Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Inflation News: महागाई गगनाला, सरकार राजकारणात मग्न! मे महिन्यात घाऊक महागाईचा दर ४३ महिन्यांच्या उच्चांकावर

Inflation Crisis- वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर २०२२ नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. दुसरीकडे, किरकोळ महागाई मे महिन्यात वाढून ३.९३% झाली आहे, जी एप्रिलमध्ये ३.४८% होती.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 16, 2026 | 04:48 PM
Inflation News: महागाई गगनाला, सरकार राजकारणात मग्न! मे महिन्यात घाऊक महागाईचा दर ४३ महिन्यांच्या उच्चांकावर
Follow Us
Follow Us:
  • धान्य, भाजीपाला, कपड्यांपासून ते प्रवासापर्यंत सर्वच गोष्टी खिशाला जड
  • आकडेवारीनुसार, सप्टेंबर २०२२ नंतरची ही सर्वात मोठी वाढ
  • पश्चिम आशियातील तणाव कमी झाल्यामुळे जागतिक ऊर्जा आणि कमोडिटीच्या किमतीत झालेली घट
Inflation News: सामान्य जनतेवर महागाईचा बोजा सातत्याने वाढत असून धान्य, भाजीपाला, कपड्यांपासून ते प्रवासापर्यंत सर्वच गोष्टी खिशाला जड होऊ लागल्या आहेत. अशातच मे महिन्यातील घाऊक महागाईचे आकडे समोर आले आहेत. मे महिन्यात घाऊक महागाईचा दर गेल्या ४३ महिन्यांतील उच्चांकी पातळीवर म्हणजेच ९.६% वर पोहोचला आहे. एप्रिलमध्ये हा दर ८.२६% होता, तर यापूर्वी सप्टेंबर २०२२ मध्ये तो १०.७०% इतका नोंदवला गेला होता.

वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर २०२२ नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. दुसरीकडे, किरकोळ महागाई मे महिन्यात वाढून ३.९३% झाली आहे, जी एप्रिलमध्ये ३.४८% होती. गेल्या ५ महिन्यांत पहिल्यांदाच किरकोळ महागाई रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ४% च्या लक्ष्याच्या अगदी जवळ पोहोचली आहे. राजकीय घडामोडींमध्ये व्यस्त असलेले सरकार महागाई नियंत्रणाचे दावे आणि बचतीचे उपदेश करत असले तरी, सरकारी आकडेवारी मात्र विदारक वास्तव मांडत आहे.

Inflation: महाग तेलाने बिघडवला सर्व खेळ, अन्नधान्यच्या किमतीने सामन्यांना केले हवालदिल; ३.९३% वर पोहचली महागाई

उत्पादन क्षेत्रावर परिणाम

इक्राचे मुख्य अर्थतज्ज्ञ राहुल अग्रवाल यांच्या मते, पश्चिम आशियातील तणाव कमी झाल्यामुळे जागतिक ऊर्जा आणि कमोडिटीच्या किमतीत झालेली घट जून २०२६ च्या घाऊक महागाईच्या आकडेवारीत थोडा दिलासा देऊ शकते. तर, इंडिया रेटिंग्स अँड रिसर्च’च्या संचालिका मेघा अरोरा यांनी इशारा दिला की, २०२६ चा मान्सून ‘अल निनो ‘च्या प्रभावाखाली असेल, यामुळे नजीकच्या भविष्यात खाद्यपदार्थांच्या किमती उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे. महागाईच्या या दुष्टचक्रामुळे उत्पादन क्षेत्रावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

सर्वच क्षेत्रांना बसला फटका

३.७८% वरून वाढून ४.१९% झाल्या दैनंदिन गरजेच्या वस्तू
३.११% वरून वाढून ४.४९% महागले खाद्यपदार
२४.८९% वरून वाढून ३०.३३% महागल इथन
६.६८% वरून वाढून ७.४८% महागले बंधकाम साहित्य

गावांमध्ये काम मिळेना, शहरातही वाढलं टेन्शन! मे महिन्यात बेरोजगारीची धक्कादायक आकडेवारी, अर्थव्यवस्था संकटात?

वर्ष २०२५-२६ मधील महागाई वृद्धी दर तक्ता

महिना घाऊक महागाई दर (%) किरकोळ महागाई दर (%)
एप्रिल ०.८५% ३.१६%
मे ०.३९% २.८२%
जून -०.१३% २.१०%
जुलै -०.५८% १.६१%
ऑगस्ट ०.५२% २.०७%
सप्टेंबर ०.१३% उपलब्ध नाही
ऑक्टोबर -१.२१% ०.२५%
नोव्हेंबर -०.३२% ०.७१%
डिसेेंबर ०.८३% १.३३%
जानेवारी १.८१% २.७४%
फेब्रुवारी २.१३% ३.२१%
मार्च ३.८८% ३.४०%

 

Web Title: May wholesales inflation rate highest 43 months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 04:47 PM

Topics:  

  • Indian Economy
  • Inflation
  • Inflation News
  • Inflation Rate In India
  • Retail Inflation

संबंधित बातम्या

दिलासादायक ! ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच LPG सिलेंडरच्या दरात कपात; थेट 200 रुपयांनी झाला स्वस्त
1

दिलासादायक ! ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच LPG सिलेंडरच्या दरात कपात; थेट 200 रुपयांनी झाला स्वस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.