Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘राहुल गांधी नव्हे, मोदींनी वांगचुक यांची भेट का घेतली नाही?’ हर्षवर्धन सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली. नीट पेपरफुटी, रामरक्षा कार्यक्रम, राम मंदिर चोरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

  • By विवेक
Updated On: Jul 17, 2026 | 05:15 PM
'राहुल गांधी नव्हे, मोदींनी वांगचुक यांची भेट का घेतली नाही?' हर्षवर्धन सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल

'राहुल गांधी नव्हे, मोदींनी वांगचुक यांची भेट का घेतली नाही?' हर्षवर्धन सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल

Follow Us
Follow Us:
  • सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून मोदी सरकारवर हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
  • NEET पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
  • रामरक्षा कार्यक्रम, राम मंदिर चोरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही स्पष्ट भूमिका
 

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे मुद्दे व काँग्रेस पक्षाचे मुद्दे सारखेच असून काँग्रेस पक्षाने वांगचुक यांच्या आधीपासूनच नीट परीक्षेचा मुद्दा हाती घेत शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दोघांचा लढा एकाच मुद्द्यासाठी, त्यामुळे राहुल गांधी यांनी त्यांची भेट का घेतली नाही, यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वांगचुक यांची अद्याप भेट का घेतली नाही? शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेतला नाही? हा आहे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

मोदी सरकारवर टीका; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, “सोनम वांगचुक यांनी याआधी लडाखच्या प्रश्नावरही उपोषण केले होते पण भाजपा सरकारने त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करुन जेलमध्ये टाकले होते. मागील २० दिवसापासून त्यांचे नीट पेपर फुटी प्रश्नी उपोषण सुरु आहे पण भाजपा सरकारने त्यांच्या उपोषणाची दखल घेतलेली नाही.”

‘राज ठाकरेंना ढेकळं कळतात का?’ गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; सोनम वांगचुक आंदोलनावरूनही केली टीका

“नरेंद्र मोदी यांनी या विषयावर ‘मन की बात’ सुद्धा केलेली नाही पण काँग्रेसला मात्र वांगचुक यांच्याशी जोडून पाहिले जात आहे ते चुकीचे आहे. मोदी सरकारने नीट पेपर फुटीचा मुद्दा गांभीर्याने घेतलेला नाही. २४ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरु आहे, म्हणूनच राहुल गांधी यांनी ‘छात्रों की गुंज’ हे देशव्यापी अभियान सुरु केले आहे आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, ही मागणी लावून धरली आहे,” असेही सपकाळ म्हणाले.

रामरक्षा कार्यक्रम आणि राम मंदिर चोरीवर भाष्य

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या रामरक्षा कार्यक्रमाचे मुख्यमंत्री व मोहन भागवत यांना आमंत्रण देण्यात आले आहे, या प्रश्नावर हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “राम नाम जपना, पराया माल अपना’, हे भाजपा व रा. स्व. संघाचे वर्तन आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिरात मोठी चोरी झाली, हे चोर भाजपा व रा. स्व. संघाशी संबंधित आहेत. त्या लोकांना नरेंद्र मोदी सरकारनेच नियुक्त केले होते. श्रीराम मंदिरात मोठी चोरी झाली, त्यासाठी एसआयटी नेमली पण ही एसआयटी हीच भाजपा सरकारच्या ताटाखालचे मांजर आहे ते खऱ्या चोरांना काय पकडणार? भाजपा / RSS या चोरीवर मूग मिळून गप्प आहे.”

“शिवसेनेने रामरक्षा कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे, हिम्मत असेल तर मुख्यमंत्री व सरसंघचालक मोहन भागवत यांनी रामरक्षा कार्यक्रमाला जावे,” असेही सपकाळ म्हणाले.

‘मतपेढी सुधारण्यासाठी प्रभू श्रीरामाचा आधार’; चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंच्या ‘रामरक्षा’ पठणाला म्हटले ‘ढोंगीपणा’

राष्ट्रवादी काँग्रेसबाबत काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, “यासंदर्भात मागील काही दिवसापासून मीडियातून चर्चा सुरु आहेत पण त्यांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील व खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली आहे, त्यावर विश्वास ठेवला पाहिजे,” असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Web Title: Harshvardhan sapkal slams bjp over sonam wangchuk neet protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • Harshwardhan Sapkal
  • narendra modi
  • Rahul Gandhi
  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

India Alliance : निवडणूक आयोगाविरोधात राहुल गांधींसह ‘इंडिया’च्या ११ नेत्यांची सुप्रीम कोर्टात याचिका
1

India Alliance : निवडणूक आयोगाविरोधात राहुल गांधींसह ‘इंडिया’च्या ११ नेत्यांची सुप्रीम कोर्टात याचिका

Form 6 Controversy : बदललेल्या फॉर्म-6ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही; न्यायालयाचा स्पष्ट खुलासा
2

Form 6 Controversy : बदललेल्या फॉर्म-6ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही; न्यायालयाचा स्पष्ट खुलासा

India Alliance : ज्ञानेश कुमार ‘गो बॅक’; इंडिया आघाडीचा सुप्रिम कोर्टावर धडक मोर्चा, राहुल-खरगेंसमवेत अनेक नेत्यांचा समावेश
3

India Alliance : ज्ञानेश कुमार ‘गो बॅक’; इंडिया आघाडीचा सुप्रिम कोर्टावर धडक मोर्चा, राहुल-खरगेंसमवेत अनेक नेत्यांचा समावेश

Rahul Gandhi Press Conference: नरेंद्र मोदींनी ज्ञानेश कुमारांना वाचवावं ही आमची इच्छा…; राहुल गांधी असं का म्हणाले?
4

Rahul Gandhi Press Conference: नरेंद्र मोदींनी ज्ञानेश कुमारांना वाचवावं ही आमची इच्छा…; राहुल गांधी असं का म्हणाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.