Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live: 25 जानेवारीला आम्ही दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन करणार – जानकर

Marathi breaking live Marathi Headlines Update 18 Jan 2025: आज 18 जानेवारी 2025 रोजी देश, परदेशात, राज्यस्तरावरील, शासकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी इथे मिळतील.

  • By तेजस भागवत, तेजस भागवत, श्वेता झगडे
Updated On: Jan 18, 2025 | 06:51 PM
Top Marathi News today Live

Top Marathi News today Live

Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking News live Updates : कोलकाता येथील सत्र न्यायालय आज आरजी कार वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणी निकाल देणार आहे. या प्रकरणात आरोपीला मृत्यूदंड देण्याची मागणी सीबीआयने केली आहे. तसेच आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गट स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. महविकास आघाडीतील सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढण्याचा अंदाज आहे. तर अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ला प्रकरणार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी 35 पथके तयार केली आहेत. तर विरोधी पक्षनेते, खासदार राहुल गांधी आज बिहार दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्वामित्व योजनेअंतर्गत, ६५ लाखांपेक्षा जास्त किमतीचे प्रॉपर्टी कार्ड वितरित करणार आहेत.

The liveblog has ended.
  • 18 Jan 2025 05:59 PM (IST)

    18 Jan 2025 05:59 PM (IST)

    अन्यथा आंदोलनाचा सरकारला दिला इशारा

    शक्तीपीठ महामार्गाविरोधात आता खासदार विशाल पाटील यांनी दंड थोपटले आहेत. ज्या पद्धतीने कोल्हापूरला वगळलं तसंच सांगली जिल्ह्यालाही वगळा, अशी मागणी त्यांनी केली आहे. सरकारला ही शेवटची विनंती आहे, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशाराच खासदार विशाल पाटील यांनी सरकारला दिला आहे.

  • 18 Jan 2025 04:19 PM (IST)

    18 Jan 2025 04:19 PM (IST)

    राजन साळवींच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा

    ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी भाजप प्रवेश करणार अशा चर्चांना उत आला होता. याचदरम्यान आता त्यांच्या मागे पुन्हा एकदा एसीबीचा ससेमिरा लागला असून एसीबीने नोटीस बजावली आहे. ही नोटीस साळवी यांचा मुलगा आणि पुतण्या यांच्या बांधकाम व्यवसायातील पार्टनर असलेल्या व्यक्तीला बजावण्यात आली आहे. दिनकर सावंत असे पार्टनरचे नाव असून त्यांना 22 तारिखेला रत्नागिरी येथील एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • 18 Jan 2025 03:15 PM (IST)

    18 Jan 2025 03:15 PM (IST)

    चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा

    चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माला कर्णधार आणि शुभमन गिलला उपकर्णधार...

    Indian Cricket Team for Champions Trophy: Rohit Sharma (C), Virat Kohli, S Gill (VC), S Iyer, KL Rahul, Hardik Pandya, Axar Patel, Washington Sundar, Kuldeep Yadav, Jasprit Bumrah, M Shami, Arshdeep, Y Jaiswal, R Pant and R Jadeja. pic.twitter.com/GBuEWg82rc

    — ANI (@ANI) January 18, 2025

  • 18 Jan 2025 02:49 PM (IST)

    18 Jan 2025 02:49 PM (IST)

    Delhi Assembly Elections : अरविंद केजरीवाल यांचा उमेदवारी अर्ज होणार बाद? दिल्लीच्या राजकारणात आला नवीन ट्वीस्ट

    दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. दिल्लीमध्ये तिरंगी लढत होणार असून सर्व देशभरातून निवडणुकीच्या प्रचाराकडे लक्ष लागले आहे. दिल्लीच्या 70 जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. यासाठी येत्या 5 फेब्रुवारी रोजी मतदान तर 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. केजरीवाल यांचा निवडणुकीचा नामांकन अर्ज रद्द होणार असल्याचे सांगितले जात आहे.

  • 18 Jan 2025 02:48 PM (IST)

    18 Jan 2025 02:48 PM (IST)

    अखेर न्याय मिळाला! आरजी कार बलात्कार-हत्या प्रकरणी आरोपी संजय रॉय दोषी, कोर्टाने दिला निर्णय

    कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि खून प्रकरणावर सत्र न्यायालय आज शनिवारी निकाल दिला. कोलकाता पोलिसांमध्ये नागरी स्वयंसेवक असलेल्या संजय रॉयवर गेल्या वर्षी ९ ऑगस्ट रोजी सरकारी रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये डॉक्टरवरील गुन्हा केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणी कोर्टाने संजय रॉयला दोषी ठरवले आहे.

  • 18 Jan 2025 02:17 PM (IST)

    18 Jan 2025 02:17 PM (IST)

    वाल्मिक कराडचं सोलापुरमध्येही घबाड; धक्कादायक माहिती समोर

    मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे वाल्मिक कराड याचे एक एक कारनामे समोर येत आहेत. वाल्मिक कराड याने मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमवली आहे. कुटुंबियांच्या नावे आणि इतरांच्या नावाने त्याने संपत्ती जमवल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. पुणे शहरातही वाल्मिक कराड याने मोठ्या प्रमाणावर संपत्तीची खरेदी केल्याचा आरोप होत आहे. वाल्मीक कराडकडे कोट्यवधींची संपत्ती असून त्याने आपल्या पत्नी, मुलं आणि नातेवाईकांच्या नावावर ही संपत्ती ठेवल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांने विदेशात देखील गुंतवणूक केल्याची माहिती समोर येत आहे.

  • 18 Jan 2025 01:34 PM (IST)

    18 Jan 2025 01:34 PM (IST)

    Pune News: '... तर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार'; उपायुक्तांचा इशारा

    नदीपात्र, नाले आणि रस्त्यांच्या कडेला राडाराेडा टाकला गेला तर संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी यांना जबाबदार धरण्यात येणार आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे, अशी माहीती घन कचरा विभागाचे  उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.  शहरातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. रात्री अंधाराचा फायदा घेत सर्रासपणे नदीपात्र, नाले, तसेच रस्त्यांच्या कडेला राडारोडा टाकण्याचे प्रकार समोर आले आहेत.

  • 18 Jan 2025 01:08 PM (IST)

    18 Jan 2025 01:08 PM (IST)

    Kho-Kho: महाराष्ट्राचा ओजस सुपुत्र बनला ऑस्ट्रेलियन खो -खो संघाचा कर्णधार; विश्वचषक स्पर्धेत करणार नेतृत्व

    लहानपणापासूनच वडीलांकडून खो -खो  खेळाचे धडे शिकलेल्या आणि मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीचा आणि सध्या  ऑस्ट्रेलियात अंतराळ संशोधक म्हणून काम पाहणाऱ्या ओजस किरण कुलकर्णी हा ऑस्ट्रेलियात पार पडणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया खो खो संघाचा कर्णधार म्हणून खेळणार आहे. लहानपणापासूनच खो-खो ची भुरळ असलेल्या ओजसने वर्ड कप खो -खो चे सामने होणार असल्याचे समजतात ऑस्ट्रेलियातील तीन शहरातील खेळाडूंना एकत्र केले. त्यांना खो-खो खेळ आणि त्याबाबतचे प्रशिक्षण दिले आणि त्याची एकूण मेहनत आणि खेळातील गुणवत्ता पाहून ऑस्ट्रेलिया खो-खो असोसिएशनने त्याची ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून निवड केली.

  • 18 Jan 2025 12:45 PM (IST)

    18 Jan 2025 12:45 PM (IST)

    Saif Ali Khan: सैफवरील हल्ल्याप्रकरणी पत्नी करीना कपूरचा मोठा खुलासा; पोलिसांनी वांद्रे सीसीटीव्ही फुटेज घेतले ताब्यात!

    आज सैफ अली खानवरील हल्ल्याच्या प्रकरणात त्याची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूरचा जबाब नोंदवण्यात आला आहे. या घटनेबाबत करीना कपूरने वांद्रे पोलिसांसमोर तिचे म्हणणे मांडले आहे. याशिवाय पोलिसांनी वांद्रे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत ३० हून अधिक लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. अभिनेत्रीने या प्रकरणी काय सांगितले आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत.

  • 18 Jan 2025 12:22 PM (IST)

    18 Jan 2025 12:22 PM (IST)

    'दिल्लीतील भाडेकरूंनाही मोफत वीज आणि पाणी दिले जाईल', अरविंद केजरीवाल यांचे आणखी एक मोठे आश्वासन

    आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आणखी एक मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, दिल्लीतील भाडेकरूंना मोफत वीज आणि मोफत पाण्याचे फायदे मिळत नाहीत. निवडणुकीनंतर, जेव्हा आमचे सरकार स्थापन होईल, तेव्हा आम्ही एक योजना आणू ज्या अंतर्गत भाडेकरूंना मोफत वीज आणि मोफत पाणी मिळेल.

  • 18 Jan 2025 12:05 PM (IST)

    18 Jan 2025 12:05 PM (IST)

    SSC-HSC Hall Ticket : दहावी बारावी विद्यार्थ्यांच्या हॉलतिकीटवर जातीचा उल्लेख, शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय ?

    येत्या फेब्रुवारीपासून दहावी आणि बारावीच्या परिक्षेला सुरुवात होणार आहे. परिक्षेला काही दिवस बाकी असताना आता शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या हॉलतिकीटवर जातीचा उल्लेख असणार असल्याचं सांगितलं आहे. शिक्षण मंडळाची याबाबत नेमकी भूमिका काय आहे हे जाणून घेऊयात…शिक्षणाने समाजातील जातीयभेद नष्ट होतात मात्र आाता चक्क दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हॉलतिकीटवर चक्क मुलं कोणत्या जातीचे आहेत याचा उल्लेख असणार आहे. शिक्षण मंडळाच्या या निर्णयाने पालक आणि विद्य़ार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम पाहायला मिळत आहे.

  • 18 Jan 2025 11:47 AM (IST)

    18 Jan 2025 11:47 AM (IST)

    शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आता सरकारने वाढवली सोयाबीन विकण्याची डेडलाईन, शेतकऱ्यांना होणार फायदा

    केंद्र सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये सोयाबीन खरेदीची अंतिम मुदत सरकारने वाढवली आहे. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, राज्य सरकारांच्या विनंतीवरून केंद्राने महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीची अंतिम मुदत ३१ जानेवारी आणि राजस्थानमध्ये ४ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी महाराष्ट्रासाठी १२ जानेवारी आणि राजस्थानसाठी १५ जानेवारी ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती.

  • 18 Jan 2025 11:01 AM (IST)

    18 Jan 2025 11:01 AM (IST)

    “मुख्यमंत्र्यांना धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून कोण अडवत आहे''? आदित्य ठाकरेंचा सवाल

    बीडमधील हत्येच्या घटनेमुळे राज्यामध्ये वातावरण तापले आहे. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. या प्रकरणामध्ये आरोपी म्हणून वाल्मिक कराड याचे नाव पुढे येत आहे. सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मिक कराडसोबत संबंध असल्यामुळे अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील राजीनाम्याची टांगती तलवार आहे. विरोधकांसह सत्ताधारी नेते देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आहे. याबाबत ठाकरे गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार घणाघात केला आहे.

  • 18 Jan 2025 10:47 AM (IST)

    18 Jan 2025 10:47 AM (IST)

    सैफ अली खान प्रकरण: आतापर्यंत ३० जणांचे जबाब नोंदवले

    सैफ अली खान प्रकरणाबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांनी आतापर्यंत ३० जणांचे जबाब नोंदवले आहेत. मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखा संशयितांची चौकशी करत आहेत. फॉरेन्सिक टीम संशयितांच्या बोटांच्या ठशांची तपासणी करत आहे.

  • 18 Jan 2025 10:44 AM (IST)

    18 Jan 2025 10:44 AM (IST)

    महाबळेश्वर-पाचगणीमध्ये पर्यटन थंडावले; 2024 मध्ये पर्यटकांची संख्या थेट निम्म्यावर

    महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर-पाचगणीची ओळख असून वर्षाकाठी महाबळेश्वरला १८ ते २० लाख पर्यटक भेटी देत असतात. ही संख्या हळूहळू रोडावत असून अवघ्या साडेआठ लाखांवर यावर्षी ही संख्या आली आहे. पर्यटकांची पसंती ही कोकणाकडील पर्यटन स्थळांना वाढू लागल्याने ही संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. दरवर्षी उन्हाळी पावसाळी हंगामांसह दिवाळीच्या सुट्टीत महाबळेश्वर -पाचगणी पर्यटकांनी बहरलेले पाहायला मिळते. नगरपरिषदेकडील नोंदणी नुसार कोरोना प्रादुर्भावापूर्वी (२०२० पर्यंत) येथे १८ ते २० लाख पर्यटक येत होते. पुढील दोन वर्षात पर्यटनावर मर्यादा होत्या. कोरोना पश्चात २०२३ मध्ये महाबळेश्वरला १६ लाख २४ हजार २१७ पर्यटकांनी भेटी दिल्या. पूर्वीच्या तुलनेत ही घट चार लाखांची होती. नुकत्याच संपलेल्या २०२४ मध्ये आणखी घट होत हा आकडा ८ लाख ४८ हजार ५५५ वर आला आहे.

  • 18 Jan 2025 10:14 AM (IST)

    18 Jan 2025 10:14 AM (IST)

    Walmik Karad: जेल की बेल? सरपंच हत्या प्रकरणात कराडच्या जामीनावर सुनावणी; CID चे कोर्टात आव्हान

    बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण चांगलेच तापले आहे. या हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी करत आहे. या प्रकरणातील आरोपीना अटक करण्यात आली आहे. मात्र अजूनही कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणीतील आरोपी वाल्मीक कराडला देखील एसआयटी कोठडी सुनावली आहे. दरम्यान वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावर आज कोर्टात सुनावणी होणार आहे.

  • 18 Jan 2025 09:21 AM (IST)

    18 Jan 2025 09:21 AM (IST)

    दरवाजात बसवलेल्या Smart Lock चा पासवर्ड विसरलात अथवा ॲक्सेस कार्ड हरवला आहे का? या तीन ट्रिक्स येतील कामी

    आजकाल, आपले घर चोरांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी स्मार्ट डोअर लॉक बसवणे सामान्य झाले आहे. हे स्मार्ट डोअर लॉक पासवर्ड प्रोटेक्टेड आहेत आणि विना ॲक्सेस कार्ड किंवा पासवर्डशिवाय ते उघडता येत नाहीत. वाढते क्राइम्स बघता आजकाल अनेकजण आपल्या घरात असे स्मार्ट लॉक बसवत आहेत. मात्र अनेकदा असे होते की कामाच्या गडबडीत आपण बऱ्याचदा पासवर्ड विसरतो किंवा याचा जर तुम्ही चुकून स्मार्ट लॉक पासवर्ड विसरलात आणि तुमच्याकडे प्रवेश कार्ड नसेल किंवा ते हरवले असेल तर हे दरवाजे कसे उघडायचे याचा ॲक्सेस कार्ड कुठेतरी विसरून जाते.

    अशा वेळेस आता घरात प्रवेश कसा करायचा हा प्रश्न आपल्या मनात येतो. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, अशा परिस्थितीत आता चिंता करण्याची गरज नाही कारण आज आम्ही तुम्हाला काही अशा सोप्या तीन पद्धती सांगणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही सहज तुमच्या घराचा स्मार्ट लॉक उघडू शकता.

  • 18 Jan 2025 09:19 AM (IST)

    18 Jan 2025 09:19 AM (IST)

    काय आहे कार्बन क्रेडिट? जे Google भारतीय कंपन्यांकडून खरेदी करणार, जाणून घ्या त्याचा कोणाला फायदा होणार

    महाकाय कंपनी गुगलने वराहा नावाच्या स्टार्टअपसोबत करार केला आहे. वराहा स्टार्टअपकडून कार्बन क्रेडिट्स खरेदी करणार असल्याचे गुगलने म्हटले आहे. गुगल आणि वराहा यांच्यातील हा करार बायोचारशी संबंधित आतापर्यंतचा सर्वात मोठा करार असल्याचे बोलले जात आहे. या निमित्ताने, कार्बन क्रेडिट म्हणजे काय? ज्यासाठी Google ने खरेदी करण्याचा करार केला आहे.

  • 18 Jan 2025 08:55 AM (IST)

    18 Jan 2025 08:55 AM (IST)

    Blinkit वरून तुम्ही काय मागवले याचा कुणाला थांगपत्ताही लागणार नाही, ऑर्डर हिस्ट्री कशी डिलीट करावी ते जाणून घ्या

    ब्लिंकिट हे एक लोकप्रिय क्विक-कॉमर्स ॲप आहे. काही काळापूर्वी या प्लॅटफॉर्मवर एक नवीन फीचर आणण्यात आले होते. हे फिचर ऑर्डर हिस्ट्री हटविण्यासाठी वापरले जाते. हे फिचर त्यांच्यासाठी खास आहे ज्यांना आपली ऑर्डर हिस्ट्री क्लिअर करायची आहे. या फिचरसह, युजर्स त्यांच्या अकाउंटमधून त्या स्पेसिफिक ऑर्डर डिलीट करू शकतात, जे युजर्स त्यांच्या अकाउंटमध्ये पाहू इच्छित नाहीत. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला ब्लिंकिटवर आपली ऑर्डर हिस्ट्री डिलीट कशी करायची याची एक सोपी पद्धत सांगणार आहोत. हे फिचर तुमच्या बरेच कामी येऊ शकते. स्टेप बाय स्टेप याविषयी जाणून घेऊया.

  • 18 Jan 2025 08:54 AM (IST)

    18 Jan 2025 08:54 AM (IST)

    लिव्हरमध्ये साचून राहिलेले विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी करून पाहा ‘हे’ घरगुती उपाय

    थंडीच्या दिवसांमध्ये शरीरसंबंधित अनेक समस्या वाढू लागतात. शरीरातील ऊर्जेची पातळी कमी होऊन अशक्तपणा जाणवण्याची शक्यता असते. त्यामुळे थंडीमध्ये आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. निरोगी आरोग्य जगण्यासाठी शरीरातील प्रत्येक अवयव महत्वाचा आहे. त्यातील शरीरातील सर्वच महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर. लिव्हरचे कार्य बिघडल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्याचे काम लिव्हर करते. याशिवाय रक्त शुद्ध करून आरोग्य निरोगी ठेवण्याचे महत्वपूर्ण काम लिव्हर करते. त्यामुळे लिव्हरच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून गेले नाहीतर शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लिव्हरमध्ये साचून राहिलेले विषारी घटक काढून टाकण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया घरगुती उपाय.

  • 18 Jan 2025 08:53 AM (IST)

    18 Jan 2025 08:53 AM (IST)

    Bigg Boss 18 च्या टॉप 6 स्पर्धकांच्या सपोर्ट करणाऱ्या सेलिब्रेटींचा सामना होणार मीडियाशी

    बिग बॉस १८ फिनाले : टेलिव्हिजन वरची चर्चेत रिॲलिटी शो बिग बॉस १८ आता अंतिम टप्प्यात आहे बिग बॉस १८ चा फिनालेला फक्त एक दिवस शिल्लक राहिला आहे. याआधी टॉप ६ स्पर्धकांचे सपोर्टर्स घरामध्ये एन्ट्री करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच बिग बॉसच्या घरामध्ये पत्रकार आले होते आणि यावेळी त्यांनी घरातच स्पर्धकांना आरसा दाखवला. यावेळी घरामध्ये कोणी किती योगदान केले आहे त्याचबरोबर कशाप्रकारे कोणी कोणाची टीका केली आहे यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. आता बिग बॉस १८ च्या टॉप्स स्पर्धकांचे सपोर्ट करणारे सेलिब्रिटी घरामध्ये येणार आहेत. यावेळी सेलिब्रेटी पाहुण्यांना त्यांच्या आवडत्या स्पर्धकांसाठी मीडियाशी लढावे लागणार आहे.

  • 18 Jan 2025 08:36 AM (IST)

    18 Jan 2025 08:36 AM (IST)

    MVA: 'मविआ'त बिघाडी? 'हा' पक्ष स्वतंत्रपणे लढणार मुंबई महापालिकेची निवडणूक; सहकाऱ्यांची चिंता वाढली

    गेल्या वर्षी राज्यात महराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत पाहायला मिळाली. मात्र राज्यातील जनतेने महायुतील स्पष्ट कौल दिला. राज्यात महाविकास आघाडीला 50 पेक्षा जास्त जागा जिंकता आलेल्या नाहीत. त्यातसुद्धा अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधील देखील लढत महत्वाची ठरली. विधानसभा झालयानंतर सर्व पक्षांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. मात्र आता या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे.

    विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव पत्करावा लागल्यानंतर महाविकास आघाडीमधील प्रत्येक पक्षाने स्वतंत्रपणे मुंबई महापालिकेच्या निवडणुका जिंकण्याची तयारी सुरू केली असल्याचे म्हटले जात आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गट देखील मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या संदर्भात मुंबईत पक्षाची एक बैठक झाल्याचे समजते आहे.

  • 18 Jan 2025 08:36 AM (IST)

    18 Jan 2025 08:36 AM (IST)

    पुण्यात 'पाणी' पेटणार; PMC ला नाेटीस देण्याचे विखे-पाटलांचे आदेश; नेमके प्रकरण तरी काय?

    पुणे शहराला हाेणाऱ्या पाणी पुरवठ्याचा वाद पुन्हा एकदा उचल खाणार आहे. मंजुर काेट्यापेक्षा अधिक पाणी का उचलता अशी नाेटीस महापािलकेला पाठवा असे आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. तसेच अतिरीक्त पाण्याची मागणी करताना किती प्रमाणात पाण्यावर पुर्नप्रक्रीया केली जाते याची माहीती कळवावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

    पुणे महापालिकेला १४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी कोटा मंजूर असताना त्यांची २२ टीएमसी पाण्याची मागणी आहे. पुण्यात एका कार्यक्रमानंतर मंत्री विखे पाटील यांनी पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यासंदर्भात वरील माहीती दिली.  ठाणे, मुंबईप्रमाणे पाण्याबाबत पुणे महापालिकेने भागीदारी घ्यायला हवी, असे मतही त्यांनी मांडले. पुणे महापालिकेने काही महिन्यापूर्वी जलसंपदा विभागाला २१ टीएमसी पाणी कोटा मंजूर करण्याची मागणी करणारे पत्र दिले होते. त्याबाबत सरकारला ही पत्र पाठविले आहे. मात्र, अद्याप त्यावर निर्णय झाला नसल्याबाबत विखे पाटील यांचे लक्ष वेधले.

  • 18 Jan 2025 08:35 AM (IST)

    18 Jan 2025 08:35 AM (IST)

    Kolkata Doctor Case: ‘त्या’ अत्याचार प्रकरणात कोर्ट आज निकाल देणार; CBI ने केली मृत्यूदंडाची मागणी

    कोलकाता येथील आरजी कार वैद्यकीय महाविद्यालयात 9 ऑगस्टच्या मध्यरात्रीच्या सुमारास एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर सामूहिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता याप्रकरणात महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. आज या प्रकरणात कोलकाता येथील सियालदाह येथील सेशन कोर्ट आपला निर्णय देणार आहे. 9 ऑगस्टरोजी कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयात आत्याचाराची घटना घडली होती. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती.

Web Title: Marathi breaking news today live updates add main events 18 jan 2025 marathi blog

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2025 | 08:34 AM

Topics:  

  • maharashtra
  • Saif Ali Khan

संबंधित बातम्या

Mira Bhayandar News : मिरा–भाईंदरमधील विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, आरटीओ कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना सुलभ सेवा
1

Mira Bhayandar News : मिरा–भाईंदरमधील विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, आरटीओ कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना सुलभ सेवा

Mahalaxmi Race Course : “महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क”, एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
2

Mahalaxmi Race Course : “महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क”, एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

Thane Borivali Twin Tunnel : ठाणे, बोरिवलीतील वाहतूक कोंडी दूर होणार! २०२८ पर्यंत ट्विन टनल सेवेत दाखल होणार
3

Thane Borivali Twin Tunnel : ठाणे, बोरिवलीतील वाहतूक कोंडी दूर होणार! २०२८ पर्यंत ट्विन टनल सेवेत दाखल होणार

Pune Book Festival : पुस्तकांची कोट्यवधींची उलाढाल; दोन दिवसांतच दीड लाखांहून अधिक जणांची भेट
4

Pune Book Festival : पुस्तकांची कोट्यवधींची उलाढाल; दोन दिवसांतच दीड लाखांहून अधिक जणांची भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.