'मी अनुसूचित जातीचा असल्याने...; बागपतच्या BEOचे गंभीर आरोप
Uttar Pradesh: उत्तर प्रदेशात आजही जातीपातीच्या आधारावर गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत असतात. या घटनांमधून अनेकांनी आतापर्यंत जीवही गमावले आहेत. अशातच युपीतील बागपत जिल्ह्यातील बिनौली ब्लॉकमध्ये कार्यरत गट शिक्षण अधिकारी (BEO) ब्रिजमोहन सिंग यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पत्र पाठवून गंभीर आरोप केले आहेत. जिल्हाधिकारी, मुख्य विकास अधिकारी आणि मूलभूत शिक्षण अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात सिंग यांनी काही गंभीर आरोप केले आहे. अनुसूचित जातीचे असल्यामुळे कर्मचारी त्यांच्याशी भेदभाव करत असून आपल्याला अधिकारी म्हणून मानत नाहीत, असा खळबळजनक आरोप केला आहे.
“मी अनुसूचित जातीचा असल्यामुळे माझ्याकडे भेदभावाने पाहिले जाते. कर्मचारी वेळेवर कार्यालयात येत नाहीत, आणि काम सांगितल्यास मनमानी वर्तन करतात. यामुळे मला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.” त्यांनी या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. इतकेच नव्हे तर, बिनौली ब्लॉकमधील तीन कर्मचाऱ्यांनी बीईओ ब्रिजमोहन सिंग यांच्यावर मानसिक छळाचे आरोप केले आहेत. या दोन्ही तक्रारींची गंभीर दखल घेत बागपतचे मूलभूत शिक्षण अधिकारी (BSA) यांनी चौकशी सुरू केली आहे.
IMD Rain Alert: पुन्हा धुमाकूळ! राज्यात पाऊस सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यांमध्ये करणार कहर
ब्रिजमोहन सिंग यांची यापूर्वी छपरौली येथे नियुक्ती होती आणि अवघ्या एका महिन्यापूर्वी त्यांची बदली बिनौली येथे करण्यात आली होती. बिनौली येथील गट शिक्षण अधिकारी (BEO) ब्रिजमोहन सिंग यांनी त्यांच्या कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांवर – ऑफिस असिस्टंट अवध शर्मा, अटेंडंट कृष्ण कुमार आणि एमआयएस कोऑर्डिनेटर गौरव – यांच्यावर शिस्तभंगाचे आरोप केले आहेत. हे तीनही कर्मचाऱी आपल्या कामात रुची घेत नाहीत, वेळेवर उपस्थित राहत नाहीत आणि कार्यालयीन कामकाजात सहकार्य करत नाहीत. हे तिघे कर्मचारी जाणूनबुजून चुकीच्या गोष्टी करत आहेत आणि मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत.” असा आरोपही ब्रिजमोहन सिंग यांनी केला आहे.
Anaya Bangar Video: ‘प्रसिद्ध क्रिकेटपटू मला अश्लील फोटो पाठवायचा’; अनाया बांगरचा धक्कादायक खुलासा!
त्यानंतर, या तिन्ही कर्मचाऱ्यांनी बीईओ ब्रिजमोहन सिंग यांच्यावर प्रतिआरोप करत बीएसए कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. “बीईओ आमच्यावर मानसिक दबाव टाकतात, वारंवार धमकावतात, असभ्य वर्तन करतात आणि परवानगीशिवाय आम्हाला कार्यालयाबाहेर काढून टाकतात.” असही त्यांनी म्हटलं आहे. तसेच, ब्रिजमोहन सिंग यांची बिनौली बीआरसीमध्ये नियुक्ती झाल्यापासून कार्यालयातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. त्यांनी मागणी केली आहे की त्यांना बिनौली येथून मुक्त करून त्यांच्या मूळ शाळेत परत पाठवावे. अशी मागणीही त्यांच्याकडून कऱण्यात आली आहे. दरम्यान, या परस्परविरोधी तक्रारींची गंभीर दखल घेत मूलभूत शिक्षण अधिकारी (BSA) बागपत यांनी चौकशी सुरू केली आहे.