
चीनला धक्का? लडाखमधील 28 ठिकाणांची नावे आता भारताच्या अधिकृत नकाशावर; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश
या निर्णयाचा उद्देश अधिकृत नकाशांकन सुव्यवस्थित करणे, अचूक ओळख सुलभ करणे आणि या संवेदनशील सीमावर्ती भागाबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवणे हा आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये, गृह मंत्रालयाने अशाच प्रकारे अरुणाचल प्रदेशातील २७ स्थळे आणि वैशिष्ट्ये घोषित केली होती आणि त्याच ठिकाणांचा नकाशा प्रसिद्ध केला होता. चीनने या निर्णयावर आक्षेप घेतला होता. (फोटो सौजन्य – AI Created)
गोगरा आणि हॉट संप्रग ही प्रमुख सामरिक ठिकाणांपैकी आहेत आणि २०२० मध्ये भारतीय व चिनी सैन्यामध्ये झालेल्या संघर्षादरम्यान येथे चकमक झाली होती. ही ठिकाणे भारतीय गस्तीसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. ५ मे २०२० रोजी पॅगोग सरोवर परिसरात झालेल्या हिंसक संघर्षानंतर पूर्व लडाख सीमेवर भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये तणाव निर्माण झाला.
दोन्ही बाजूनी २०२२ मध्ये सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली. या यादीत अलीशा गिरी (सर्वात उंच शिखर), ब्रांगसा, चापचिगल खिंड, कनिष्क शिखर, करुण पीर पर्वत, कुकसेल, मार्तंड गिरी, पारपिक हिमनदी, स्कामरी हिमनदी, शाचमिरिक खिंड, श्कोरगा खोरे, झोरावर शिखर, देहरा कॅम्पस आणि द्वाक कार्यों यांचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त, झोल्मोरी, कुमारयान पॉईंट, पांगलुंग, रिंचेन झांगपो, शाक्यश्री गिरी, गुरू रिपोचे, शामल लुंगपा (१९५० च्या दशकात गस्त आणि सैन्य तैनातीसाठी वापरला जाणारा मार्ग), यांगपा नदी, मार्फ लोटसावा री, मिलारेपा कांग्री, शिवा री आणि महेश्वर री हे देखील अधिकृत नकाशावर चिन्हांकित केले आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज मोठं आंदोलन; परवानगी नाकारली तरीही…
ही घडामोड अशा वेळी घडली आहे, जेव्हा चीनने अरुणाचल प्रदेश आणि लडाखमधील ठिकाणांना मँडरिन नावे देऊन या भार्गावरील आपला दावा अधिक मजबूत करण्यासाठी आपली ‘नकाशाविषयक आक्रमकता’ वाढवली आहे. चीनचा असा दावा आहे की लडाख आणि अरुणाचल प्रदेश हे तिबेटचा भाग आहेत आणि तो या भारतीय प्रदेशांवर आपला हक्क सांगतो. विश्लेषकांच्या मते, चीनकडून ठिकाणांची नावे बदलण्यामागे मुख्य हेतू इतिहास पुन्हा लिहिणे आणि ज्या भागांना तो वादग्रस्त मानतो, जरी ते प्रत्यक्षात वादग्रस्त नसले तरी, त्या भागांवरील आपला दावा अधिक मजबूत करणे हा आहे.