Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

19 लोकांच्या मृत्यूनंतर Kolkata Police जागे झाले, व्हीआयपी पास रद्द, मार्गदर्शक सूचना जारी

Kolkata Police : कोलकाता पोलिसांनी दुर्गा पूजा उत्सव समितीसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शनिवारी रात्री दुर्गा पूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर कोलकाता पोलिसांनी या सूचना जारी केल्या आहेत.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 18, 2026 | 06:11 PM
19 लोकांच्या मृत्यूनंतर Kolkata Police जागे झाले, व्हीआयपी पास रद्द, मार्गदर्शक सूचना जारी

19 लोकांच्या मृत्यूनंतर Kolkata Police जागे झाले, व्हीआयपी पास रद्द, मार्गदर्शक सूचना जारी

Follow Us
Follow Us:
  •  दुर्गापूजा मंडपांसाठी व्हीआयपी पास रद्द करण्याची सूचना
  • मंडपातील नियुक्ती आणि प्रवेशमार्ग मोकळे ठेवण्याचे निर्देश
  • आयोजकांसह सात जण ताब्यात 
 

कोलकातामध्ये दुर्गा पूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीत 19 निष्पाप जणांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेच्या एक दिवसानंतर जागे झालेल्या कोलकाता पोलिसांनी ( Kolkata Police) रविवारी दुर्गा पूजा मंडळांसाठी एक मार्गदर्शक सूचना जारी केले आहेत.

या मार्गदर्शक सूचनेत महत्त्वाचा विषय असा की, कोलकातामधील सर्व मंडपांमध्ये देण्यात येणारे व्हीआयपी पास रद्द करण्यात आले आहेत. तसेच मंडपाच्या प्रवेशद्वार आणि बाहेर जाण्याच्या मार्गावर कोणत्याही प्रकारे खाद्य पदार्थांचे स्टॉल नसावे असे नमूद करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्तांच्या सूचना

कोलकाता पोलीस आयुक्त अजय नंद यांनी या संबंधांत कोलकातामधील सर्व पोलीस स्टेशनला या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून पोलीस, सुरक्षा कर्मचारी आणि मंडपाचे अधिकारी यांच्यात सातत्याने संवाद साधण्यासही सांगण्यात आले आहे.
आयुक्त यात म्हणतात की, आतापासून सार्वजनिक घोषणा यंत्रणेचे नियंत्रण पोलिसांच्या हातात असेल. त्याशिवाय मंडपात फक्त स्वयंसेवकच नाही तर कमीत कमी एक पोलीस कॉन्स्टेबल तैनात राहिल. तसेच मंडपांचे प्रवेश व बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा करावा लागेल.

या मार्गदर्शक सूचनेत सांगण्यात आले की, मंडपाच्या आत आणि बाहेर जाण्याच्या मार्गावर योग्य प्रकाश योजना गरजेची आहे. तसेच कोलकाता पोलिसांच्या सर्व निरिक्षकांना मॅनपॅक रेडियो सेट दिले जाईल, ज्याच्या माध्यमातून पूजा समितीसोबत त्यांना संपर्क कायम राखण्यास मदत होणार आहे.

West Bengal वर दुर्गा माता कोपली…! रविवार ठरला ‘अपघातवार’, 5 जणांचा मृत्यू

आतापर्यंत 7 जणांना अटक

पोलिसांनी रविवारी कोलकाताच्या चोरेबागान सार्वजनिक दुर्गा पुजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी आयोजकांसमवेत सात जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेत 19 भाविकांचा मृत्यू झाला होता. उत्तर कोलकाताच्या चोरेबागान सार्वजनिक दुर्गा पूजा उत्सव समितीच्या मंडपात देवीचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी उसळली होती.
यात काही वेळाने चेंगराचेंगरी झाली, ज्यात मोठ्या संख्येने भाविक जखमी झाले. मंडपाचा एक भाग कोसळल्यानंतर भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले व चेंगराचेंगरीचा प्रकार घडला असे सांगण्यात येत आहे.
जखमींना तातडीने कोलकाता मेडिकल कॉलेड आणि रुग्णालयासह इतर दोन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोलकाता मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात जवळपास 17 जणांचा मृत घोषित करण्यात आले असून येथे 25 जणांवर उपचार सुरू आहेत. यातील अनेकांची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. येथे रविवारी आणखीन दोन जखमींचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 19 वर पोहचली आहे.

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; डोंगराळ जिल्हे पेटले, 19 जणांचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोलकातामधील दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी होऊन किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: चोरेबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपातील चेंगराचेंगरीत १९ जणांचा मृत्यू झाला.

  • Que: चेंगराचेंगरीनंतर कोलकाता पोलिसांनी कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले?

    Ans: पोलिसांनी दुर्गापूजा मंडळांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. यामध्ये व्हीआयपी पास रद्द करणे, प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग मोकळे ठेवणे आणि सार्वजनिक घोषणा यंत्रणेवर पोलिसांचे नियंत्रण ठेवणे यांचा समावेश आहे.

  • Que: दुर्गापूजा मंडपांमध्ये सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाणार आहेत?

    Ans: मंडपात किमान एक पोलीस कॉन्स्टेबल तैनात करणे, पुरेशी प्रकाशयोजना ठेवणे, खाद्यपदार्थांचे स्टॉल प्रवेशद्वारांपासून दूर ठेवणे आणि पोलीस व पूजा समित्यांमध्ये समन्वय राखणे अशा उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Kolkata police durga puja stampede 19 dead vip passes cancelled rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 06:11 PM

Topics:  

  • durga pooja
  • Kolkata

संबंधित बातम्या

Gondiya News: गोंदियात ६२१ सर्वजनिक दुर्गामूर्तीची स्थापना! गरबा-दांडियाचा उत्साह; नवरात्रोत्सवासाठी पोलिसांचा बंदोबस्त
1

Gondiya News: गोंदियात ६२१ सर्वजनिक दुर्गामूर्तीची स्थापना! गरबा-दांडियाचा उत्साह; नवरात्रोत्सवासाठी पोलिसांचा बंदोबस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.