Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG आणि इंधन तुटवड्याची भीती सोडा! ४० देशांकडून पुरवठा सुरू; बुकिंगनंतर अडीच दिवसांत मिळणार सिलेंडर

मध्य पूर्वेतील तणावादरम्यान भारताचा इंधन पुरवठा सुरक्षित असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. एलपीजी सिलेंडर अडीच दिवसांत मिळणार असून ४० देशांतून कच्चे तेल येत आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 11, 2026 | 07:13 PM
गॅसपुरवठ्याच्या नियमांत पुन्हा बदल

गॅसपुरवठ्याच्या नियमांत पुन्हा बदल

Follow Us
Close
Follow Us:

  • LPG आणि इंधन तुटवड्याची भीती सोडा!
  • ४० देशांकडून पुरवठा सुरू
  • बुकिंगनंतर अडीच दिवसांत मिळणार सिलेंडर
मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, भारतात एलपीजी (LPG) आणि कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत निर्माण झालेली चिंता सरकारने दूर केली आहे. भारताची ऊर्जा सुरक्षा पूर्णपणे भक्कम असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे. देशात तेल आणि वायूचा पुरवठा सुरळीत असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

४० देशांकडून पुरवठा; पुरवठ्याची साखळी भक्कम

पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव (मार्केटिंग आणि ऑईल रिफायनरी) सुजाता शर्मा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत देशाच्या इंधन स्थितीचा आढावा मांडला. त्यांनी सांगितले की, “भारत आपल्या गरजेच्या कच्च्या तेलाची आयात केवळ एका क्षेत्रावर अवलंबून न ठेवता सुमारे ४० वेगवेगळ्या देशांतून करत आहे. भारताचा कच्च्या तेलाचा एकूण वापर १८९ दशलक्ष मेट्रिक टन असून रोज सुमारे ५५ लाख बॅरल तेलाची गरज भासते. जागतिक आव्हाने असूनही पुरवठा साखळीत खंड पडलेला नाही. विशेष म्हणजे, नुकतेच कच्च्या तेलाचे दोन मोठे कार्गो भारतासाठी रवाना झाले आहेत.”

VIDEO | Delhi: “No need for panic on LPG booking; normal delivery cycle for domestic household remains 2.5 days”, says Joint Secretary in Ministry of Petroleum and Natural Gas Sujata Sharma.#LPG (Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/WqalC9mkGn — Press Trust of India (@PTI_News) March 11, 2026

LPG गॅस बुकिंग करूनही डिलिव्हरी मिळेना? मग ‘या’ नंबरवर करा तक्रार; Bharat, Indane आणि HP चे अधिकृत हेल्पलाईन नंबर जारी

‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’वर अवलंबित्व कमी

जागतिक राजकारणात संवेदनशील मानल्या जाणाऱ्या ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ वरून होणाऱ्या पुरवठ्याबाबतही सरकारने मोठी माहिती दिली आहे. ऊर्जा सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी भारताने पर्यायी मार्ग विकसित केले आहेत. सध्या भारताचे ७० टक्के कच्चे तेल स्ट्रेट ऑफ होर्मुज व्यतिरिक्त इतर मार्गांनी देशात पोहोचत आहे. यामुळे प्रादेशिक तणावाचा भारताच्या इंधन पुरवठ्यावर किमान परिणाम होत आहे. तसेच, घरगुती वापराची पीएनजी (PNG) आणि वाहनांसाठी लागणाऱ्या सीएनजीचा (CNG) पुरवठा पूर्णपणे सामान्य असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले.

एलपीजी सिलेंडरसाठी ताटकळण्याची गरज नाही

गॅस सिलेंडरच्या डिलिव्हरीबाबत नागरिकांमध्ये असलेल्या संभ्रमावर बोलताना सुजाता शर्मा म्हणाल्या की, “एलपीजी सिलेंडरसाठी पॅनिक बुकिंग करण्याची किंवा घाबरण्याची गरज नाही. बुकिंग केल्यानंतर सरासरी अडीच दिवसांच्या (६० तास) आत सिलेंडरची डिलिव्हरी सुनिश्चित केली जात आहे.” जागतिक परिस्थिती आव्हानात्मक असली तरी भारतातील ऊर्जा पुरवठा स्थिर आणि पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.

होर्मुज क्षेत्रात भारतीय जहाजांची सुरक्षा

सध्या होर्मुज क्षेत्रात भारताची एकूण २८ जहाजे असून त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात आली आहे. यापैकी २४ जहाजे स्ट्रेट ऑफ होर्मुजच्या पश्चिम भागात असून त्यावर ६७७ भारतीय खलाशी तैनात आहेत. तर ४ जहाजे पूर्व भागात असून त्यावर ११ भारतीय खलाशी आहेत. या सर्व जहाजांच्या आणि खलाशांच्या हालचालींवर सरकारचे बारीक लक्ष असून सुरक्षिततेची सर्व खबरदारी घेतली जात आहे.

रेल्वे प्रवाशांच्या जेवणावर गॅस टंचाईचे सावट! स्थानकांवरील स्टॉल्समध्ये आता ‘नो गॅस’; IRCTC ने सुचवला आधुनिक पर्याय

Web Title: Lpg fuel supply india 40 countries gas cylinder delivery update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 07:13 PM

Topics:  

  • Central Governement
  • LPG
  • lpg cylinder

संबंधित बातम्या

Petrol-Diesel Price Hike: बोंबला! पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होणार? सरकारच्या एका विधानाने वाहनधारकांमध्ये खळबळ
1

Petrol-Diesel Price Hike: बोंबला! पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होणार? सरकारच्या एका विधानाने वाहनधारकांमध्ये खळबळ

ED Raid: अबब! ED कडून गेल्या वर्षभरात इतक्या कोटी रुपयांची जप्त; आकडा पाहून व्हाल थक्क…
2

ED Raid: अबब! ED कडून गेल्या वर्षभरात इतक्या कोटी रुपयांची जप्त; आकडा पाहून व्हाल थक्क…

Barrier-Free Toll: टोलच्या रांगेतून कायमची मुक्ती! देशातील पहिला ‘बॅरियर-लेस’ टोल नाका सुरू; जाणून घ्या कशी असेल नवी यंत्रणा
3

Barrier-Free Toll: टोलच्या रांगेतून कायमची मुक्ती! देशातील पहिला ‘बॅरियर-लेस’ टोल नाका सुरू; जाणून घ्या कशी असेल नवी यंत्रणा

LPG 5kg Price: गॅस दरवाढीने सर्वसामान्यांचं  मोडलं कंबरडं! 5 किलोच्या Cylinder च्या किमतीत मोठी वाढ…
4

LPG 5kg Price: गॅस दरवाढीने सर्वसामान्यांचं मोडलं कंबरडं! 5 किलोच्या Cylinder च्या किमतीत मोठी वाढ…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.