
खबरदार! अमेरिकेवर येणार भयानक संकट; Air India ने रद्द केली सर्व उड्डाणे, नेमके प्रकरण काय?
अमेरीकेमध्ये सुरू आहे बर्फवृष्टी
एअर इंडियाने रद्द केली उड्डाणे
अमेरिकेत मोठे हिमवादळ येण्याचा अंदाज
सध्या भारतात देखील काही राज्यांमध्ये बर्फवृष्टी सुरू झाली आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये हिमवृष्टी सुरू झाली आहे. दरम्यान अमेरिकेत देखील याची सुरुवात झाली असून, येत्या काही दिवसांत अमेरिकेत हिमवादळ येण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर होण्याचा अंदाज आहे. एअर इंडियाने त्याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.
वातावरणीय बदलांमुळे अमेरिकेत बर्फवृष्टी सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत अमेरिकेत हिमवादळ येण्याची शक्यता आहे. याचा परिणाम विमान प्रवासावर परिणाम होणार आहे. भारतातील सर्वात मोठी एअर कंपनी असलेल्या एअर इंडियाने 25 आणि 26 जानेवारी रोजी आपली न्यू जर्सी मधील नेवार्कला जाणाऱ्या आणि तिकडून भारतात येणारी सर्व उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
एअर इंडियाने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. अमेरिकेतील ईस्ट कोस्ट, न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार बर्फवृष्टी होण्याची आणि कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. प्रवासी, क्रू मेंबर्स यांची सुरक्षा, आणि त्यान त्रास होऊ नये यासाठी एअर इंडियाने उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेत येत्या काही दिवसांमध्ये हिमवादळ येण्याची शक्यता आहे. प्रचंड थंडी, जोरदार बर्फवृष्टी होऊ शकते. त्यामुळे कोट्यवधी लोकांचे जीवन प्रभावित होऊ शकते. तसेच एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. केवळ एअर इंडियाच नव्हे तर अन्य आंतरराष्ट्रीय एअरलाइन्स कंपन्यांनी देखील आपली उड्डाणे रद्द केली आहेत.
हवामानात प्रचंड बदल अन् जोरदार बर्फवृष्टी; Vaishno Devi संस्थांनचा मोठा निर्णय; यात्रा स्थगित अन्…
Vaishno Devi संस्थांनचा मोठा निर्णय
उत्तर भारतात काही ठिकाणी बर्फवृष्टी सुरू झाली आहे. जम्मू काश्मीरमधील कटरा आणि आजूबाजूच्या परिसरात पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू झाल्याचे समोर येत आहे. खराब हवामान पाहता श्री माता वैष्णो देवीची यात्रा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात्रा स्थगित करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणांमुळे भाविकांना कटरामध्ये थांबवण्यात आले आहे. सतत पडणारा पाऊस आणि बर्फवृष्टी यामुळे श्री माता वैष्णो देवी संस्थानने हा निर्णय घेतला आहे.
Pune Weather: हा खेळ हवामानाचा ! पुण्यनगरीत पुढील दोन दिवस गारठा…; कसे असणार वातावरण?
भाविकांची सुरक्षा महत्वाची आहे. वातावरणात बदल झाल्यावर श्री माता वैष्णो देवी यात्रा पुन्हा सुरू केली जाणार आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्रिकुट पर्वत आणि देवीच्या मंदिर परिसरात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे या भागाला सुंदर असे रूप प्राप्त झाले आहे. या वातावरणात त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या भाविकांना हा अनुभव एकदम खास असा म्हटलं जात आहे.