Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ujjwala Yojana: मोदी सरकारची मोठी घोषणा! उज्ज्वला योजनेचा विस्ताराला मंजुरी, २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन

केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा विस्तार करत आणखी २५ लाख महिलांना मोफत एलपीजी कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 22, 2025 | 09:00 PM
मोदी सरकारची मोठी घोषणा! उज्ज्वला योजनेचा विस्ताराला मंजुरी (Photo Credit- X)

मोदी सरकारची मोठी घोषणा! उज्ज्वला योजनेचा विस्ताराला मंजुरी (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • मोदी सरकारची मोठी घोषणा!
  • उज्ज्वला योजनेचा विस्ताराला मंजुरी
  • २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
Pradhan Mantri Ujjwala Yojana: महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत, केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा (PMUY) विस्तार करत आणखी २५ लाख महिलांना मोफत एलपीजी (LPG) कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ही नवीन जोडणी (कनेक्शन) दिली जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, “नवरात्रीच्या या शुभप्रसंगी मी उज्ज्वला परिवाराशी जोडल्या गेलेल्या सर्व माता आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो. हा निर्णय केवळ त्यांना आनंदच देणार नाही, तर महिला सक्षमीकरणाच्या आमच्या संकल्पालाही बळकट करतो.”

PM Modi congratulates Ujjwala beneficiaries after Centre approves release of 25 lakh additional LPG connections under PMUY scheme Read @ANI Story | https://t.co/2Y4biLDbHW#PMModi #Ujjwalabeneficiaries #LPG pic.twitter.com/8PeRJI9HMs — ANI Digital (@ani_digital) September 22, 2025

उज्ज्वला परिवारातील सदस्यांची संख्या १०.६० कोटी होईल

उज्ज्वला योजनेअंतर्गत २५ लाख नवीन एलपीजी कनेक्शन जारी करण्याच्या या निर्णयावर केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ‘नवरात्रीच्या सुरुवातीसह, उज्ज्वला योजनेअंतर्गत २५ लाख मोफत गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महिलांप्रती देवी दुर्गा समान सन्मानाची आणखी एक ग्वाही आहे,’ असे पुरी यांनी म्हटले आहे. या नवीन २५ लाख कनेक्शनसह देशभरात उज्ज्वला कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढून १०.६० कोटी होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

PM Modi’s Letter: जीएसटी २.० लागू झाल्यावर पंतप्रधान मोदींचे जनतेला पत्र; देशाला संबोधनानंतर केले ‘हे’ खास आवाहन

एका कनेक्शनवर २,०५० रुपयांचा खर्च

हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले की, केंद्र सरकार प्रत्येक कनेक्शनवर २,०५० रुपये खर्च करेल, ज्यामुळे लाभार्थींना मोफत एलपीजी सिलिंडरसह गॅस शेगडी आणि रेग्युलेटरही मोफत मिळू शकेल. पुरी म्हणाले, “उज्ज्वला योजना ही केवळ एक योजना नसून, देशात एक मोठी क्रांती बनली आहे, ज्याची ज्योत देशाच्या कानाकोपऱ्यात, दुर्गम भागातही पोहोचली आहे. सध्या मोदी सरकारकडून मिळत असलेल्या ३०० च्या सबसिडीसह १०.३३ कोटींहून अधिक उज्ज्वला कुटुंबांना सिलिंडर फक्त ५५३ मध्ये मिळत आहे. ही किंमत जगभरातील एलपीजी उत्पादक देशांपेक्षाही कमी आहे.”

Web Title: Modi govt ujjwala yojana expansion 25 lakh women

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2025 | 09:00 PM

Topics:  

  • LPG gas cylinder
  • Nation News
  • PM Narendra Modi
  • Women

संबंधित बातम्या

Mallikarjun Kharge on PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींना ‘दहशतवादी’ संबोधल्याने वाद! खर्गेंचे स्पष्टीकरण, तर भाजप आक्रमक
1

Mallikarjun Kharge on PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींना ‘दहशतवादी’ संबोधल्याने वाद! खर्गेंचे स्पष्टीकरण, तर भाजप आक्रमक

LPG Gas Cylinder Booking : Gas Booking आणि Supply बाबत सरकारचा मोठा निर्णय; आता ग्राहकांची डोकेदुखी थांबणार?
2

LPG Gas Cylinder Booking : Gas Booking आणि Supply बाबत सरकारचा मोठा निर्णय; आता ग्राहकांची डोकेदुखी थांबणार?

कधी व कुठे चर्चा करायची? मोदींनाही चर्चेला बोलवा; प्रणिती शिंदेंनी CM फडणवीसांचे आव्हान स्वीकारले
3

कधी व कुठे चर्चा करायची? मोदींनाही चर्चेला बोलवा; प्रणिती शिंदेंनी CM फडणवीसांचे आव्हान स्वीकारले

Nanded News : महिला आरक्षण गेलं खड्डयात..; भाजपच्या पदाधिकाऱ्यांना ना खंत ना खेद
4

Nanded News : महिला आरक्षण गेलं खड्डयात..; भाजपच्या पदाधिकाऱ्यांना ना खंत ना खेद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.