Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Malviya Nagar Fire : दिल्लीत अग्नीतांडव! हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी

Delhi Hauj Rani Hotel Fire Update : राजधानी दिल्लीच्या मालवीय नगर परिसरात हौज रानी भागात एका हॉटेलला भीषण आग लागली. या आगीमुळे २० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतपर्यंत ३५ हून अधिक लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 03, 2026 | 01:45 PM
Delhi Hauj Rani Hotel Fire

Delhi Hauj Rani Hotel Fire

Follow Us
Follow Us:

Delhi Hauj Rani Hotel Fire News Marathi : दिल्लीत एक भयंकर दुर्घटना घडली आहे. दिल्लीतील मालवीय नगर येथे हौज रानी परिसरात एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागली. या दुर्घटनेत २१ जणांचा बळी गेल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे आणि बचाव कार्य सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (०३ जून) सकाळच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. आग एवढी भयानक होती की काही मिनिटांतच संपूर्ण इमारतीला आगीच्या ज्वाळांनी लपेटले होते. यामुळे हॉटेलमध्ये उपस्थित नागरिकांची पळापळ झाली.

ठाण्याच्या गावदेवी मार्केटमध्ये भीषण आग; बचावकार्यात सुरक्षा रक्षकासह अग्निशमन जवानाचा दुर्दैवी मृत्यू

जीववाचवण्यासाठी खिडक्यांमधून मारल्या उड्या

प्रत्यक्षदर्शनींनी सांगितल्यानुसार, आगीच्या ज्वाळा एवढ्या भयंकर होत्या की इमारतीतून धूराचे काळे लोट बाहेर येत होते. इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांची जीव वाचवण्यासाठी धावपळ सुरु झाली होती. बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग न दिसल्याने लोकांनी खिडक्या आणि बाल्कनीतून खाली उड्या मारल्या. तर काही लोकांना या आगीतून सावरण्याची संधीही मिळाली नाही. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.

परदेशी नागरिकही हॉटेलमध्ये उपस्थित

मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये काही परदेशी पर्यटकही उपस्थित होते. या हॉटेलचे नाव फ्लोरिस्ट इन असे असून ही पाच मजली इमारत आहे. या इमातीत जवळपास २५ खोल्या आहेत. दुर्घटनेवेळी ४० हून अधिक लोक हॉटेलमध्ये होते. यामध्ये अधिक करुन परदेशी नागरिक असल्याचे सांगितले जात आहे.

नेमकी कशी लागली आग?

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना आगीच्या दुर्दैवी घटनेची माहिती सकाळी १० च्या सुमारास मिळाली होती. हॉटेलच्या रेस्टॉरंटमधील आचाऱ्याने सांगितले की तो ८ च्या सुमारास इलेक्ट्रिक शेगडी पेटवण्याचा प्रयत्न करत होता. पण अचानक आगीचा भडका उडाला. हॉटेलच्या तळघरातील स्वयंपाक घरात आग आधीच लागली होती. बघता बघता या आगीने संपूर्ण इमारतीला विळख्यात घेतले.

मदत आणि बचाव कार्य सुरुच

सध्या युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु असून आतापर्यंत ३५ हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयता दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आग विझवण्यात आली असून हॉटेलच्या खोलांची तपासणी केली जात आहे. मृतांची ओळख पटवण्याचेही कार्य सुरु आहे.

20 people have lost their lives in the Malviya Nagar fire incident: Delhi Police pic.twitter.com/cbAomtoBuK — IANS (@ians_india) June 3, 2026

Hanwha Explosion : दक्षिण कोरियात भीषण दुर्घटना! संरक्षण कारखान्यातील स्फोटा पाच जणांचा मृत्यू, २ गंभीर जखमी

Web Title: Malviya nagar fire 21 killed in massive hotel blaze in delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • Delhi news
  • fire Accident

संबंधित बातम्या

खेळाडूंच्या स्वप्नांना मिळणार पंख! खेळाडूंना दरमहा मिळणार ‘इतके’ अर्थसहाय्य; दिल्ली सरकारचा निर्णय काय?
1

खेळाडूंच्या स्वप्नांना मिळणार पंख! खेळाडूंना दरमहा मिळणार ‘इतके’ अर्थसहाय्य; दिल्ली सरकारचा निर्णय काय?

China : चीनमध्ये मोठी दुर्घटना! दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या परदेशी जहाजाला लागली आग; 30 हून अधिक जीवितहानीची भीती
2

China : चीनमध्ये मोठी दुर्घटना! दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या परदेशी जहाजाला लागली आग; 30 हून अधिक जीवितहानीची भीती

Philippines Ferry Fire: फिलीपिन्समध्ये समुद्रात मोठी दुर्घटना! ‘MV June Aster’ फेरीला भीषण आग लागून 5  मृत, 87 बेपत्ता, VIDEO
3

Philippines Ferry Fire: फिलीपिन्समध्ये समुद्रात मोठी दुर्घटना! ‘MV June Aster’ फेरीला भीषण आग लागून 5 मृत, 87 बेपत्ता, VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.