Hanwha Explosion : दक्षिण कोरियात भीषण दुर्घटना! संरक्षण कारखान्यातील स्फोटा पाच जणांचा मृत्यू, २ गंभीर जखमी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
हे देखील वाचा : Operation Checkmate : अमेरिकेत अवैध स्थलांतरितांविरोधात कारवाईचा बडगा; ३० भारतीय ट्रक चालक अटकेत
मीडिया रिपोर्टनुसार, मंगळवारी (०२ जून) डेजॉन शहरापासून दक्षिणकडे १४० किलोमीटर अंतरावर असलेल्या इनव्हा एरोस्पेस कारखान्यात हा अपघात घडला. स्फोटानंतर संपूर्ण परिसरात भीषण आग (Fire Accident) लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा तातडीने दाखल झाल्या. काही वेळातच संपूर्ण आगीवर निंयत्रण मिळवण्यात आले.
सध्या या घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे. या भंयकर अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून आणखी दोन गंभीर जखमी आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यानर उपचार सुरु आहेत.
इनव्हा एरोस्पेस कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी काही कर्मचारी साफसफाई करत होते. यावेळी उपकरणांमध्ये रॉकेट इंधनासाठी लागणाऱ्या प्रोपेलंट पावडरचे अत्यंत ज्वलनशील अवशेष घटनास्थळी आढळले. या ज्वलनशील पदार्थांमुळेच स्फोट झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दक्षिण कोरियाच्या डिफेन्स ॲक्विझिषशन प्रोग्राम ॲडमिनिस्ट्रेशनने या अपघातानंतर चौकशीसाठी मदत जाहीर केली आहे. तापस यंत्रणांना संपूर्ण तांत्रिक सहकार्य केले जाईल असे सरकारने म्हटले. यासाठी एका विशेष टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. स्फोटामागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरु आहे.
डेजॉनमधील इनव्हा एरोस्पेस कारखाना दक्षिण कोरियाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या ठिकाणी Chunmoo Multiple Rocket Launcher आणि ‘L-SAM यांसारख्या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची निर्मिती केली जाते. ही क्षेपणास्त्रे लांब पल्ल्याची असून जमिनीवर हवेत मार करण्याची क्षमता ठेवतात. दक्षिण कोरियाच्या सुरक्षेसाठी ही क्षेपणास्त्रे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.
Five workers were killed and two injured in an explosion at Hanwha Aerospace’s rocket propellant factory in Daejeon, South Korea. The blast occurred on a solid rocket fuel production line during what is believed to have been cleaning or maintenance work. It’s the third deadly… pic.twitter.com/VtGJDOUULF — Clash Report (@clashreport) June 1, 2026
हे देखील वाचा : Georgia Crash : काळाने केला घात! अमेरिकेत नवविवाहित जोडप्याच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; नवरदेवाचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी






