Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhya Pradesh HC : मुस्लिम पुरुषाचा दुसरा विवाह गुन्हा नाही! मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

का मुस्लिम महिलेने आपल्या पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. " २००२ मध्ये विवाह झाल्यानंतर मूल होत नसल्याच्या कारणावरून पतीने तिला मारहाण केली आणि मे २०२२ मध्ये दुसरा विवाह केला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 07, 2026 | 03:35 PM
High Court, Madhya Pradesh, Muslim Personal Law, LegalUpdate, Breaking News, India News

High Court, Madhya Pradesh, Muslim Personal Law, LegalUpdate, Breaking News, India News

Follow Us
Close
Follow Us:
  • मुस्लिम वैयक्तिक कायद्यांतर्गत मुस्लीम पुरुषाला एका पेक्षा जास्त विवाह करण्याची मान्यता
  • कलम ४९४ तेव्हाच लागू होते जेव्हा पहिली पत्नी असताना केलेला दुसरा विवाह कायद्याने ‘अमान्य’ (Void) ठरतो.
  • पतीने मूल होत नसल्याच्या कारणावरून मारहाण करून दुसरा विवाह केल्याचा आरोप महिलेने केला होता. प
 

Madhya Pradesh: मुस्लिम वैयक्तिक कायद्यांतर्गत (Muslim Personal Law) एक पुरुष एकापेक्षा जास्त विवाह करू शकत असल्यामुळे, पहिल्या पत्नीच्या हयातीत दुसरा विवाह करणाऱ्या मुस्लिम पुरुषावर भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ४९४ नुसार गुन्हा चालवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती बी. पी. शर्मा यांच्या खंडपीठाने यासंदर्भातील याचिका अंशतः स्वीकारली आहे.

न्यायालयाचे मुख्य निरीक्षण काय?

बी. पी. शर्मा यांच्या खंडपीठात यासंदर्भातील याचिकेवर नुकतीच सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने काही निरीक्षणे नोंदवली आहेत. कलम ४९४ (द्विपत्नीत्व) तेव्हाच लागू होते जेव्हा पहिली पत्नी हयात असताना केलेला दुसरा विवाह कायद्याने ‘अमान्य’ (Void) ठरतो. मात्र, मुस्लिम वैयक्तिक कायद्यानुसार, एका पुरुषाला एकाच वेळी चार पत्नी ठेवण्याची मुभा आहे. त्यामुळे, केवळ पहिली पत्नी हयात आहे या कारणावरून मुस्लिम पुरुषाचा दुसरा विवाह बेकायदेशीर किंवा अमान्य ठरत नाही. जोपर्यंत दुसरा विवाह अमान्य ठरत नाही, तोपर्यंत कलम ४९४ मधील आवश्यक अटींची पूर्तता होत नाही.

पश्चिम बंगालमध्ये मतदारांवर टांगती तलवार! निवडणुकीच्या तोंडावर 91 लाख लोकांची ओळख गेली पुसल्या

प्रकरणाची पार्श्वभूमी

एका मुस्लिम महिलेने आपल्या पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. ” २००२ मध्ये विवाह झाल्यानंतर मूल होत नसल्याच्या कारणावरून पतीने तिला मारहाण केली आणि मे २०२२ मध्ये दुसरा विवाह केला. तसेच पती तिला परस्पर संमतीने घटस्फोट देण्यासाठी दबाव टाकत होता. या तक्रारीनंतर पतीवर द्विपत्नीत्वासह घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.” असे याचिकाकर्ता महिलेने दावा केला होता.

वकिलांचे युक्तिवाद:

दरम्यान, पतीच्य वकिलांकडून न्यायालयात युक्तीवाद केला. यावेळी पतीचे वकिलांनी, ‘केरळ उच्च न्यायालयाच्या २०१५ मधील निकालाचा हवाला दिला. मुस्लिम पुरुष जोपर्यंत पाचवा विवाह करत नाही, तोपर्यंत त्याच्यावर कलम ४९४ लागू होऊ शकत नाही, कारण शरीयतनुसार चार विवाह वैध आहेत.जोपर्यंत अधिकृत घोषणा (Declaration) केली जात नाही, तोपर्यंत ‘मुस्लिम वैयक्तिक कायदा (शरीयत) ऍप्लिकेशन ऍक्ट, १९३७’ लागू होत नाही.

Keralam Opinion Poll 2026: कोण होणार केरळचा किंगमेकर? जनमत चाचणीत धक्कादायक आकडेवारी समोर

इतर गुन्ह्यांसाठी खटला सुरूच राहणार

उच्च न्यायालयाने पतीवरील द्विपत्नीत्वाचा (Bigamy) आरोप रद्द केला असला तरी, त्याला पूर्ण दिलासा मिळालेला नाही. कलम ४९८-अ (क्रूरता), ३४२, ३२३ आणि ५०६ धमकी आणि हिंसाचारांतर्गत दाखल असलेले इतर गुन्हे कायम राहणार आहेत. या गुन्ह्यांसाठी कनिष्ठ न्यायालयात स्वतंत्रपणे खटला सुरू राहील आणि कायद्यानुसार त्यावर निर्णय घेतला जाईल.

न्यायालयाचा निष्कर्ष

सर्वोच्च न्यायालयाच्या ‘सरला मुद्गल’ आणि ‘खुर्शीद अहमद खान’ या प्रकरणांतील निकालांचा संदर्भ देत उच्च न्यायालयाने म्हटले की, हा खटला सुरू ठेवणे म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग ठरेल. मुस्लिम पर्सनल लॉ बहुविवाहाला मान्यता देत असल्याने, कलम ४९४ अंतर्गत गुन्हा सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले कायदेशीर घटक येथे पूर्ण होत नाहीत.

 

 

 

Web Title: Major ruling on muslim personal law mp high court stays prosecution for bigamy in latest case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • High court
  • madhya pradesh

संबंधित बातम्या

Madhya Pradesh: सामायिक वारशातून प्रगतीची दिशा; मध्य प्रदेशात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी – मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव
1

Madhya Pradesh: सामायिक वारशातून प्रगतीची दिशा; मध्य प्रदेशात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी – मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.