Pahalgam Terror Attack, Pahalgam Terror Attack News
रत्नागिरी: काल टीआरएफ दहशतवादी संघटनेने पहलगाम येथील आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर हल्ला केला. दहशतवादी हे सैन्यदलाच्या गणवेशात आले होते. त्यांनी त्यातही पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला. ओळखपत्रे तपासली. जसे ते पर्यटक मुस्लिम नसल्याचे समजले त्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबारसुरु केला आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर संपूर्णन देशभरात हाय अलर्ट देण्यात आला आहे. कालच्या हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर कोकण किनारपट्टीवर देखील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
पहलगाम Pahalgam Terror Attack येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई, दिल्ली आणि देशातील महत्वाच्या शहरांसह कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट देण्यात आला आहे. महत्वाच्या शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. पुण्यात देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टीवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
किनारपट्टीवर येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी केली जाईल. पोलिसांनी किनारपट्टीवर चेकपोस्ट उभ्या केल्या आहेत. तसेच संशयित हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश दिले जात आहेत. तसेच पर्यटन स्थळांवर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीवर तर हाय अलर्ट देण्यात आला आहे.
मोठ्या शहरांमध्ये सुरक्षा वाढवली
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई, पुणे , दिल्ली , बंगळुरू या मोठ्या शहरात हाय अलर्ट करण्यात आला आहे. गर्दीची ठिकाणे, संवेदनशील ठिकाणी सुरक्षा वाढवण्यावर भर दिला जात आहे. कोणत्याही संशयित हालचाली आल्यास पोलिसांना सांगावे. तसेच नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर बंदची हाक देण्यात आली आहे. अनंतनाग शहरात या बंदला प्रतिसाद मिळाला आहे. जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे.
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू
पोलिस युनिफॉर्ममध्ये आलेल्या दहशतवाद्यांनी तिथे बसलेल्या पर्यटकांना त्यांची नावे विचारली. ते पर्यटक मुस्लिम नसल्याचे समजताच त्यांनी गोळीबार सुरू केला. बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांनी सांगितले की, दहशतवाद्यांच्या एका गटाने मॅगी खाणाऱ्या पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. पर्यटकांना त्यांची नावे विचारून दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
JK Terror Attack: ‘तो मुस्लिम नाहीये, त्याला…’; पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू
दरम्यान या भ्याड हल्ल्यात आतापर्यंत 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे. हा हल्ला होताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तातडीने जम्मू-काश्मीरला रवाना झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांची नावे विचारून त्यांच्यावर गोळीबार केला.