आगीच्या ज्वाळांमधून १७ अर्भकांना वाचवलं, स्वत:च्या जुळ्या मुलींना मात्र कायमचं गमावलं; तरुण बापाची मन सुन्न करणारी स्टोरी
उत्तर प्रदेशच्या झाशीमधील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये शुक्रवारी भीषण आग लागली होती. या आगीत १० नवजात मुलांचा होरपळून मृत्यू झाला. तर १७ मुलं होरपळली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही मातांना तर त्यांची मुलं कुठे आहेत याचीही अद्याप माहिती मिळालेली नाही. संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये या घटननेनंचर प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान याच हॉस्पिटलमध्ये एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. हॉस्पिटलमधील इतर मुलांना वाचवणाऱ्या याकूबने स्वत: जुळ्या मुलींना कायमचं गमावलं आहे.
हेल्थ संदर्भातील बातम्या वाचण्यासठी इते क्लिक करा
झाशीमधील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेज उत्तर प्रदेशमधील नावाजलेलं कॉलेज. जवळ ७०० बेड आणि २०० डॉक्टर असलेल्या या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा आहेत. दरम्यान शुक्रवारी या हॉस्पिटलमध्ये एकून ५४ नवजात मुलं दाखलं करण्यात आली होती. रात्री सुमारे 10:30 ते 10:45 च्या दरम्यान ऑक्सीजन कन्संट्रेटरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आग इतकी झपाट्याने पसरली कोणालाही काही करता आलं नाही. फायर अलार्म आणि वॉटर स्प्रिंकलर प्रणाली काम करत नव्हत्या, ज्यामुळे बचाव कार्यात विलंब झाला.
याच दरम्यान हामिरपूरमधील याकूब मंसुरी दाम्पत्याच्या दोन नवजात मुलींनाही हॉस्पिटल दाखल करण्यात आलं होतं. मंसुरी दाम्पत्याने जुळ्या मुलींना जन्म दिला होता. हॉस्पिटलमध्ये आग लागली त्यावेळी याकूबही हॉस्पिटलमध्ये उपस्थित होता. मुलं आगीत अडकल्यामुळे मुलांच्या मातांनी एकच आक्रोश केला होता. किंकाळ्यांनी हॉस्पिटल सुन्न झालं होतं. त्यातच याकूबने आपल्या दोन मुलींना सोडून इतर मुलांच्या मदतीसाठी धाव घेतली. कित्येक मुलांना त्याने आगीच्या ज्वाळांमधून बाहेर काढलं. या दरम्यान त्याच्या दोन मुली आगीत सापडल्या आहेत याचं भान त्याला राहिलं नव्हतं. जेव्हा समजलं त्यावेळी खूप वेळ झाला होता. ज्या १० अर्भकांचा होरपळून मृत्यू झाला त्यात याकूबच्या दोन जुळ्या मुलीही होत्या.
अपघातासंदर्भातील लेटेस्ट बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
याकूब आणि त्याची पत्नी संपूर्ण हॉस्पिटलमध्ये मुलींची शोधात फिरत होते. अखरे त्यांच्या दोन्ही मुलींची ओळख पटली तेव्हा याकूब आणि त्यांच्या पत्नीने एकच आक्रोश केला. जो याकूब इतर मुलांना वाचवून हिरो बनला होता, तो त्याच्या नुकताच जन्मलेल्या दोन मुलींना गमावून बसला होता.
महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेज ५६ जुनं कॉलेज आहे. झाशींचं MLBMC किंवा MLB मेडिकल कॉलेज बुंदेलखंडमधील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयांपैकी एक आहे. मेडिकल कॉलेज बुंदेलखंड विद्यापीठाशी संबंधित आहे. हे रुग्णालयात बुंदेलखंडातील लोकांसाठी वरदान मानलं जातं. १९६८ मध्ये स्थापन झालेलं हे मेडिकल कॉलेज ३८० एकरमध्ये पसरलं आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे देशातील मोठ्या मेडिकल कॉलेजांपैकी एक आहे.