GT Vs KKR Live Streaming (फोटो- ट्विटर)
केकेआरने गुजरात दिलेले 181 रन्सचे टार्गेट
कॅमेरून ग्रीनने केली तडाखेबंद खेळी
शुभमन गिलने केली वादळी खेळी
Tata IPL GT Vs KKR Live Updates: आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना पार पडला. केकेआरने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय (IPL 2026) घेतला होता. केकेआरने गुजरात टायटन्सला 181 रन्सचे टार्गेट दिले होते. दरम्यान या सामन्यात गुजरात टायटन्सने 5 विकेट्सने केकेआरचा पराभव केला आहे. केकेआरचा या हंगामातील सलग 6 वा पराभव झाला आहे. त्यांच्या खात्यात 1 गुण जमा आहे.
गुजरात टायटन्सची फलंदाजी
केकेआरने दिलेल्या 181 रन्सचा पाठलाग करण्यासाठी गुजरात टायटन्सकडून शुभमन गिल आणि साई सुदर्शन खेळण्यासाठी आले. साई सुदर्शनने 22 रन्सची खेळी केली. 22 रन करून तो आउट झाला. त्यानंतर जोस बटलरने 25 रन्सची वेगवान खेळी केली. 25 रन्स करून तो आउट झाला. कर्णधार शुभमन गिलने शानदार अर्धशतक लगावले. त्यानंतर वाशिंग्टन सुंदरने 13 रन्स केल्या. कर्णधार शुभमन गिल 86 रन्स करून आउट झाला.
गुजरात टायटन्सची गोलंदाजी
गुजरात टायटन्सने पॉवर प्लेमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. गुजरातच्या गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये तीन विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजने अजिंक्य रहाणेला आउट केले. तर कागिसो रबाडाने अंगरीक्ष रघुवंशी आणि टीम सायफर्टची विकेट पटकावली. मात्र रोममेन पोवेल 20 चेंडूत 27 रन्सची खेळी केली. अशोक शर्माने रोममेन पोवेलची विकेट पटकावली. कागिसो रबाडाने आपल्या स्पेलमध्ये एकूण तीन विकेट्स घेतल्या. तर प्रसिद्ध कृष्णाने अनुकूल रॉयला आउट केले. अशोक शर्माने रमणदीप सिंहची विकेट घेतली. मोहम्मद सिराजने सुनील नरेनची विकेट घेतली. गुजरातच्या गोलंदाजांनी केकेआरच्या संघाला ऑल आउट केले.
केकेआरची गोलंदाजी
केकेआरकडून वरूण चक्रवर्ती आणि सुनील नरेन या दोन फिरकीपटूंनी गुजरात टायटन्सला दोन मोठे धक्के दिले. सुनील नरेनने साई सुदर्शनची विकेट घेतली. तर वरुण चक्रवर्तीने जोस बटलरची विकेट पटकावली. वरुण चक्रवर्तीने वाशिंग्टन सुंदरची विकेट घेतली. वैभव अरोराने शुभमन गिलला आउट केले. शेवटची ओव्हर रमणदीप सिंहने टाकली. शेवटच्या ओव्हरपर्यंत सुरू असलेली केकेआरची झुंज अपयशी ठरली.
FIFTY 🆙 2⃣9⃣th in #TATAIPL for Shubman Gill 🫡 He is leading #GT's chase in Ahmedabad 👏👏 Updates ▶️ https://t.co/FACeUzse3B#KhelBindaas | #GTvKKR | @ShubmanGill pic.twitter.com/4QQXqgZOwW — IndianPremierLeague (@IPL) April 17, 2026
केकेआरची फलंदाजी
पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या केकेआरकडून अजिंक्य रहाणे आणि टीम सायफर्ट सलामीला खेळण्यासाठी मैदानात आले. मात्र संघाची सुरुवात म्हणावी तशी चांगली झाली नाही. कर्णधार अजिंक्य रहाणे केवळ 1 चेंडू खेळून आउट झाला. तो एकही रन करू शकला नाही. त्यानंतर अंगरीक्ष रघुवंशी खेळण्यासाठी आला. तो 8 रन्स करून आउट झाला. केकेआरने पॉवर प्लेमध्ये तीन विकेट्स गमावल्या. टीम सायफर्ट 19 रन्स करून आउट झाला.
KKR Vs GT Live: मैदानावर फक्त ‘ग्रीन’ सिग्नल! गुजरात टायटन्सला विजयासाठी दिले कठीण आव्हान
कॅमेरून ग्रीन आणि रोममेन पोवेलने केकेआरचा डाव सांभाळला. रींकू सिंगला 5 व्या सामन्यात देखील चांगली खेळी करता आलेली नाही. या सामन्यात देखील तो केवळ 1 रन करून आउट झाला. तर अनुकूल रॉयने 9 रन्स केल्या. रमण दीप सिंहने 17 रन्सची महत्वपूर्ण खेळी केली. सुनील नरेन 0 रन करून आउट झाला. ग्रीनने 79 रन्सची महत्वाची खेळी केली. अखेर आजच्या सामन्यात ग्रीनला सूर गवसलेला दिसून आला.
गुजरात टायटन्सची संभाव्य टीम: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, मानव सुतार , अशोक शर्मा, प्रसिद्ध कृष्णा.
केकेआरची संभाव्य टीम: अजिंक्य रहाणे (कर्णधार), सुनील नरेन, टिम सिफर्ट (यष्टीरक्षक), फिन ॲलन,अंगकृष रघुवंशी, कॅमेरून ग्रीन, रिंकू सिंग, रोवमन पॉवेल, रमनदीप सिंग, अनुकूल रॉय, वैभव अरोरा, कार्तिक त्यागी, वरुण चक्रवर्ती.






