Haj Piligrime : भारत-सौदी अरेबियात २०२६ च्या हज यात्रेसाठी करार; यात्रेकरुंना मिळणार या सुविधा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Hajj 2026 News in Marathi: रियाध/नवी दिल्ली : दरवर्षी जगभरातून लाखो मुस्लिम बांधव सौदी अरेबियाला हज यात्रेसाठी (Hajj Piligrim) जातात. मक्का या पवित्र शहरात या यात्रेचे आयोजने केले जाते. यामुळे जगभरातून येणाऱ्यांसाठी एक कोटा निश्चित केला जातो. येत्या २०२६ च्या यात्रेसाठी भारतीय हज यात्रेकरुंसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारत सरकारने सौदी अरेबियासोबत २०२६ च्या हज यात्रेसाठी एक करार केला आहे.
मलेशियात भीषण दुर्घटना! किनाऱ्याजवळ ३०० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली ; शेकडो बेपत्ता…
हा करार दोन्ही देशांतली दृढ संबंधाचे प्रतीक आहे. भारताचे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार आणि संसदीय मंत्री किरेन रिजिजू ७ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर सौदी अरेबियाच्या अधिकृत दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशात हज यात्रेकरुंसाठी महत्त्वाचा द्विपक्षीय करार करण्यात आला.
रिजिजू यांनी सौदी अरेबियाचे (Saudi Arabia) हज आणि उमरा मंत्री तौफिक बिन फव्झान अल रबिया यांची भेट घेतली. दोन्ही मंत्र्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाला. यावेळी हज यात्रेच्या २०२६ च्या तयारीचा आढावा घेण्यात आला. तसेच दोन्ही देशात सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. यावेळी यात्रेकरुंना मिळणाऱ्या सुविधांवरही चर्चा झाला.
याअंतर्गत भारतीय हज यात्रेकरुंना चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामध्ये निवास व्यवस्था, वाहतूक आणि आरोग्य सेवा भारतीय हज यात्रेकरुंना दिल्या जाणार आहेत. यामुळे यात्रेकरुंचा हज प्रवास अधिक सुखकर होईल.
या बैठकीत २०२६ च्या हज यात्रेसाठी भारतीय यात्रेकरुंसाठी एक कोटा निश्चित करण्यात आला आहे. करारानुसार, १७५,०२५ यात्रेकरुंचा कोटा हजसाठी निश्चित करण्यात आला आहे. दोन्ही मंत्र्यांनी रियाधच्या दूतावास आणि जेद्दाहमदील भारतीय वाणिज्य दूतावासचा आढावाही घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, 2014 मध्ये हज यात्रेसाठी भारताचा कोटा 1,36,020 होता, त्यानंतर 2015 मध्ये तो 1,75,025 वाढवण्यात आला होता. हा कोटा दरवर्षी सौदी अरेबियाकडून निश्चित केला जातो. २०२४ मध्ये हज यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दीमुळे 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
यामुळे हा कोटा कमी 1,22,518 करण्यात आला होता. पण २०२६ कोट्यात काहीशी वाढ करण्यात आली आहे. विमानांपासून ते मक्का-मदिना पर्यंतची वाहतूक, मीना कॅम्पमध्ये राहण्याची सोय, निवास, जेवण या सर्व व्यवस्था मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्यात आली आहे.
काय आहे हज यात्रा?
हज यात्रेला गेल्यानंतर सर्व प्रकारच्या चुका, पाप माफ होतात असे बोलले जाते. यावेळी मुस्लिम पुरुष बांधव पांढरे कपडे परिधान करतात. तर महिलांना कोणत्याही रंगाचे सैल कपडे घालण्याची परवानगी असते. 628 मध्ये पैगंबर मोहम्मद यांनी १४०० अनुयानांना घेऊन प्रवास सुरु केला होता. त्यानंतर त्यांनी केलेला हा प्रवास इस्लामचा पहिला तीर्थयात्रा ठरला आणि पुढे जाऊन या यात्रेला हज असे नाव देण्यात आले.
जपान हादरला! २४ तासांत सात भूकंपाचे तीव्र धक्के; त्सुनामीचा इशारा जारी






