Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेपाळमध्ये मध्यरात्री मोठा भूकंप, आतापर्यंत 70 जणांचा मृत्यू; भारतातही जाणवले जोरदार धक्के

भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये मध्यरात्री भूकंपाची भीषण दुर्घटना घडली. या दुर्घनेत आत्तापर्यंत 70 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. नेपाळमधील भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल एवढी नोंद झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 04, 2023 | 07:22 AM
नेपाळमध्ये मध्यरात्री मोठा भूकंप, आतापर्यंत 70 जणांचा मृत्यू; भारतातही जाणवले जोरदार धक्के
Follow Us
Close
Follow Us:

भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये मध्यरात्री भूकंपाची भीषण दुर्घटना घडली. या दुर्घनेत आत्तापर्यंत 70 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. नेपाळमधील भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल एवढी नोंद झाली असून या भूंकपाच्या धक्क्याने राजधानी दिल्लीतील एनसीआरला हादरा दिला आहे. उत्तर भारताच्या काही भागांतही या भूकंपाचा धक्का जाणवल्याची माहिती आहे. जखमींची संख्याही मोठी असल्याचे समजते.

सध्या बचावकार्य सुरू असून मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. नेपाळच्या उत्तरी-पश्चिम जिल्ह्यांमध्ये भूकंपामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. रुकूम पश्चिम जिल्ह्यात ३६ आणि जाजरकोट येथे २० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

नेपाळच्या PMO कार्यालयानेही ट्वीट करुन घडलेल्या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच बचाव पथकांना घटनास्थळी पाठवल्यात आल्याचे सांगितले. नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप मापन केंद्रानुसार, नेपाळच्या जाजरकोट जिल्ह्यातील लामिडांडा भागात भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

या भूकंपाची तीव्रता इतकी भीषण होती, की यामध्ये शेकडो इमारती कोसळल्या आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत ७० जणांचा मृत्यू झाला असून ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, दिल्लीला लागून असलेल्या नोएडा आणि ग्रेटर नोएडाच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले, त्यामुळे उंच इमारतींमध्ये राहणारे अनेक लोक बाहेर आले. उत्तर प्रदेशातील लखनौ, बस्ती, बाराबंकी, फिरोजाबाद, अमेठी, गोंडा, प्रतापगड, भदोही, बहराइच, गोरखपूर आणि देवरिया जिल्ह्यांशिवाय बिहारमधील कटिहार, मोतिहारी आणि पटना इथंही भूकंपाचे धक्के जाणवले.

Web Title: Massive midnight quake in nepal 70 dead so far strong tremors were also felt in india nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2023 | 07:22 AM

Topics:  

  • Earthquake in Nepal
  • india
  • NAVARASHTRA
  • nepal

संबंधित बातम्या

Farmers Death : धक्कादायक वास्तव! दररोज एक शेतकरी संपवतोय जीवन, आतापर्यंत ११ महिन्यात ३२७ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला
1

Farmers Death : धक्कादायक वास्तव! दररोज एक शेतकरी संपवतोय जीवन, आतापर्यंत ११ महिन्यात ३२७ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

SCO Summit 2025: कूटनीतीचा नवा टप्पा! मॉस्कोमधील Jaishankar-Putin बैठक बनली जागतिक चर्चेचा विषय; पहा Recent Updates
2

SCO Summit 2025: कूटनीतीचा नवा टप्पा! मॉस्कोमधील Jaishankar-Putin बैठक बनली जागतिक चर्चेचा विषय; पहा Recent Updates

Two Front War : ’88 तासांचे ट्रेलर पुरेसे’,भारताकडून पाकिस्तानला कठोर इशारा; ख्वाजा आसिफला सतावतेय नेमकी कशाची भीती?
3

Two Front War : ’88 तासांचे ट्रेलर पुरेसे’,भारताकडून पाकिस्तानला कठोर इशारा; ख्वाजा आसिफला सतावतेय नेमकी कशाची भीती?

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष
4

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.