Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai: महापौर बंगल्यावरून रणकंदन! २.३९ कोटींच्या प्रस्तावावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

बंगल्याच्या तळमजल्यावर इटालियन मार्बल बसविणे आणि विशेष प्रकाशयोजना करणे यांसारख्या आलिशान कामांसाठी २०२६-२७ च्या भांडवली अर्थसंकल्पातून तरतूद करण्यात आली आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 29, 2026 | 09:29 AM
महापौर बंगल्यावरून रणकंदन! २.३९ कोटींच्या प्रस्तावावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

महापौर बंगल्यावरून रणकंदन! २.३९ कोटींच्या प्रस्तावावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

Follow Us
Follow Us:

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (राणीबाग) परिसरातील ऐतिहासिक महापौर बंगल्याच्या दुरुस्ती आणि आधुनिकीकरणाचा मुद्दा सध्या मुंबईच्या राजकारणात वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे.या कामासाठी २.३९ कोटी रुपयांचा प्रस्ताव समोर आल्यानंतर, पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोपांच्या फैरी झाडल्या जात असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीपुढे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार, राणीबाग परिसरातील सागवान लाकडाचा हा एकमजली वारसास्थळ बंगला नूतनीकरणासाठी निवडण्यात आला आहे. या प्रस्तावात अंतर्गत सजावट, स्वच्छतागृहांचे आधुनिकीकरण, अतिरिक्त शयनकक्ष व प्रसाधनगृहांची उभारणी, आणि मुख्य सभागृहाचे एका सुसज्ज बैठकीच्या कक्षात रूपांतर करणे यांचा समावेश आहे.(फोटो सौजन्य – AI)

म्हाडाच्या घरांना अल्प प्रतिसाद! मुंबईतील सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक, मुदतवाढ देण्याची शक्यता

तसेच, बंगल्याच्या तळमजल्यावर इटालियन मार्बल बसविणे आणि विशेष प्रकाशयोजना करणे यांसारख्या आलिशान कामांसाठी २०२६-२७ च्या भांडवली अर्थसंकल्पातून तरतूद करण्यात आली आहे.महापौर बंगल्याच्या नूतनीकरणाचा हा वाद आता केवळ प्रशासकीय न राहता राजकीय प्रतिष्ठेचा बनला आहे. एकीकडे वारसा जतन आणि पैशांचा अपव्यय असे मुद्दे विरोधक मांडत असताना, दुसरीकडे वास्तूची सुरक्षा आणि महापौरांची सोय यावर सत्ताधारी ठाम आहेत. या प्रस्तावावर स्थायी समितीत काय निर्णय होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

किशोरी पेडणेकर यांचा प्रशासनावर हल्लाबोल

या प्रस्तावावर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनावर कडाडून टीका केली आहे. श्महापौरांचा बंगला ही एक ऐतिहासिक वारसा वास्तू आहे. अशा वास्तूत मोठ्या प्रमाणावर तोडफोड करणे आणि मूळ रचनेत बदल करणे है वारसा जतन करण्याच्या तत्त्वांच्या पूर्णपणे विरोधात आहे. असे त्यांनी म्हटले.निवडणुकीपूर्वीच या बंगल्याच्या डागडुजीवर दीड ते दोन कोटी रुपये खर्च झाले असताना, पुन्हा काही महिन्यातच कोट्यवधींचा प्रस्ताव कशासाठी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, महापौरांना भेटायला येणाऱ्या नागरिकांना आणि पत्रकारांना बंगल्याबाहेर कंटेनरमध्ये बसावे लागणार असल्याचा दावा करत, त्यांनी मुंबईकरांच्या कराच्या पैशांची ही उधळपट्टी असल्याचे म्हटले आहे.

खड्ड्यांवर कोट्यवधी रुपयांची उधळण! मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर वॉचडॉग फाऊंडेशनने ओढले ताशेरे

दुसरीकडे, सभागृह नेते गणेश खणकर यांनी या आरोपांचे खंडन करत बंगल्याच्या दुरवस्थेचे समर्थन केले आहे. खणकर यांनी सांगितले की, रमी स्वतः या बंगल्याची पाहणी केली असून वास्तू अत्यंत जीर्ण झाली आहे. लाकडाला वाळवी लागली असून फरश्या उखडल्या आहेत, खोल्यांचे आकारमान अत्यंत लहान असल्याने ते महापौरांना राहण्यायोग्य नाही. वारसास्थळाचे मूळ स्वरूप अबाधित राखूनच केवळ आवश्यक आधुनिकीकरण केले जात असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mumbai uproar over mayors bungalow ruling and opposition clash over 2 39 crore proposal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • BMC Mayor
  • maharashtra
  • Mumabi

संबंधित बातम्या

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी; सक्तीच्या धर्मांतरावर 7 ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद
1

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी; सक्तीच्या धर्मांतरावर 7 ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद

Gondiya: चक्क ६३६ शाळा इमारती जीर्ण! गळते छत, तडे गेलेल्या भिती, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
2

Gondiya: चक्क ६३६ शाळा इमारती जीर्ण! गळते छत, तडे गेलेल्या भिती, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Bhandara News: ४१५ वर्गखोल्या धोकादायक! दुरुस्तीची कासवगती; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, पालकवर्गातून संताप
3

Bhandara News: ४१५ वर्गखोल्या धोकादायक! दुरुस्तीची कासवगती; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, पालकवर्गातून संताप

पंढरपूर वारीतून एसटी महामंडळाला तब्बल ‘इतक्या’ कोटींचे उत्पन्न; प्रताप सरनाईक यांनी दिली सविस्तर माहिती
4

पंढरपूर वारीतून एसटी महामंडळाला तब्बल ‘इतक्या’ कोटींचे उत्पन्न; प्रताप सरनाईक यांनी दिली सविस्तर माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.