Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पॅकेटवर साखरेचे प्रमाण छापणे बंधनकारक! संसदीय समितीची केंद्राला शिफारस

पॅकेज्ड अन्नपदार्थांतील साखरेचे प्रमाण ग्राहकांना सहज समजावे यासाठी पाकिटाच्या दर्शनी भागावर स्पष्ट पोषण लेबल लावणे बंधनकारक करण्याची शिफारस संसदीय समितीने केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 29, 2026 | 03:12 PM
पॅकेटवर साखरेचे प्रमाण छापणे बंधनकारक! संसदीय समितीची केंद्राला शिफारस

पॅकेटवर साखरेचे प्रमाण छापणे बंधनकारक! संसदीय समितीची केंद्राला शिफारस

Follow Us
Follow Us:
  • पॅकेटच्या पुढील बाजूस साखरेचे प्रमाण स्पष्ट दर्शवणारे लेबल लावण्याची शिफारस.
  • बालकांच्या खाद्यपदार्थांमधील ‘अॅडेड शुगर’चे प्रमाण ग्रॅममध्ये छापण्यावर भर.
  • जास्त साखरेमुळे लठ्ठपणा, दातांचे आजार आणि इतर आरोग्यधोके वाढत असल्याचा इशारा.
खाद्यपदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण नेमके किती आहे, हे ग्राहकांना खरेदी करतानाच सहज कळावे, यासाठी पाकिटाच्या दर्शनी भागावर पोषणविषयक लेबल लावणे बंधनकारक करावे, अशी महत्त्वपूर्ण शिफारस एका संसदीय समितीने केली आहे. खासदार कनिमोझी करुणानिधी यांच्या अध्यक्षतेखालील ‘ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण’ विषयक स्थायी समितीने हा अहवाल सादर केला आहे. समितीने बालकांसाठी असलेल्या पॅकेज्ड अन्नातील साखरेच्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली आहे. तृणधान्यांवर आधारित अन्नपदार्थांमध्ये किती ‘अॅडेड शुगर’ आहे, हे स्पष्टपणे सांगावे. प्रत्येक सव्हिंगमध्ये साखरेचे प्रमाण ग्रॅममध्ये आणि बालकांच्या दैनंदिन ऊर्जेच्या गरजेनुसार त्याचे टक्केवारीतील प्रमाण पॅकेटवर छापावे, असे समितीने म्हटले आहे.

प्रतिष्ठित क्रिकेट क्लबांच्या किचनमधील धक्कादायक वास्तव; झुरळे, बुरशी अन् एफडीएने केले ५ परवाने निलंबित

सध्याचे नियम अपुरे सध्याच्या नियमांनुसार पाकिटावर

साखरेचे प्रमाण आकड्यांमध्ये लिहिणे बंधनकारक आहे. परंतु, केवळ आकडे पाहून तो पदार्थ आरोग्यासाठी चांगला आहे की नाही, हे सामान्य ग्राहकाला समजत नाही. म्हणूनच, जागतिक आरोग्य संघटना आणि ‘आयसीएमआर’ च्या निकषांनुसार साखरेच्या प्रमाणाचे स्पष्ट वर्गीकरण करणारे सोपे लेबल्स पाकिटाच्या समोरच्या बाजूस लावणे गरजेचे आहे, त्याद्वारे ग्राहक योग्य निर्णय घेऊ शकतील.

गंभीर परिणामांचा इशारा

लहान वयात पॅकेज्ड अन्नातून जास्त प्रमाणात साखर पोटात गेल्याने मुलांच्या आरोग्यावर दीर्घकालीन विपरीत परिणाम होतात. बालपणी जास्त साखर खाल्ल्याने दातांची कीड, लठ्ठपणा, चयापचय क्रियेतील बिघाड आणि जुनाट आजारांचा धोका वाढतो. ‘आयसीएमआर’च्या २०२४ च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दैनंदिन साखरेचा वापर २५ ग्रॅमपर्यंत मर्यादित ठेवला पाहिजे.

Rahul Gandhi: संसदेत राहुल गांधींच्या ‘इडियट’ आणि ‘अंधभक्त’ वक्तव्यावरून गदारोळ; वादग्रस्त शब्द लागले हटवावे

अशा आहेत शिफारशी

दर्शनी भागावर लेबल: पॅकेज्ड अन्नामध्ये साखरेचे प्रमाण जास्त आहे की नाही, हे स्पष्ट करणारे लेबल पाकिटाच्या समोर लावणे बंधनकारक करण्याची शिफारस.
बालकांच्या अन्नावर विशेष लक्ष : बेबी फूड आणि लहान मुलांच्या खाद्यान्नातील ‘अॅडेड शुगर’चे ग्रॅममधील प्रमाण स्पष्ट छापणे आवश्यक.
आरोग्याला धोका : लहान वयात जास्त साखर खाल्ल्याने लठ्ठपणा, दातांचे आजार आणि चयापचयाचे उद्भवत असल्याचे विकार ‘आयसीएमआर’ चे स्पष्टीकरण.
सोपी माहिती ग्राहकाला त्वरित समजेल अशा शास्त्रीय वर्गीकरणाची समितीकडून मागणी.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Mandatory sugar labels on packaged food parliamentary panel recommendation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Sugar

संबंधित बातम्या

Ratnagiri : मंडणगड बसस्थानकाचा कायापालट होणार; मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमीपूजन
1

Ratnagiri : मंडणगड बसस्थानकाचा कायापालट होणार; मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमीपूजन

Travel News : चालत्या ट्रेनमध्ये अलार्म चेन ओढली तर काय होतं? जाणून घ्या नियम आणि दंड
2

Travel News : चालत्या ट्रेनमध्ये अलार्म चेन ओढली तर काय होतं? जाणून घ्या नियम आणि दंड

Jodi Marathi Movie: शेतकरी आणि बैलजोडीच्या नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट पडद्यावर, पोळ्याच्या मुहूर्तावर ‘जोडी’ची घोषणा
3

Jodi Marathi Movie: शेतकरी आणि बैलजोडीच्या नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट पडद्यावर, पोळ्याच्या मुहूर्तावर ‘जोडी’ची घोषणा

‘तुम्हीच आरोपींना फरार होण्याची संधी दिली’;रुग्णालयातील मारहाण प्रकरणी हायकोर्ट संतप्त, पोलिसांच्या दिरंगाईवर हायकोर्टाचे ताशेरे
4

‘तुम्हीच आरोपींना फरार होण्याची संधी दिली’;रुग्णालयातील मारहाण प्रकरणी हायकोर्ट संतप्त, पोलिसांच्या दिरंगाईवर हायकोर्टाचे ताशेरे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.