Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Sindoor: ‘मैं भी मर जाता तो अच्छा था…’ ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील १० सदस्याचा खात्मा

Operation Sindoor News : ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात दहशतवादी आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरच्या कुटुंबातील १० सदस्य ठार झाले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 07, 2025 | 02:09 PM
ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील १० सदस्याचा खात्मा (फोटो सौजन्य-X)

ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील १० सदस्याचा खात्मा (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Operation Sindoor News in Marathi : ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात दहशतवादी आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरच्या कुटुंबातील १० सदस्य ठार झाले आहेत. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याने स्वतः याची पुष्टी केली आणि सांगितले की, भारतीय हल्ल्यात त्याच्या कुटुंबातील १० सदस्य आणि चार जवळचे सहकारी मारले गेले आहेत.

या हल्ल्यानंतर, दुःखी मसूद अझहर म्हणाला की या हल्ल्यात मीही मारला गेला असता तर बरे झाले असते. जैश-ए-मोहम्मदने एका निवेदनात म्हटले आहे की, “मौलाना कशफ यांचे संपूर्ण कुटुंब, मौलाना मसूद अझहर यांच्या मोठ्या बहिणीसह मारले गेले आहे आणि मुफ्ती अब्दुल रौफ यांचे नातवंडे, बाजी सादिया यांचे पती आणि त्यांच्या मोठ्या मुलीची चार मुले जखमी झाली आहेत. बहुतेक महिला आणि मुले मारली गेली आहेत.” हवाई हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या अझहरच्या कुटुंबातील सदस्यांना आणि जवळच्या व्यक्तींना आज दफन करण्यात येईल.

India Attacks Pakistan News : पाकिस्तान मधील नऊ दहशतवादी तळ ध्वस्त

काल रात्री उशिरा भारतीय सशस्त्र दलांनी पंजाबमधील जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला असलेल्या वहावलपूरसह नऊ दहशतवादी अड्ड्यांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ला केला. पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, ‘भारताची कारवाई केंद्रित, मोजमापित आणि चिथावणीखोर नव्हती.’ ते म्हणाले की, पहलगाम हल्ला अत्यंत क्रूर होता.

रात्री उशिरा ऑपरेशन

यावेळी कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले की, भारतीय सशस्त्र दलांनी ६-७ मे २०२५ च्या रात्री १.०५ ते १.३० दरम्यान ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. ते म्हणाले, “२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी ही कारवाई सुरू करण्यात आली होती. या कारवाईत लष्करी तळांना किंवा सामान्य लोकांना लक्ष्य करण्यात आले नाही. नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले आणि ते पूर्णपणे नष्ट करण्यात आले.” तत्पूर्वी, संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य करून ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले, जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखले जात होते आणि निर्देशित केले जात होते. एकूण नऊ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले.”, अशी माहिती देण्यात आली.

दहशतवाद्यांना पंतप्रधान मोदींचे चोख प्रत्युत्तर, Operation Sindoor नंतर कंगना रणौत काय म्हणाली?

Web Title: Masood azhar entire family was wiped out in operation sindoor 14 people including his wife and son died

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2025 | 02:09 PM

Topics:  

  • narendra modi
  • Operation Sindoor
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

India travel trends 2025 : भारतीय पर्यटकांनी तुर्की-अझरबैजानकडे पाठ फिरवून मालदीवलाही दाखवली ‘जागा’; ‘हे’ देश ठरले नवी पसंती
1

India travel trends 2025 : भारतीय पर्यटकांनी तुर्की-अझरबैजानकडे पाठ फिरवून मालदीवलाही दाखवली ‘जागा’; ‘हे’ देश ठरले नवी पसंती

भारताने पराभव स्वीकारावा…! पुन्हा पाकिस्तानच्या ‘या’ बड्या अधिकाऱ्याने केली आगपाखड
2

भारताने पराभव स्वीकारावा…! पुन्हा पाकिस्तानच्या ‘या’ बड्या अधिकाऱ्याने केली आगपाखड

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी
3

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
4

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.