Budget 2024/प्रथमेश तेलंग : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यंदाचा अर्थसंकल्प हा मोदी सरकारचा 10 वा, तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा 6 वा असेल. यंदाचे वर्ष लोकसभा निवडणुकीचे असल्याने या अर्थसंकल्पाला वेगळेचं महत्व आहे. हा अंतरिक स्वरुपाचा अर्थसंकल्प असेल आणि निवडणुकीनंतर अस्तित्वात येणारे नवे सरकार पूर्ण अर्थसंकल्प मांडेल. तोपर्यंत अतिमहत्वाच्या नियमित बाबींसाठीची मंजुरी मिळवणे, हाच अंतरित अर्थसंकल्पाचा महत्वाचा उद्देश असणार आहे. या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पीय भाषणांनाही महत्व असेल. या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील भाषणांमध्ये काही शब्द जास्तीत जास्त वापरले जाण्याची शक्यता आहे. ते कोणते जाणून घेऊयात.
A : ANNADATA (अन्नदाता) : भारत हा कृषीप्रधान देश समजला जातो. यामुळे राजकारणात आणि प्रशासनात शेती आणि शेतकऱ्याला अनन्यसाधारण महत्व आहे. अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये हमखास शेतकऱ्याचा उल्लेख जास्त होत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी तर नेहमीच शेतकऱ्याचा उल्लेख अन्नदाता करतात. त्यामुळे या अर्थसंकल्पात शेतकरी अर्थात अन्नदाता या शब्दाचा वापर जास्तीत जास्त होण्याची शक्यता आहे.
B : Benefits (फायदे) : सर्व प्रकारच्या आर्थिक कल्याणकारी योजनांचे वर्णन करताना ‘बेनिफिट्स’ या शब्दप्रयोगाचा वापर करण्यामागचे राजकीय महत्व फारच कमी जणांना ठाऊक आहे. सरकारने कोट्यवधी गरजूंना केलेल्या मदतीचे वर्णन कल्याणकारी, सवलती देणार, मदत करणारी, धर्मादाय स्वरुपा३ची योजना, असे केले तर ते त्यांना सक्षम नव्हे, तर अक्षम करणार असेल. त्याचप्रमाणे सरकारने या मदतीचे वर्णन जनतेच्या हक्काची असे केले तर गरजूंना असे वाटू शकते की, गरजूंना मदत करणे हे सरकारचे कामच आहे. त्यामुळे सरकारला पर्याय नाही. हे सरकारसाठी अडचणीचे असेल आणि म्हणून असा कोणताही धोका ते पत्करणार नाहीत. अशा परिस्थितीत कल्याणकारी योजनांसाठी कोणता शब्द योजला जाऊ शकतो? ज्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत आणि त्यांच्या मनोधैर्यावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. किंवा ज्यामुळे कल्याणकाही हा असा पर्याय असेल, जो वापरण्याचा अदिकार सरकारहाती असेल.
असा परिस्थितीत फायदा किंवा फायदे हा असा शब्द आहे, ज्याचा वापर करताना त्याआधी थेट खात्यात जमा, असा शब्दप्रयोग केल्याने त्यात कृतीही दिसते.
C : Cusp of Take Off (कस्प ऑफ टेक- ऑफ) : कोविड काळात अधोगतीने जाणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेने आता स्थित्यंतराच्या टप्प्यातून जात भरारी घेण्याचा टप्पा गाठला आहे. भारतीय अर्थव्यवस्था आता विकासाच्या रनवेवर भरारी घेण्याच्या तयारीत आहे, असे वर्णन सरकारतर्फे केले जाऊ शकते.
D : Development (विकास) : भारत हे लोकशाहीचे उगमस्थान अर्थात मदर ऑफ डेमॉक्रमसी इथपासून ते फादर ऑफ डेमोग्राफी इथपर्यंत डी पासून सुरु होणाऱ्या शब्दांचा वापर होऊ शकतो. परंतू यामध्ये डेव्हलपमेंट अर्थात विकास हा शब्द अग्रस्थानी राहील. काही क्षेत्रांमध्ये विश्वसनीय डेटा उपलब्ध नसणे आणि धोरणात्मक निर्णय घेण्यात येणाऱ्या अडचणी यांचा उल्लेख न होणे हेही तेवढेच साहिजकच असेल.
E : Empowered (सक्षमीकरण) : ई ने सुरु होणाऱ्या शब्दांमध्ये एज्युकेशन म्हणजेच शिक्षण, एम्प्लॉयमेंट म्हणजेच रोजगार अशा शब्दांचा वापर या अर्थसंकल्पीय अधिवेशनात होईलच. त्याचबरोबर सक्षमीकरण या शब्दाचा जास्तीत जास्त वापर होण्याची शक्यता आहे. कारण कोणतेही सरकार केवळ चांगले दिसणारे आकडेच सादर करण्यात धन्यता मानते. त्यामुळे सक्षमीकरणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो.
F : Foreign Exchange (परकीय गंगाजळी) : वित्तीय तूट हा मात्र महत्वाचा कळीचा सकारात्मक मुद्दा असेल. अर्थमंत्र्यांनी बोलायलाच हवा असाच हा मुद्दा आहे. एनडीए सरकारने जीडीपीच्या तीन टक्के एवढे लक्ष्य वित्तीय तुटीसाठी निश्चित केले होते. यंदाच्या वर्षासाठी ती ५.९ टक्क्यांपर्यंत आणणे, असे उद्दिष्ट होते. अर्थात, यामुळे याकडे फारसे लक्ष न देता, सकारात्मक भावना निर्माण करणारे फोरेक्स, फायनान्स कमिशन, फॉरेन इन्व्हेस्टमेंट अशा ‘एफ’पासून सुरू होणाऱ्या इतर शब्दांचा आधार घेतला जाऊ शकतो.
G : Gareeb (गरीब) : पंतप्रधान मोदींनी उल्लेख केलेल्या चार नवजातींपैकी एक असलेल्या गरीब याचा उल्लेख तर होणारच. याच ‘जी’ने सुरुवात होणाऱ्या इतर शब्दांचा उल्लेखही होईल, ते शब्द याप्रमाणे- जीडीपी ग्रोथ, जी-२०, ग्लोबल इन्नोवेटिव्ह इंडेक्स, गिफ्ट सिटी, जीएसटी, गौमाता व गुड गव्हर्नन्स; ज्याचा उल्लेख होणार नाही ते शब्द म्हणजे गंगा किंवा नमामी गंगे मोहीम.
H : Healthcare (आरोग्याची काळजी) : काही दिवसांपूर्वीचा जागतिक भूक निर्देशांक सरकारला अमान्यच आहे. सरकारचे म्हणणे आहे की, त्यांनी तब्बल 800 दशलक्ष नागरिकांना मोफत अन्नधान्य पुरवठा केला आहे. ही संख्या अमेरिका, पाकिस्तान आणि इंडोनेशिया या तीन देशांच्या एकत्रित लोकसंख्येएवढी आहे. तर विरोधकांना वाटते की, सरकारचे हे विधान म्हणजे भुकेच्या संदर्भातील सद्यस्थितीची अप्रत्यक्ष दिलेली कबुलीच आहे. अर्थात, या एचमध्ये अलीकडे हिंदुत्व रेट ऑफ ग्रोथ चाही समावेश झाला आहे. पण, प्राधान्याने हेल्थकेअर हा शब्द वापरला जाईल.
I : ISRO (इस्त्रो) : आयसाठी खूप शब्द आहेत, अगदी इनइक्कॅलिटीपासून ते इन्फ्रास्ट्रक्चर, इन्फ्लेशन(महागाई) सोपी आयकर पद्धती आदी, पण, या सगळ्यांवर मात केली आहे ती यशस्वी ठरलेल्या इस्त्रोने. चांद्रयान-3 चे यश, आदित्य एल-1 चे प्रक्षेपण अशा यशामुळे इस्त्रो शब्दाचा वापर साहाजिकच आहे जास्त होईल.
J : Jan Andolan (जनआंदोलन) : जन-धन, आधार, मोबाईल अशी ही जन त्रयी सरकारची आवडती आहे. कारण, भारतात सुरु असलेल्या डिजीटल क्रांतीची ती प्रतिनिधीत्व करते. त्याशिवाय प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचाही यात समावेश आहे. प्रतिवर्षी 436 रुपयांमध्ये तब्बल दोन लाखांचा विमा यामध्ये मिळतो. पण, चर्चा आहे ती नवीन उद्दिष्टांच्या पूर्तीसाठीच्या नव्या जनआंदोलनाची.
K : Kartavya Kaal (कर्तव्यकाळ) : के या आद्याक्षराने सुरु होणार शब्द हा या सरकारसाठी सर्वाधिक त्रासदायक ठरला आहे. कोविडनंतर सरकार आणि टीकाकार यांच्यामध्ये सातत्याने वाद सुरु आहे. सरकार म्हणतेय की, अर्थव्यवस्थेने व्ही आकारात उसळी घेतली आहे. तर, टीकाकारांच्या म्हणण्यानुसार हा आलेख एल आकारातील आहे. अर्थात, नंतर लक्षात असे आले की, प्रत्यक्षातचील आलेख के आकारात आहे म्हणजेच. जे धनाढ्य आहेत, ते लवकर सावरले आणि जे नाहीत त्यांचा सावरण्याचा झगडा अद्याप सुरुच आहे.
L : Labharthi (लाभार्थी) : भाजपाच्या बाबतीत दर निवडणुकीगणिक त्यांच्या वाढीचे गणित वरच्याच दिशेने जात आहे. त्यामागे कारण म्हणजे लाभार्थी वर्गाची वाढती संख्या. उज्ज्वला योजना ते पीएम आवास योजना किंवा अगदी आरोग्य विमा ते मोफत रेशन या सर्व योजनांचे लाभार्थी हे नवीन मतपेटी ठरले आहेत.
M : Modi ki Guarantee (मोदी की गॅरंटी) : मोदी की गॅरंटी या शब्दावरच अलीकडे भाजपने राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत यश मिळवले आहे. या शब्दाचा वापर अर्थसंकल्पीय अधिवेशनातही होईल. कारण लोकसभा निवडणुकीसाठी हा महत्वाचा शब्द आहे.
Nari Shkati (नारी शक्ती) : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अधिवेशनाच्या सुरुवातीलाच पत्रकारांशी बोलताना नारीशक्तीचा उल्लेख केला आहे. नवीन संसदेतील विशेष अधिवेशनात नारी शक्ती सशक्त करणारे महिला आरक्षण विधेयक आले. तिथपासून ते कर्तव्यपथावर महिलांचे कार्य, अर्थसंकल्पही एक महिलाच मांडणार असा उल्लेख त्यांनी केला. त्यामुळे नारी शक्ती हा शब्द साहाजिकच वापरला जाईल.
O : ODF++ (ओडीएफ++) : ऑक्टोबर २०१९ मध्ये पंतप्रधानांनी ‘उघड्यावरच्या शौचमुक्त’तेची हाक भारतीयांना दिली. एवढेच नव्हे, तर ‘ओडीएफप्लस’ हे उद्दिष्ट ठेवण्यात आले. म्हणजे दिवसाढवळ्या कुणीही उघड्यावर शौच किंवा लघवी करणार नाही. सर्व सार्वजनिक शौचालये ही व्यवस्थित कार्यरत असतील आणि तिथे सुव्यवस्था असेल. सप्टेंबर २०२३ मध्ये देशातील ७५ टक्के गावे ओडीएफ प्लस झाल्याची नोंद कऱण्यात आली. आता ‘ओडीएफ प्लसप्लस’ उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये सांडपाण्याचे संपूर्ण व्यवस्थापन, असा निकष ठेवण्यात आला आहे.
P : Panch Pran (पंचप्राण) : देशाच्या विकासासाठी कार्यरत राहणे, गुलामगिरीची मानसिकता सोडून देणे, आपल्या परंपरांचा अभिमान बाळगणे, भारताच्या एकतेसाठी आयुष्य वाहणे आणि कर्तव्यभावना जागृत करणे हे देशाचे पंचप्राण आहेत. असा उल्लेख गेल्यावर्षी पंतप्रधान मोदींनी केला होता. तब्बल २० वर्षांपूर्वी म्हणजेच २००४ च्या अर्थसंकल्पीय भाषात तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री जयवंत सिंग यांनीही सरकारचा ‘पंच प्राधान्यक्रम’ अधोरेखित केला होता. गरिबी हटवणे आणि रोजगार वाढविणे, दुसरी हरीत क्रांती, पायभूत सुविधा, आर्थिक समावेशीकरण आणि उत्पादन क्षेत्राच्या क्षमतेत मोठी वाढ यांचा त्यात समावेश होता.
Q :QR Code (क्यूआर कोड) : 2016 साली भारतात पहिला क्यूआर कोड वापरण्यात आला. त्यानंतर आतापर्यंत 50 दशलक्षांहून अधिक क्यूआर कोड तयार करुन वापरात आले आहेत. तंत्रज्ञानाची घोडदौड किती वेगात आहे, हे सांगण्यासाठी सरकारतर्फे या शब्दाचा वापर नक्कीच होईल.
R : Ram and Railway (राम आणि रेल्वे) : देशात सगळ्यात जास्त चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे राम मंदिर होय. याचा उल्लेख अर्थसंकल्पीय अधिवेशनातही जास्त केला जाईल. लोकसभेपूर्वी राम मंदिरावरुन चांगलेच राजकारण होत आहे. त्याचबरोबर देशभरात रेल्वेचा विकासही करण्यावर सरकारने भर दिलीय. हे सांगण्यासाठी रेल्वे शब्दही सरकारतर्फे वापरण्यात येईल.
S : Slogans (घोषणा) : एसपासून सुरू होणाऱ्या शब्दांच्या वापरासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. श्रेष्ठ भारत, सॉफ्ट पॉवर, श्रमेव जयते, स्मार्ट शहरे, स्किल इंडिया, स्टार्ट अप इंडिया… यादी खूपच मोठी होईल. नेमकी घोषणा कोणती वापरली जातेय, याकडे लक्ष द्यायला हवे. २०२१ च्या अर्थसंकल्पात सरकारने ‘आत्मनिर्भर भारत’ ही घोषणा दिली होती. आता निवडणुकांच्या उंबरठ्यावर असताना त्या नजरेसमोर ठेवून केली जाणारी एखादी चलनी घोषणा अपेक्षित आहे.
T : Trillion Dollars (ट्रिलीयन डॉलर्स) : भारत 2027 पर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल. 2047 पर्यंत भारताला विकसीत देश व्हायचे आहे. यासाठी भारताच्या जीडीपीच्या संदर्भात सध्या वेगवेगळे आकडे सांगितले जातात. २०४७ पर्यंत भारत पाच ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची (पाच लाख कोटी रुपये) अर्थव्यवस्था खरेच होणार आहे का? माहीत नाही. पण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल तशी घोषणा मात्र केलीदेखील.
U : Urbanisation (नागरीकरण) : मोदी सरकारने नागरिकांना एक वचन दिले होते ते म्हमजे असंघटित क्षेत्र कमी करुन संघटित क्षेत्राची वाढ करणे, त्याचप्रमाणे त्यांचे अर्थव्यवस्थेतील योगदानही वाढवणे. या संदर्भातील घोषणाही अपेक्षित आहे. यात यूपीआयची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची आणि कौतुकास्पद ठरली आहे. या साऱ्यामध्ये महत्वाचे आहे ते नागरीकरण.
V : Viksit Bharat (विकसीत भारत) : वंदे भारत ट्रेनची चर्चा या अर्थसंकल्पीय अधिवेशनात होईल. तिला विकसीत भारताच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. असे म्हणले जाईल. त्यामुळे वंदे भारत तसेच विकसीत भारत हे महत्वाचे शब्दही वापरले जातील.
W : Welfare vs Wealth creation ( कल्याणकारी योजना विरुद्ध संपत्ती निर्माण)
संपत्तीनिर्मिती अधिक होत असली तरी सामान्य व्यक्तीच्या सरासरी वेतनात फारसा फरक पडलेला नाही. संपत्ती निर्माण मोजक्या व्यक्तींच्याच बाबतीत होत आहे; तर उर्वरित कामगारांची क्रयशक्ती सातत्याने कमी होत आहे. त्याशिवाय सरकार कल्याणकारी योजनांवर खर्च करते, त्या वेळेस साहजिकच संपत्ती निर्माणावरचा खर्च कमी होतो.
X : X-change rate (एक्स्चेंज रेट) : भारताला सध्या दोन चिंता सतावत आहेत आणि त्यातील पहिली निर्यातीच्या संदर्भातील आहे. जागतिक पातळीवर अनेक अर्थव्यवस्थांचा आलेख घसरला आहे. अशा परिस्थितीत आपली निर्यात वाढविण्यासाठी किंवा आहे त्याच पातळीवर कायम राखण्यासाठीही खूपच मेहनत घ्यावी लागणार आहे. दुसरी समस्या ही डॉलरच्या तुलनेतील रुपयाच्या मूल्याबाबतची आहे. प्रतिडॉलरसाठी असलेला रुपयाचा दर वाढणारा असल्याने निर्यातदारांना त्याचा फायदा होत असला तरी राजकीयदृष्ट्या हा चिंतेचा विषय आहे.
Y : Yuva (युवा) : भारत हा युवकांचा देश आहे. जगातील सर्वात जास्त युवकांची संख्या भारतात आहे. त्यामुळे राजकीय दृष्टीने युवक हा शब्द आणि घटक महत्वाचा असेल. त्यामुळे युवकांच्या हिताच्या गोष्टींसाठी युवा या शब्दाचा वापर करुन युवकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकार नक्की करेल.
Z : Zero (झिरो) : झिरो बजेट फार्मिंग हा दिर्घकाळ सत्ताधाऱ्यांच्या कौतुकाचा विषय राहिला आहे. त्याचबरोबर आता झिरो वेस्ट आणि झिरो एमिशन यालाही लोकप्रियता लाभते आहे.






