Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mallikarjun Kharge on PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींना ‘दहशतवादी’ संबोधल्याने वाद! खर्गेंचे स्पष्टीकरण, तर भाजप आक्रमक

चेन्नई येथे आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना खर्गे यांनी पंतप्रधान मोदींविषयी हे विधान केले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी आपल्या या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 21, 2026 | 08:22 PM
पंतप्रधान मोदींना 'दहशतवादी' संबोधल्याने वाद! खर्गेंचे स्पष्टीकरण (Photo Credit- X)

पंतप्रधान मोदींना 'दहशतवादी' संबोधल्याने वाद! खर्गेंचे स्पष्टीकरण (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • पंतप्रधान मोदींना ‘दहशतवादी’ संबोधल्याने वाद!
  • खर्गेंचे स्पष्टीकरण
  • तर भाजप आक्रमक
Mallikarjun Kharge PM Modi Terrorist Remark: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी पंतप्रधान मोदींचा उल्लेख ‘दहशतवादी’ असा केल्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले. चेन्नई येथे आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना खर्गे यांनी पंतप्रधान मोदींविषयी हे विधान केले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी आपल्या या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले. भाजपने खर्गे यांच्या या विधानावरून काँग्रेसवर जोरदार टीका केली असून, काँग्रेस पक्ष इतक्या खालच्या पातळीवर घसरल्याबद्दल आपल्याला लाज वाटत असल्याचे भाजपने म्हटले आहे.

पत्रकार परिषदेत नक्की त्यांनी काय म्हटले होते?

पत्रकार परिषदेदरम्यान मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, “हे जे अण्णाद्रमुकचे (AIADMK) सदस्य आहेत जे स्वतः अण्णादुराई यांचे फोटो लावतात ते मोदींशी हातमिळवणी कशी करू शकतात? ते (मोदी) एक दहशतवादी आहेत. त्यांच्या पक्षाचा समता आणि न्यायावर विश्वास नाही. हे लोक त्यांच्याशी हातमिळवणी करत आहेत, याचाच अर्थ असा की ते लोकशाहीला कमकुवत करत आहेत.”

त्यानंतर दिलेले स्पष्टीकरण

पंतप्रधान मोदींविषयी केलेल्या ‘दहशतवादी’ या विधानाबाबत विचारणा केली असता, खर्गे यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांनी म्हटले की, आपल्या विधानाचा मूळ उद्देश असा होता की, पंतप्रधान मोदी आपल्या विरोधकांना ‘दहशतीत’ ठेवतात; कारण केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या इशाऱ्यावर काम करत आहेत.

#WATCH | Chennai, Tamil Nadu | Clarifying on his remark on PM Modi, Congress President Mallikarjun Kharge says, “He (PM Modi) is terrorising people and political parties. I never said he is a terrorist…What I mean, I want to clarify, is that Modi always threatens. The… pic.twitter.com/8ZLypQ7eZI — ANI (@ANI) April 21, 2026


आपली भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, “ते (पंतप्रधान मोदी) लोकांना आणि राजकीय पक्षांना धमकावत आहेत. मी असे कधीच म्हटले नाही की ते स्वतः एक दहशतवादी आहेत. मला हे स्पष्ट करायचे आहे की, मोदी सतत धमक्या देत असतात. ईडी (ED), आयकर विभाग (I-T) आणि सीबीआय (CBI) यांसारख्या संस्था त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत. ते अगदी मतदारसंघांच्या सीमा निश्चितीची प्रक्रियाही स्वतःच्या हातात घेण्याचा प्रयत्न करत आहेत.”

Women Reservation: ‘नारी शक्ती’ अद्याप प्रतीक्षेतच! महिला मतदारांचा टक्का वाढला, पण उमेदवार का घटले?

भाजपचे प्रत्युत्तर

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी पंतप्रधान मोदींविषयीच्या ‘दहशतवादी’ विधानावरून खर्गे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आणि त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. ते म्हणाले, “काँग्रेस पक्ष इतक्या खालच्या पातळीवर घसरल्याबद्दल आम्हाला लाज वाटते. त्यांनी लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या पंतप्रधानांना ‘दहशतवादी’ असे संबोधले आहे. त्यांची निवड जनतेने केली आहे. मी खर्गे यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करतो आणि पंतप्रधान मोदींचा, तसेच आपल्या देशातील जनतेचा अपमान केल्याबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी मागणी करतो.”

Web Title: Mallikarjun kharge calls pm modi terrorist bjp demands apology

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 08:22 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Mallikarjun Kharge
  • PM Narendra Modi
  • terrorist

संबंधित बातम्या

Wardha : भरपावसात गांधीगिरी ! पेपरफुटीवर काँग्रेसची आक्रमक भूमिका…
1

Wardha : भरपावसात गांधीगिरी ! पेपरफुटीवर काँग्रेसची आक्रमक भूमिका…

NEET Paper Leak Reaction: ‘नीट’वरून काँग्रेस रस्त्यावर, तर राहुल गांधीविरुद्ध भाजप आक्रमक; संभाजीनगरमध्ये फुल हायव्होल्टेज ड्रामा
2

NEET Paper Leak Reaction: ‘नीट’वरून काँग्रेस रस्त्यावर, तर राहुल गांधीविरुद्ध भाजप आक्रमक; संभाजीनगरमध्ये फुल हायव्होल्टेज ड्रामा

Congress Protest: विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या सरकारचा धिक्कार असो;  शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आक्रमक
3

Congress Protest: विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या सरकारचा धिक्कार असो; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आक्रमक

Dharmendra Pradhan: पेपरफुटीवरून सध्या टीकेचे धनी असलेले धर्मेंद्र प्रधान; 29 वर्षांपूर्वी याच मुद्द्यावर उतरले होते रस्त्यावर
4

Dharmendra Pradhan: पेपरफुटीवरून सध्या टीकेचे धनी असलेले धर्मेंद्र प्रधान; 29 वर्षांपूर्वी याच मुद्द्यावर उतरले होते रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.