Lalu Prasad Yadav son Tej Pratap Yadav making a police constable dance viral Video Bihar
पटना : देशभरामध्ये होळी सणाचा मोठा उत्साह दिसून आला. होळी आणि धुलिवंदनाच्या निमित्ताने अनेक नेत्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र पटनामध्ये झालेल्या घटनेमुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. राजकीय वातावरणात काही तुरळक संघर्ष वगळता, उत्सव शांततेत पार पडला. हसनपूर येथील राजद आमदार आणि लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांनीही कार्यकर्त्यांसोबत होळी खेळली. मात्र यावेळी वर्दीमध्ये असणाऱ्या पोलिसांसोबत केलेल्या कृत्यामुळे रोष व्यक्त केला जात आहे.
होळी कार्यक्रमात लालू प्रसाद यांचे चिंरजीव तेज प्रताप यादव हे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी ‘बाबा हरिहरनाथ बाबा हरिहरनाथ सोनपूर में होली खेलें’ हे होळीचे गाणे देखील खास शैलीत गायले. यादरम्यान त्यांनी असे काही करायला सांगितले की त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तेज प्रताप यांच्यावर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
व्हायरल व्हिडिओमध्ये, तेज प्रताप यादव होळीच्या कार्यक्रमादरम्यान त्यांच्या एका मित्रासोबत स्टेजवर बसलेले दिसत आहेत. यादरम्यान, ते मायक्रोफोनद्वारे पोलिस कर्मचाऱ्यांना हाक मारतात आणि त्यांना नाचण्यास सांगतात. यावेळी ते म्हणाला, अरे पोलीस… अरे दीपक, मी आता एक गाणे गाणार आहे, तुला त्यावर नाचावे लागेल. वाईट वाटून घेऊ नकोस, होळी आहे, जर तू नाचला नाहीस तर तुला निलंबित केले जाईल. यानंतर ते गाणे म्हणू लागतात. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वर्दीमध्ये आणि कामामध्ये असणाऱ्या पोलिसाला अशाप्रकारे नाचायला लावल्यामुळे त्यांना ट्रोल केले जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या 30 सेकंदांचा व्हिडिओमुळे जोरदार टीका केली जा आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने त्यांच्या सोशल हँडल एक्सवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.
VIDEO | A policeman was seen dancing on the instruction of RJD leader Tej Pratap Yadav during Holi celebration at his residence in Patna. #tejpratapyadav #Holi #Patna pic.twitter.com/oCIP0kL03r
— Press Trust of India (@PTI_News) March 15, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
लवकरच बिहारमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळाच जोरदार टीका केली जात आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये लोक तेज प्रतापला जोरदार ट्रोल करत आहेत. एका सोशल मीडिया युजरने लिहिले की, जर सत्तेशिवाय ही परिस्थिती असेल तर सत्तेत आल्यानंतर ते काय करतील. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, ड्युटीवर असलेले कॉन्स्टेबल इन्स्पेक्टरला निलंबनाची धमकी देऊन त्यांच्या तालावर नाचवत आहेत.