणून घ्या कारण
केंद्र सरकारने इंडिगो व्यवस्थापनाला प्रवाशांना तात्काळ पैसे परत करण्याचे आणि भविष्यात असे व्यत्यय येऊ नयेत यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. सततच्या गोंधळानंतर, इंडिगोचे विमान वाहतूक हळूहळू सामान्य होत आहे, परंतु पूर्णपणे परत येण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात.