
Abhijit Dipke, Narendra Modi, Sonam Wangchuk, Delhi Protest,
CJP Chief Abhijit Dipke Demands PM Narendra Modi’s Resignation: दिल्लीतील जंतरमंतर मैदानात सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या ठिकाणाहून दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने उचलून नेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. इतकेच नव्हे तर, सीजेपीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनाही पोलिसांनी मारहाण करत त्यांना डांबून ठेवण्यात आले. यामुळे जंतरमंतरवर काही वेळासाठी मोठा गोंधळ उडाला होता. आज सकाळी झालेल्या या गोंधळानंतर आता सीजेपी अधिक आक्रमक झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान खूप प्रिय आहेत. म्हणून त्यांनी प्रधान यांचा राजीनामा घेतला नाही. त्यामुळे आता हे हुकूमशाहा नरेंद्र मोदी यांचाच राजीनामा मागायचा आहे, असं अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे.
आज सकाळी झालेल्या गोंधळानंतर अभिजीत दिपके यांनी स्वत: उपोषणाची घोषणा केली आहे.यावेळी बोलताना अभिजीत दिपके म्हणाले की, सोनम वांगचुक सर गेल्या २० दिवसांच्या उपोषणामुळे खूप अशक्त झाले आहेत. त्यांना चालताही येत नाहीये, तरीही पोलीस त्यांना घेऊन गेले. पण जर त्यांना काही झालं तर याला जबाबदार दिल्ली पोलीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असतील. आजपर्यंत आपण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत होतो. पण नरेंद्र मोदींनी प्रधान यांचा राजीनामा घेतला नाही. याउलट मोदींनी सोनम वांगचुक सरांना जबरदस्तीने ओढून घेऊन गेले. मलाही त्यांनी डांबून ठेवले, मारहाण केली. या हुकूमशाहाने जी गोष्ट केली त्यावरून हे दिसून येते की त्यांना धर्मेद्र प्रधान खूप प्रिय आहेत. त्यामुळे आता आम्ही प्रधान यांचा नाही तर थेट नरेंद्र मोदी नावाच्या हुकूमशाहाचा राजीनामा मागायचा आहे.
आमचे आंदोलन मागे घेणार नाही. आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आहोत. गेल्या २० दिवसांपासून सोनम वांगचुक उपाशी होते. आम्ही तुमच्या मुलांसाठी गेल्या महिनाभरापासून इथे आंदोल करत आहोत. आता आमचे तुम्हाला आवाहन आहे, मोठ्या संख्येने इथे या, आपण २० जुलैलै जंतरमंतर वरूनच संसंदेवरील मोर्चा काढणार आहोत. आजपर्यंत आपण धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा मागत होतो पण आता नरेंद्र मोदींचा राजीनामा मागायचा आहे.” असं दिपके यांनी म्हटलं आहे.
दिल्ली पोलिसांच्या या कारवाईनंतर, कॉकरोच जनता पार्टी आणि तेथे उपस्थित असलेल्या आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या काळात, आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता, सीजेपीने पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये, सीजेपीने लिहिले, “मोदींनी राजीनामा दिलाच पाहिजे.” असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
देशात सुरू असलेल्या पेपरफुटीच्या निषेधार्थ सुरू झालेले आंदोलन जंतर मंतरपर्यंत पोहोचले आहे. सोनम वांगचुक हे आंदोलक विद्यार्थ्यांसोबत गेल्या २१ दिवसांपासून उपोषणावर आहेत. उपोषणादरम्यान सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत गेली. सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची कोणत्याही परिस्थितीत काळजी घेतली पाहिजे, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर काही दिवसांनी, दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर मंतर येथील आंदोलनस्थळावरून जबरदस्तीने हटवले आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले. त्यांना हटवल्यानंतर, कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजी दीपके यांनी उपोषण सुरू केले आहे.
दीपके यांनी म्हटले आहे की, वांगचुक यांना अशा प्रकारे हटवणे ही “हुकूमशाही” असून त्याचा विरोध झाला पाहिजे. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटले आहे की, दिल्ली पोलिसांनी सोनम सरांना (वांगचुक) जंतर मंतरवरून हटवले. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्जही केला. मी नुकताच माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो, जिथे मला डांबून ठेवण्यात आले आणि मारहाण करण्यात आली. सोनम वांगचुकला अटक केल्यानंतर त्यांनी मला सोडल्याचे सांगितले, पण मला अजूनही जंतर मंतरला जाण्याची परवानगी मिळालेली नाही. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाला माझे आवाहन आहे: आपण देशभरात आंदोलन केले पाहिजे. मी सर्वांना विनंती करतो की, कोणतेही नियम न मोडता शांततेने आंदोलन करा. आपण प्रत्युत्तर दिलेच पाहिजे, आम्ही हुकूमशाही सहन करणार नाही. असं अभिजीत दिपकेंनी म्हटलं आहे.