Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महागाई भिडली गगनाला; देशाचा किरकोळ महागाई दरही वाढला, आता…

नवीन ग्राहक मूल्य सूचकांकाची नवीन मालिका आणि नवीन 'कंझम्प्शन बास्केट' स्वीकारल्यापासूनचा हा महागाईचा सर्वोच्च स्तर आहे. महागाई वाढीमागील सर्वात मोठे कारण खाण्या-पिण्याच्या वस्तूंचे वाढलेले दर हे आहे, ज्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर झाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 14, 2026 | 09:41 AM
महागाई गगनाला भिडली; ऐन सणासुदीच्या काळात फटका बसणार, खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ

महागाई गगनाला भिडली; ऐन सणासुदीच्या काळात फटका बसणार, खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : स्वयंपाकघरापासून ते तुमच्या खिशापर्यंत, महागाईचा दबाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. सरकारने जारी केलेल्या आकडेवारीने सर्वसामान्य जनतेची चिंता वाढवली आहे. जुलै महिन्यात देशाचा किरकोळ महागाई दर (सीपीआय) वाढून ४.४५% वर पोहोचला आहे, जो याआधीच्या महिन्यात म्हणजेच जूनमध्ये ४.३८% होता. हा आकडा अर्थतज्ज्ञांच्या ४.५०% च्या अंदाजापेक्षा थोडा कमी असला, तरी तो अजूनही भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ४% च्या निश्चित लक्ष्यापेक्षा सलग वरच आहे.

या वर्षात नवीन ग्राहक मूल्य सूचकांकाची नवीन मालिका आणि नवीन ‘कंझम्प्शन बास्केट’ स्वीकारल्यापासूनचा हा महागाईचा सर्वोच्च स्तर आहे. महागाई वाढीमागील सर्वात मोठे कारण खाण्या-पिण्याच्या वस्तूंचे वाढलेले दर हे आहे, ज्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर झाला. अन्न महागाई दर जूनमधील ५.३२% वरून वाढून जुलैमध्ये ५.५२% वर पोहोचला आहे. चिंतेची बाब म्हणजे शहरांपेक्षा ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना याचा फटका जास्त बसला आहे.

नव्या आकडेवारीनुसार, ग्रामीण भागात अन्न महागाई ५.७९% राहिली, तर शहरी भागात ती थोडी कमी म्हणजेच ५.०५% नोंदवली गेली. कांद्याचा महागाई दर जूनमधील ४.७३% वरून थेट उडी मारून जुलैमध्ये २२.५४% वर पोहोचला आहे. लसणाचा महागाई दरही १७.९३% वरून वाढून ३५.३६% झाला आहे.

इतर गरजा, सेवाही महागल्या

वाहतूक महागाई जूनमधील ४.३१% वरून वाढून जुलैमध्ये ४.४३% झाली, तर मालवाहतुकीचे दर ७.७७% वर आले. वैयक्तिक काळजी, सामाजिक सुरक्षा आणि विविध सेवांचा महागाई दर सर्वाधिक १४.७७% वर आहे, ज्यामध्ये इतर वैयक्तिक वस्तूंचे दर ४३.५४% पर्यंत वाढले आहेत. कपडे आणि पादत्राणांमध्ये ३.३८%, शिक्षणात ३.६४%, घराच्या भाड्यात २.२२% आणि आरोग्य क्षेत्रात १.३४% महागाई नोंदवली गेली.

मिडल ईस्टमधील युद्धाचा दिसतोय परिणाम

सध्या मिडल ईस्टमध्ये सुरु असलेला ताण आणखीन वाढत आहे. याचा परिणाम लहानात लहानापासून ते मोठ्यात मोठ्या क्षेत्रावर होत असलेला पाहायला मिळतो. आता भारतातच सर्वाधिक चर्चेत असलेला डाएट कोक महाग होणार आहे.

Share Market Today : गुंतवणूकदारांनो सावध राहा ! घसरणीसह होणार शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी दिले महत्त्वाचे संकेत

Web Title: Inflation has increases know whats exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 09:41 AM

Topics:  

  • Fuel Price Hike
  • Inflation News
  • national news

संबंधित बातम्या

Bank 5 Day Work Week: बँक कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! आता सर्व शनिवारी बँकांना सुट्टी; ५ दिवसांचा आठवडा मंजूर?
1

Bank 5 Day Work Week: बँक कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! आता सर्व शनिवारी बँकांना सुट्टी; ५ दिवसांचा आठवडा मंजूर?

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
2

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

तांदळाच्या दरात पुन्हा वाढले; बासमती तांदळाच्या दरात 15 ते 20 टक्क्यांची वाढ
3

तांदळाच्या दरात पुन्हा वाढले; बासमती तांदळाच्या दरात 15 ते 20 टक्क्यांची वाढ

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi:  आशियाई खेळामध्ये १८ वर्षीय अनाहत सिंगने स्क्वॉशमध्ये रौप्य पदक
4

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi:  आशियाई खेळामध्ये १८ वर्षीय अनाहत सिंगने स्क्वॉशमध्ये रौप्य पदक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.