Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondiya News: गोंदियात ६२१ सर्वजनिक दुर्गामूर्तीची स्थापना! गरबा-दांडियाचा उत्साह; नवरात्रोत्सवासाठी पोलिसांचा बंदोबस्त

गोंदिया जिल्ह्यात नवरात्रोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम, गरबा-दांडिया आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 621 सार्वजनिक दुर्गामूर्ती, 627 शारदा मूर्तींची स्थापना आणि 43 गरबा आयोजनस्थळांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी व्यापक बंदोबस्त आखला आहे. यात दंगल नियंत्रण पथके, जलद प्रतिसाद पथके आणि होमगार्डचाही समावेश आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 12, 2026 | 03:44 PM
Gondiya News: गोंदियात ६२१ सर्वजनिक दुर्गामूर्तीची स्थापना! गरबा-दांडियाचा उत्साह; नवरात्रोत्सवासाठी पोलिसांचा बंदोबस्त
Follow Us
Follow Us:
  • गोंदिया जिल्ह्यात 621 सार्वजनिक मंडळांनी दुर्गामूर्तीची स्थापना केली असून, नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे.
  • जिल्ह्यात 627 ठिकाणी शारदा मातेची स्थापना होणार असून, 43 ठिकाणी गरबा-दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • नवरात्रोत्सवातील गर्दी आणि सुरक्षेसाठी जिल्ह्यात 2,000 पोलिस अधिकारी-कर्मचारी तैनात राहणार आहेत.

नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून, जिल्हाभरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील ६२१ सार्वजनिक मंडळांनी ढोल-ताशे, टाळ आणि फटाक्यांच्या आतषबाजीत देवीचे स्वागत करून विधिवत पूजा-अर्चा केली आणि दुर्गामूर्तीची स्थापना केली. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवादरम्यान धार्मिक कार्यक्रमांसह गरबा-दांडियाचा उत्साह पाहायला मिळणार आहे. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलिसांकडून व्यापक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यात दुर्गोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गेल्या पंधरवड्यापासून सार्वजनिक मंडळांकडून मंडप उभारणी, सजावट आणि रोषणाईची तयारी सुरू होती. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठाही पूजा साहित्य, विविध रंगांच्या वस्त्रांनी आणि सजावटीच्या साहित्याने सजल्या होत्या. घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला नागरिकांनी खरेदीसाठी बाजारपेठांत गर्दी केली. यंदा जिल्ह्यात ६२१ ठिकाणी सार्वजनिक मंडळांकडून दुर्गामूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच, जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये घटस्थापना करण्यात आली.

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

जिल्ह्यात शारदा मातेचा उत्सवही मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. काही उकाणी दुर्गामूर्तीच्या स्थापनेनंतर तिसऱ्या दिवशी शारदा मातेच्या मूर्तीची स्थापना केली जाते. यंदा जिल्हाभरात ६२७ ठिकाणी शारदा मातेच्या मूतींची स्थापना केली जाणार आहे. जिल्ह्यातील ४३ ठिकाणी गरबा आयोजित केला जाणार आहे. यामध्ये गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ, रामनगरमध्ये ११, रावणवाडीत चार, आमगावमध्ये पाच, गोरेगावमध्ये तीन, सालेकसामध्ये तीन, गंगाझरी, देवरी, अर्जुनी मोरगाव आणि नवेगावबांध येथे प्रत्येकी एक, तर दवनीवाडा परिसरात तीन ठिकाणांचा समावेश आहे.

नवरात्रोत्सवादरम्यान भाविकांची गर्दी लक्षात घेता, अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. जिल्ह्यातील सर्व १६ पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि इतर अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहेत. बंदोबस्तासाठी चार दंगल नियंत्रण पथके, दोन जलद प्रतिसाद पथके, सहा ट्रॅकिंग पथके, एक सी-६० पथक आणि बॉम्बशोधक व निकामी करणारी पथके तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय ३२० पुरुष आणि ४५ महिला होमगार्डही बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. उत्सवादरम्यान एकूण दोन हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात राहणार आहेत.

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

नऊ दिवसांच्या कालावधीत मंडळांकडून धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद वितरणासह रक्तदान शिबिरे, नेत्रतपासणी आणि आरोग्य तपासणीसारखे सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. नवरात्रोत्सवात गरबा आणि दांडियाचेही आकर्षण असते. यंदा जिल्ह्यातील ४३ ठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवसापासूनच काही ठिकाणी गरबा दांडियाला सुरुवात झाली असून, तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ६२७ ठिकाणी शारदा मातेच्या मूर्तीची स्थापना केली जाणार आहे.

Web Title: Gondia navratri durga idols garba police security auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 03:44 PM

Topics:  

  • durga pooja
  • gondiya
  • maharashtra

संबंधित बातम्या

Mhaswad Accident News: म्हसवड–शिंगणापूर मार्गावर अपघाताचा थरार! दोन कारची समोरासमोर धडक, सहा जखमी; धोकादायक वळण पुन्हा चर्चेत
1

Mhaswad Accident News: म्हसवड–शिंगणापूर मार्गावर अपघाताचा थरार! दोन कारची समोरासमोर धडक, सहा जखमी; धोकादायक वळण पुन्हा चर्चेत

Amravati News: कंत्राटदारामुळे स्वच्छता व्यवस्था कोलमडली! कचरा संकलन ठप्प; नागरिकांच्या घरांपुढे कचऱ्याचे ढीग
2

Amravati News: कंत्राटदारामुळे स्वच्छता व्यवस्था कोलमडली! कचरा संकलन ठप्प; नागरिकांच्या घरांपुढे कचऱ्याचे ढीग

दुचाकीवरून जाताना तरुणावर अचानक कत्तीने हल्ला, गेवराईत खळबळ; नेमकं काय घडलं?
3

दुचाकीवरून जाताना तरुणावर अचानक कत्तीने हल्ला, गेवराईत खळबळ; नेमकं काय घडलं?

नेवासे गोळीबार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; आणखी तीन आरोपी जेरबंद; अटकेतील आरोपींची संख्या सहावर
4

नेवासे गोळीबार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; आणखी तीन आरोपी जेरबंद; अटकेतील आरोपींची संख्या सहावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.