१०० वेळा फोन केला, पण...; दुबईत अडकलेल्या भारतीय पर्यटकाचे हाल; काय आहे सत्य स्थिती?
सध्या दुबई (Dubai) तील भारतीय दूतावासाने आपल्या नागिरकांसाठी मार्गदर्शक तत्वे आणि हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. परंतु एका भारतीय पर्यटकाच्या म्हणण्यानुसार, त्याने १०० वेळा फोन करुनही त्याला कोणतीही मदत मिळाली नसल्याचे त्यानी म्हटले आहे. त्याच्या या पोस्टने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.
जयेश ठक्कर असे या तरुणाचे नाव असून त्याने एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने आपली व्यथा मांडत सांगितले आहे की, त्याला दूतावासाकडून कोणतीही मदत मिळत नाही. त्याने भारतीय दूतावासाने जारी केलेल्या क्रमांकावर १०० वेळा फोन केला आहे परंतु एकाही अधिकाऱ्याने प्रतिसाद दिलेला नाही. तसेच तिकीटांचे दर गगनाला भिडले आहेत. एका तिकीटासाठी ८० हजार ते १ लाख रुपये आकारले जात असल्याचे जयेशने म्हटले आहे. तसेच फ्लाइट्स वारंवार रद्द केले जात असून पैसेही ७२ तासांना परत मिळत असल्याचे सांगितले.
याशिवाय जयशेने सांगितले की, त्याच्यासोबत त्याचे वृद्ध वडिल आहेत. त्याना हृदयविकाराचा आजारा असल्यामुळे जयशेची चिंता वाढली आहे. सोशल मीडियावर सध्या मोफत राहयाल मिळत असल्याच्या अफवाही पसरत आहे. परंतु जयशने अशी कोणतीही सुविधा पर्यटकांना मिळाली नसल्याचे म्हटले आहे. या पोस्टममुळे सध्या भारत सरकाच्या दुबईत अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठीच्या प्रयत्न सुरु असल्याचा विधानांवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.
इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरु झाल्याने याचा विपरित परिणाम हवाई उड्डाणांवर झाला आहे. यामुळे विमान सेवा ठप्प पडली आहे. तसेच आखाती देशांनी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. तसेच दुबई विमानतळही बंद करण्यात आले होते आणि अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. यामुळे विमानतळांवर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली होती. तसेच हजारो भारतीय पर्यटक हे या देशांमध्ये अडकले होते. या सर्वांना सुरक्षित भारतामध्ये परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय पूर्ण प्रयत्न करत आहे. दरम्यान मंगळावारी भारतीयांना घेऊन एक फ्लाईट भारताता आली आहे. आतापर्यंत १६४ भारतीय परतल्याले आहेत. एअर इंडियाने देखील १०० हून अधिक भारतीयांना दुबईतून बाहेर आणले आहे. आज सकाळी देखील ८४ जणांना घेऊन एक फ्लाइट परतली आहे. उर्वरित भारतीयांना मायदेशीर आणण्यासाठी सध्या प्रयत्न सुरु आहेत.
Hi , I am stuck in Dubai for last three days: For those who think we have free, stay and free hotels, unfortunately, they are not giving us anything like that, free stay is only available for the peoples are in Abu Dhabi That’s okay, I can pay the amount , but there is no one… — Jayesh Thakkar (@intradaygeeks) March 4, 2026
US Iran War : इराणला मोठा दणका! भारताच्या दारात विनाशकारी वॉरशिप ‘नेस्तनाबूत’; अमेरिकेने केला गेम?
Ans: मध्यपूर्वेतील इस्रायल-अमेरिका विरुद्ध इराण युद्धामध्ये प्रचंड अस्थिरता पसरली असून इराणने दुबईवर हल्ले केले आहेत. ज्यामुळे अनेक भारतीय पर्यटक दुबईत अडकले आहेत.
Ans: जयेश कठ्ठर नावाच्या व्यक्तीने, दुबईतील दूतावासाला हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करुनही त्याला प्रतिसाद मिळाले नसल्याचा आरोप केला आहे.
Ans: जयेश कठ्ठर या भारतीय पर्यटकाच्या मते दुबईतून परत येण्यासाठी ८० हजारे त १ लाख रुपये मोजावे लागत आहेत. तसेच फ्लाइट्स रद्द झाल्यास ७२ तासांना पैस परत मिळत आहेत.






