
सरकारने Netflix NFLX.O, Disney सह सर्व प्रमुख स्ट्रीमिंग सेवांना 'ऑनलाइन दाखवण्यापूर्वी अश्लीलता आणि हिंसेसाठी सामग्रीचे स्वतंत्रपणे पुनरावलोकन करण्यास सांगितले आहे.'
मुंबई: चित्रपट आणि टीव्हीच्या विपरीत, OTT प्लॅटफॉर्मवर थेट सरकारी नियंत्रण नाही. त्यामुळेच त्यावर खूप अश्लील मजकूर प्रसारित होत आहे. अशी ओरड होत असताना आता केंद्र सरकारने ओटीटीच्या विरोधात कंबर कसली आहे. आता ओटीटी निर्मात्यांनाही त्यांची कॅान्टेट सादर करताना अनेक निर्बंधांना सामोरे जावे लागणार आहे.
वृत्तानुसार, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने हंटर्स, बेशरम आणि प्राइम प्ले या तीन प्लॅटफॉर्मवरील अश्लील कॅान्टेट काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत आणि इशारा दिला आहे की या आदेशांचे लवकरच पालन केले नाही, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. बंदी घालण्यात येईल. ओटीटीवर अश्लीलता दाखवणाऱ्या अश्लील प्लॅटफॉर्मच्या विरोधात सरकारने इशारा देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सरकारने Netflix NFLX.O, Disney सह सर्व प्रमुख स्ट्रीमिंग सेवांना ‘ऑनलाइन दाखवण्यापूर्वी अश्लीलता आणि हिंसेसाठी सामग्रीचे स्वतंत्रपणे पुनरावलोकन करण्यास सांगितले आहे.’