Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolkata Case : ‘दोषींना फाशी झालीच पाहिजे, पण निर्दोष व्यक्तीला…’; ममता बॅनर्जी यांचं विधान

कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये जमाव दाखल झाला होता. या रुग्णालयात एका कनिष्ठ डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आला होता. रुग्णालयात घुसलेल्या जमावाने तोडफोडही केली. आता या घटनेवर ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या गदारोळासाठी त्यांनी डाव्या पक्षांना तसेच भाजपला जबाबदार धरले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 16, 2024 | 11:23 AM
दोषींना फाशी झालीच पाहिजे, पण निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता कामा नये - ममता बॅनर्जी

दोषींना फाशी झालीच पाहिजे, पण निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता कामा नये - ममता बॅनर्जी

Follow Us
Close
Follow Us:

कोलकाता : कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील एका महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणानंतर एकच खळबळ उडाली होती. आता हे प्रकरण चांगलंच तापताना दिसत आहे. याच घटनेवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधान केलं आहे. ‘दोषींना फाशी झालीच पाहिजे, पण निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता कामा नये’, असे त्या म्हणाल्या.

हेदेखील वाचा : महाविकास आघाडीचा मेळावा; उद्धव ठाकरेंना मिळणार मोठी जबाबदारी?

कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये जमाव दाखल झाला होता. या रुग्णालयात एका कनिष्ठ डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आला होता. रुग्णालयात घुसलेल्या जमावाने तोडफोडही केली. आता या घटनेवर ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या गदारोळासाठी त्यांनी डाव्या पक्षांना तसेच भाजपला जबाबदार धरले आहे. दुसरीकडे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने रुग्णालयातील अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. याशिवाय पीडितेच्या कुटुंबीयांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत.

या घटनेमागे बाहेरील लोकांचा हात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणार असून, त्यासाठी मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. सीपीआय (एम) आणि भाजपवर निशाणा साधत त्या म्हणाल्या की, ‘एआयचा वापर करून बनावट व्हिडिओ बनवले जात आहेत. आणि ते सोशल मीडियावर पसरवले जात आहेत. त्यामुळे लोकांनी या बनावट व्हिडिओंना बळी पडू नये’ असे आवाहन केले आहे.

डॉक्टरांनी कामावर परतावे

बंगालमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी डावे पक्ष आणि भाजप यांनी हातमिळवणी केल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला आहे. ते लोक निषेधाचा फायदा घेत आहेत. त्यांना शांतता नको आहे. भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रध्वज घेऊन आंदोलनात उतरले होते, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे (डीवायएफआय) झेंडेही दिसत होते.

सीबीआय चौकशी

दरम्यान, सीबीआयच्या पथकाने आरजी कार मेडिकल कॉलेजच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. सीबीआयने रुग्णालयातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. तपास यंत्रणेने पीडितेच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली आहे. त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

हेदेखील वाचा : 2024 मध्ये भारतातील सर्वात धोक्यात असलेल्या प्रजाती कोणत्या? जाणून घ्या 

Web Title: Mamata banerjee talked about kolkata case nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2024 | 11:21 AM

Topics:  

  • crime news
  • Mamata Banerjee

संबंधित बातम्या

Crime News: AI चा असाही गैरवापर! तरूणीला थेट फोटो अश्लील पद्धतीने एडिट करण्याची धमकी दिली अन्…
1

Crime News: AI चा असाही गैरवापर! तरूणीला थेट फोटो अश्लील पद्धतीने एडिट करण्याची धमकी दिली अन्…

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पळवून नेत संबंध प्रस्थापित केले अन्…
2

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पळवून नेत संबंध प्रस्थापित केले अन्…

चप्पलने मारले, संपूर्ण हॉस्टेलमध्ये निर्वस्त्र फिरवले अन्…; कॉलेजच्या विद्यार्थ्यासोबत भयानक Ragging
3

चप्पलने मारले, संपूर्ण हॉस्टेलमध्ये निर्वस्त्र फिरवले अन्…; कॉलेजच्या विद्यार्थ्यासोबत भयानक Ragging

भाच्याच्या पत्नीसोबतच मामाचे प्रेमसंबंध; अनैतिक संबंधात अडथळा ठरल्याने कट रचून काढला काटा
4

भाच्याच्या पत्नीसोबतच मामाचे प्रेमसंबंध; अनैतिक संबंधात अडथळा ठरल्याने कट रचून काढला काटा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.