Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Crisis News: सावध राहा! गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांची आता खैर नाही; मोदी सरकारचे कडक निर्देश जारी

Gas Black Marketing Action: देशात एलपीजी गॅसचा तुटवडा नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी राज्य सरकारांना कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 13, 2026 | 10:00 PM
पुण्यात घरगुती गॅस सिलिंडर ब्लॅकने

पुण्यात घरगुती गॅस सिलिंडर ब्लॅकने

Follow Us
Close
Follow Us:

  • सावध राहा!
  • गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांची आता खैर नाही
  • मोदी सरकारचे कडक निर्देश जारी
नवी दिल्ली: मध्य आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण होणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. मात्र, केंद्र सरकारने (Central Goverment) या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट करत साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने सर्व राज्यांना कडक निर्देश जारी केले असून, विनाकारण ‘पॅनिक बुकिंग’ न करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

आकडेवारी काय सांगते? ‘पॅनिक बाइंग’मुळे पुरवठा साखळीवर ताण

पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, देशात गॅसचा कोणताही तुटवडा नाही. परंतु, भीतीपोटी ग्राहक गरजेपेक्षा जास्त सिलेंडर बुक करत असल्याने यंत्रणेवर ताण येत आहे. सामान्यतः देशात दररोज 50 ते 55 लाख सिलेंडरची बुकिंग होते. गेल्या काही दिवसांत हा आकडा 75 ते 76 लाखांवर पोहोचला आहे. दररोज सुमारे 25 लाख अतिरिक्त बुकिंग होत असल्याने पुरवठा साखळी विस्कळीत होत आहे.

During a media briefing on the recent developments in #WestAsia, Sujata Sharma, Joint Secretary, Ministry of Petroleum & Natural Gas, said that there is no dry out reported from any of the 25,000 distributors and urges citizens to refrain from panic booking as uninterrupted LPG… pic.twitter.com/XYlJ3jYkwT — Ministry of Information and Broadcasting (@MIB_India) March 13, 2026

Smriti Irani Gas Protest : LPG चा तुटवडा अन् स्मृती इराणींविरुद्ध Viral झाले मीम्स; लापता लेडीज अन्…

साठेबाजांविरुद्ध कडक पावले

गॅस सिलेंडरची अवैध साठेबाजी आणि चढ्या दराने होणारी विक्री रोखण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. या बैठकीत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी प्रत्यक्ष गोदामांवर छापे टाकून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश येथे हापूड आणि झाशी येथे चोरीच्या सिलेंडरची जप्ती व गोदामे सील करण्याची मोठी कारवाई करण्यात आली आहे.कर्नाटक आणि मध्य प्रदेश येथे अवैध साठवणुकीवर छापे टाकण्यात येत आहेत. तसेच, महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांत तक्रारींसाठी विशेष नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत.

ग्राहक सेवा केंद्रांचे सक्षमीकरण

ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी आपल्या कॉल सेंटर्समध्ये मोठी सुधारणा केली आहे. तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी कॉल सेंटर्समधील प्रतिनिधींची संख्या 400 पर्यंत वाढवण्यात आली असून 50 हून अधिक टेलिफोन लाईन्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोणताही उपभोक्ता आता विनाविलंब आपली तक्रार नोंदवू शकणार आहे.

नागरिकांना आवाहन

सरकारने स्पष्ट केले आहे की, देशाकडे पुढील अनेक महिने पुरेल इतका गॅस साठा उपलब्ध आहे. त्यामुळे केवळ भीतीपोटी सिलेंडरचा साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण करू नका. टंचाईचा गैरफायदा घेणाऱ्या दलालांची माहिती तातडीने प्रशासनाला द्यावी, असे आवाहनही पेट्रोलियम मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.

एकीकडे गॅससाठी वणवण तर दुसरीकडे काळाबाजार फोफावला; एकाच घरातून 31 सिलेंडर जप्त

Web Title: Modi govt strict action against lpg gas cylinder black marketing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 10:00 PM

Topics:  

  • Central Governement
  • Iran Israel Conflict
  • LPG Gas

संबंधित बातम्या

Paithan News: पैठणमध्ये दुहेरी संकट! गॅस टंचाईमुळे ‘इंडक्शन’चा वापर वाढला; वीज यंत्रणेवर ताण आल्याने शहर अंधारात
1

Paithan News: पैठणमध्ये दुहेरी संकट! गॅस टंचाईमुळे ‘इंडक्शन’चा वापर वाढला; वीज यंत्रणेवर ताण आल्याने शहर अंधारात

LPG टंचाईचे संकट टळणार! होर्मुजची सामुद्रधुनी ओलांडून 2 गॅसवाहू जहाजे भारताकडे रवाना; पाहा किती टन साठा येणार?
2

LPG टंचाईचे संकट टळणार! होर्मुजची सामुद्रधुनी ओलांडून 2 गॅसवाहू जहाजे भारताकडे रवाना; पाहा किती टन साठा येणार?

Middle East War: ‘तेलाचा साठा पुरेसा आहे, मात्र LPG चा पुरवठा…’; मध्य-पूर्वेतील संघर्षाबाबत क्रेंद सरकारचे मोठे विधान
3

Middle East War: ‘तेलाचा साठा पुरेसा आहे, मात्र LPG चा पुरवठा…’; मध्य-पूर्वेतील संघर्षाबाबत क्रेंद सरकारचे मोठे विधान

US Iran युद्धात Donal Trump यांनी टाकला ‘शांततेचा बाॅम्ब’! आता तरी ऊर्जा संकटातून दिलासा मिळणार का?
4

US Iran युद्धात Donal Trump यांनी टाकला ‘शांततेचा बाॅम्ब’! आता तरी ऊर्जा संकटातून दिलासा मिळणार का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.