Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दशरथ मांझींची नात लढवणार निवडणूक; राहुल गांधींकडे बोधगयामधून उमेदवारीची मागणी

बिहार विधानसभा निवडणुकांची चाहूल लागत असतानाच देशाचे प्रसिद्ध ‘माउंटन मॅन’ म्हणून ओळख असणारे दशरथ मांझी यांची नात अंशु कुमारी यांनी राजकारणात प्रवेश करण्याची तयारी दाखवली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 07, 2025 | 12:56 AM
दशरथ मांझींची नात लढवणार निवडणूक; राहुल गांधींकडे बोधगयामधून उमेदवारीची मागणी

दशरथ मांझींची नात लढवणार निवडणूक; राहुल गांधींकडे बोधगयामधून उमेदवारीची मागणी

Follow Us
Close
Follow Us:

बिहार विधानसभा निवडणुकांची चाहूल लागत असतानाच देशाचे प्रसिद्ध ‘माउंटन मॅन’ म्हणून ओळख असणारे दशरथ मांझी यांची नात अंशु कुमारी यांनी राजकारणात प्रवेश करण्याची तयारी दर्शवली आहे. त्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये बोधगया मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लढण्यास इच्छुक असून त्यांनी थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे तिकीटाची मागणी केली आहे.

Omar Abdullah : ‘जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा परत द्या’; PM मोदींच्या उपस्थितीत ओमर अब्दुलांची मागणी

राहुल गांधींनी नुकताच बिहारमधील गया जिल्ह्यातील गहलौर गावाला भेट दिली. हेच गाव दशरथ मांझी यांचे मूळ गाव आहे, जिथे त्यांनी आपल्या असामान्य संघर्षातून एकट्याने डोंगर फोडून रस्ता तयार केला होता. राहुल गांधींनी गहलौरमधील मांझी यांच्या स्मारकाला अभिवादन केले आणि त्यानंतर त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांशी संवाद साधला.या भेटीदरम्यान राहुल गांधींनी दशरथ मांझींचा मुलगा भागीरथ मांझी यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना राजगीरच्या दिशेने जाताना स्वतःच्या गाडीत सोबत नेले. या सन्मानाने मांझी कुटुंब भारावून गेले असून त्यांना राहुल गांधींकडून आणि काँग्रेस पक्षाकडून खूप अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.

भागीरथ मांझी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “माझ्या मुलीला अंशु कुमारीला राजकारणात येण्याची इच्छा आहे. ती बोधगया मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार आहे. आम्ही राहुल गांधींकडे काँग्रेस तिकिटाची मागणी केली आहे.”  कुमारी यांनीही सांगितले की, “दशरथ मांझी यांनी समाजासाठी अपार कष्ट घेतले. आता आम्ही त्यांचा वारसा पुढे नेत, समाजसेवेच्या माध्यमातून लोकांचे जीवन सुधारायचे आहे. जर काँग्रेसने तिकीट दिले तर मी पूर्ण ताकदीने लढेन.”

Bihar Election : बिहारमध्ये कॉंग्रेससाठी ‘करो या मरो’ ची स्थिती; गेल्या १० निवडणुकांमधील आकडेवारी टेन्शन वाढवणारी

सध्या बोधगया मतदारसंघातून राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) कुमार सर्बजीत हे आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेससमोर ही जागा मिळवण्यासाठी आघाडीतील जागावाटपात राजकीय समन्वय साधण्याचे आव्हान आहे. राहुल गांधींच्या या दौऱ्यामुळे गहलौर गावात एक वेगळाच उत्साह निर्माण झाला आहे. दशरथ मांझींच्या संघर्षाचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना राजकारणात संधी मिळावी अशी गावकऱ्यांची भावना आहे. आता काँग्रेस पक्ष अंशु कुमारीला तिकीट देऊन त्यांना विधानसभा निवडणुकीत उतरवतो का हे पाहणे महत्त्वाचं आहे.

Web Title: Mountain man dashrath manjhi grand daughter anshu kumari demands to rahul gandhi bihar vidhan sabha ticket in bodhgaya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2025 | 12:46 AM

Topics:  

  • Bihar Election
  • Congress
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

मामा राहिला बाजूला अन् भाच्याने उरकले लग्न: राहुल गांधी आले सलमानच्या रांगेत?
1

मामा राहिला बाजूला अन् भाच्याने उरकले लग्न: राहुल गांधी आले सलमानच्या रांगेत?

Karnatak News: EVMवर जनतेचा प्रचंड विश्वास; कर्नाटक काँग्रेस सरकारच्या सर्वेक्षणातून निष्कर्ष, भाजपचा राहुल गांधींवर हल्लाबोल
2

Karnatak News: EVMवर जनतेचा प्रचंड विश्वास; कर्नाटक काँग्रेस सरकारच्या सर्वेक्षणातून निष्कर्ष, भाजपचा राहुल गांधींवर हल्लाबोल

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले
3

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

Priyanka Gandhi Son : प्रियांका गांधी होणार सासू! मुलाच्या होणाऱ्या बायकोने केला होता जोरदार प्रचार
4

Priyanka Gandhi Son : प्रियांका गांधी होणार सासू! मुलाच्या होणाऱ्या बायकोने केला होता जोरदार प्रचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.