NCP Merger News: अजित पवार महायुतीची साथ सोडणार होते; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
मागील काही महिन्यांपासून शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. पण त्याच वेळी,दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाचा कोणताही अधिकृत प्रस्ताव शरद पवार यांच्याकडे आलेला नसल्याची माहिती राष्ट्रवादीतील नेत्यांकडून सांगितली जात आहे.
Kavya Maran Car Collection: सनरायझर्स हैदराबादची मालकीण, काव्या मारनचे कार कलेक्शन पाहून
अजित पवार हयात असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात ज्या बाबींवर चर्चा झाली होती, त्या पुढे कशा न्यायच्या, यावर सध्या चर्चा अडल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीतील काही ज्येष्ठ नेते विलीनीकरणासाठी आग्रही असल्याचे सांगितले जात आहे.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. ही चर्चा तटकरे आणि सुनेत्रा पवार यांच्यात सुमारे दीड तास सुरु होती. अशीही माहिती आहे. या भेटीत दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांवरही चर्चा झाली, असे सांहितले जात आहे. तसेच सुनेत्रा पवार यांच्या भेटीनंतर सुनील तटकरे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासंदर्बात विचारले असता सुनील तटकरे म्हणाले की,‘जशी वेळ येईल, तशा गोष्टी तुम्हाला कळतील,’ असे सूचक विधान सुनेत्रा पवार यांनी केले होते. त्यांनी विलीनीकरणाची शक्यता स्पष्टपणे फेटाळली नसल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
Purva Kaushik: आईच्या हातचा फराळ, मित्रांसोबत
याबाबत बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही धक्कादायक दावा केला आहे सुनेत्रा पवार गटातील 20 ते 22 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असून हे आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या आमदारांचे पक्षातील राजकीय घडामोडींमुळे मन उडाले असून ते पक्षाबाहेर पडण्याच्या विचारात असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असतानाच संजय राऊत यांनी नवा दावा केला आहे. सुनेत्रा पवार गटातील 20 ते 22 आमदार कधीही पक्ष सोडू शकतात. हे आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.
Ans: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी "अजित पवार महायुतीची साथ सोडणार होते," असा मोठा दावा केला आहे.
Ans: नाही, राष्ट्रवादीतील नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप विलीनीकरणाचा कोणताही अधिकृत प्रस्ताव शरद पवार यांच्याकडे आलेला नाही.
Ans: जुन्या चर्चांना पुढे कसे न्यायचे आणि दोन्ही गट एकत्र आल्यास ते नेमके महायुतीत राहणार की इंडिया आघाडीत सहभागी होणार, यावरून राजकीय वर्तुळात मोठा सस्पेन्स आहे.






