Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hindu Succession Act: सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! वारसा हक्काची जमीन विकताना बाहेरच्या व्यक्तीआधी भावंडांना द्यावा लागणार

पंजाबच्या कायद्यानुसार दूरचे नातेवाईक, सहमालक किंवा भाडेकरू यांनाही प्रथम खरेदीचा अधिकार मिळू शकतो. मात्र, हिंदू उत्तराधिकार अधिनियमातील कलम २२ अंतर्गत हा अधिकार केवळ क्लास-१ वारसांपुरता मर्यादित आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 17, 2026 | 03:57 PM
Hindu Succession Act: सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! वारसा हक्काची जमीन विकताना बाहेरच्या व्यक्तीआधी भावंडांना द्यावा लागणार
Follow Us
Follow Us:
  • वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता विकताना भावंडांना प्रथम खरेदीचा हक्क असेल
  • महिंदर विरुद्ध पुरण सिंग खटल्यात सुप्रीम कोर्टाचा कौटुंबिक मालमत्तेबाबत दूरगामी निर्णय
  • न्यायमूर्ती संजय करोल आणि एन. कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने महिंदर आणि इतर विरुद्ध पुरण सिंग या खटल्यात हा ऐतिहासिक निकाल
 

Supreme Court Landmark Verdict :  सर्वोच्च न्यायालयाने हिंदू उत्तराधिकार कायद्यासंदर्भात दूरगामी निकाल दिला आहे. वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता विकताना भावंडांना प्रथम खरेदीचा हक्क असेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला जमीन वारसा हक्काने मिळाली असेल आणि त्यांना आपला वाटा बाहेरील व्यक्तीला विकायचा असेल, तर त्यांनी प्रथम आपल्या कुटुंबातील इतर वारसांना ती खरेदी करण्याची संधी दिली पाहिजे. त्यांनी खरेदी करण्यास असमर्थता दर्शवली, तरच ती मालमत्ता तिसऱ्या व्यक्तीला विकली जाऊ शकते.

असे आहे प्रकरण?

न्यायमूर्ती संजय करोल आणि एन. कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने महिंदर आणि इतर विरुद्ध पुरण सिंग या खटल्यात हा ऐतिहासिक निकाल दिला. याचिकाकर्ते आणि प्रतिवादी हे भावंड होते, ज्यांना त्यांच्या वडिलांकडून शेतजमीन वारसा हक्काने मिळाली होती. यापैकी काही वारसांनी मिळून २८ डिसेंबर २०११ रोजी त्यांच्या वाट्याची जमीन कुटुंबाबाहेरील एका महिलेला (पूनम) विकली. कुटुंबातील दुसऱ्या एका सदस्याने या विक्रीला तीव्र विरोध केला.

Supreme Court : तिसरे अपत्य झाल्यास निवडणूक लढवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

हा नियम सह-वारसांनाही लागू होईल

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले की, हा हक्क केवळ वर्ग-१ च्या वारसांपुरता (उदा. मुलगा, मुलगी, पत्नी, आई) मर्यादित आहे, ज्यांना एकाच व्यक्तीकडून मालमत्ता वारसा हक्काने मिळाली आहे.

हिंदू उत्तराधिकार अधिनियमातील कलम २२ हे सर्वसाधारण ‘प्रि-एम्प्शन’चे कायदे नसून, वारसा हक्काशी निगडित विशेष तरतूद आहे. पंजाब प्रि-एम्प्शन कायदा आणि हिंदू उत्तराधिकार अधिनियमातील कलम २२ यामध्ये मूलभूत फरक असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.

पंजाबच्या कायद्यानुसार दूरचे नातेवाईक, सहमालक किंवा भाडेकरू यांनाही प्रथम खरेदीचा अधिकार मिळू शकतो. मात्र, हिंदू उत्तराधिकार अधिनियमातील कलम २२ अंतर्गत हा अधिकार केवळ क्लास-१ वारसांपुरता मर्यादित आहे. यामध्ये मुलगा, मुलगी, पत्नी, आई यांसारख्या वारसांचा समावेश होतो. त्यामुळे पंजाब कायद्यावरील निर्णयाचा आधार घेऊन कलम २२ रद्द करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

POCSO Act Misuse: पालक ‘प्रतिष्ठेसाठी’ फौजदारी गुन्हे दाखल करतात; पॉक्सो कायद्याच्या गैरवापराबाबत सर्वोच्च न्यायालयाची चिंता

योग्य प्रकारे बनविलेला कायदा इतर प्रकरणांतील निरीक्षणांच्या आधारे सहजपणे अवैध ठरविणे योग्य ठरणार नाही. तसे झाल्यास न्यायव्यवस्थेत गोंधळ निर्माण होईल आणि घटनात्मक वैधता तपासण्याच्या स्थापित तत्त्वांनाही धक्का बसेल.

न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंह यांनी स्वतंत्र पण सहमती दर्शविणाऱ्या मतात म्हटले की, कलम २२ अंतर्गत दिलेला प्रथम खरेदीचा अधिकार हा पूर्णपणे वारसा हक्काशी संबंधित आहे. हा अधिकार सहमालक किंवा एकत्रितपणे मालमत्ता खरेदी केलेल्या व्यक्तींना लागू होत नाही. तो केवळ एकाच व्यक्तीकडून वारशाने मालमत्ता मिळालेल्या सह-वारसांमध्येच अस्तित्वात येतो.

 

 

Web Title: Justice sanjay karol n koteshwar singh bench verdict mahinder versus puran singh case updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 03:57 PM

Topics:  

  • Supreme Court

संबंधित बातम्या

Supreme Court : तिसरे अपत्य झाल्यास निवडणूक लढवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
1

Supreme Court : तिसरे अपत्य झाल्यास निवडणूक लढवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

POCSO Act Misuse:पालक ‘प्रतिष्ठेसाठी’ फौजदारी गुन्हे दाखल करतात; पॉक्सो कायद्याच्या गैरवापराबाबत सर्वोच्च न्यायालयाची चिंता
2

POCSO Act Misuse:पालक ‘प्रतिष्ठेसाठी’ फौजदारी गुन्हे दाखल करतात; पॉक्सो कायद्याच्या गैरवापराबाबत सर्वोच्च न्यायालयाची चिंता

…आणि छाती दाबणे म्हणजे बलात्काराचा प्रयत्न नाही; पटना हायकोर्टाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाची तीव्र नाराजी
3

…आणि छाती दाबणे म्हणजे बलात्काराचा प्रयत्न नाही; पटना हायकोर्टाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाची तीव्र नाराजी

Samay Raina: ‘न्यायालयाची दिशाभूल…’, समय रैनाला सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका, ठोठावला भारी दंड; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?
4

Samay Raina: ‘न्यायालयाची दिशाभूल…’, समय रैनाला सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका, ठोठावला भारी दंड; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.