Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“फ्लाईट कॅन्सल झाली याचा मनस्ताप, पण…”; Indigo च्या सावळ्या गोंधळावर अमोल कोल्हे भडकले

आम्ही लग्नाला जात होतो, पण आमचे सामान गायब आहे. १२ तास उलटूनही, इंडिगो अजूनही प्रतिसाद देत नाही. हा मानसिक छळ आहे, असे एका प्रवाशाने सांगितले.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 05, 2025 | 02:57 PM
"फ्लाईट कॅन्सल झाली याचा मनस्ताप, पण..."; Indigo च्या सावळ्या गोंधळावर अमोल कोल्हे भडकले

"फ्लाईट कॅन्सल झाली याचा मनस्ताप, पण..."; Indigo च्या सावळ्या गोंधळावर अमोल कोल्हे भडकले

Follow Us
Close
Follow Us:

देशभरात इंडिगोच्या फ्लाइट्स रद्द 
अनेक राजकीय नेते, अभिनेत्यांनी व्यक्त केला संताप 
विलंब आणि उड्डाणे रद्द केल्याने प्रवाशांचा रोष वाढला

इंडिगो कंपनीच्या अनेक फ्लाइट्स रद्द झाल्याने देसभरातील प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. शेकडो फ्लाइट्स रद्द झाल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.  देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो सध्या मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करत आहे. गेल्या चार दिवसांपासून सतत होणाऱ्या विलंब आणि उड्डाणे रद्द केल्याने प्रवाशांचा रोष वाढला आहे. गुरुवारीच ५५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यावर खासदार अमोल कोल्हे यांनी देखील पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.

दिल्ली विमानतळावरील प्रवाशांनी एअरलाइनवर आपला राग व्यक्त केला. एका प्रवाशाने सांगितले की, “आम्ही लग्नाला जात होतो, पण आमचे सामान गायब आहे. १२ तास उलटूनही, इंडिगो अजूनही प्रतिसाद देत नाही. हा मानसिक छळ आहे.” दुसऱ्या एका महिला प्रवाशाने सांगितले की, “१४ तास झाले आहेत आणि आम्हाला अन्न किंवा पाणी मिळालेले नाही. मी कर्मचाऱ्यांशी बोलतो तेव्हा त्यांना प्रतिसादही मिळत नाही.”

खासदार अमोल कोल्हे यांची पोस्ट काय?

देशांतर्गत विमानसेवेच्या ‘सावळ्या गोंधळा’मुळे फ्लाईटला २ तास उशीर अन् मग ३ तासांनी फ्लाईट कॅन्सल..! सिस्टीम वेळ वाया घालवत असली तरी मी नाही! या अनपेक्षितपणे मिळालेल्या ‘निवांत वेळेत’ एक महत्त्वाचं लेखन पूर्ण केलं.

देशांतर्गत विमानसेवेच्या ‘सावळ्या गोंधळा’मुळे फ्लाईटला २ तास उशीर अन् मग ३ तासांनी फ्लाईट कॅन्सल..! सिस्टीम वेळ वाया घालवत असली तरी मी नाही! या अनपेक्षितपणे मिळालेल्या ‘निवांत वेळेत’ एक महत्त्वाचं लेखन पूर्ण केलं. 😀 ३ तासांनी फ्लाईट कॅन्सल झाली याचा मनस्ताप आहेच, पण होऊ दिला… pic.twitter.com/0zIbTtqdeO — Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 4, 2025

 

 ३ तासांनी फ्लाईट कॅन्सल झाली याचा मनस्ताप आहेच, पण होऊ दिला नाही याचं जास्त बरं वाटतंय..! इंडिगोकडून ही अपेक्षा नव्हती… यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच..! जय शिवराय.

राहुल गांधींनी सरकारला घेरले

भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने सलग तिसऱ्या दिवशी उड्डाणे रद्द करणे आणि विलंब करणे यावरून गोंधळ उडाला आहे. यामुळे राजकीय वाद देखील निर्माण झाला. सध्या संसदेमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. शुक्रवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आणि हे सरकारच्या “मोनोपॉली मॉडेल” आर्थिक धोरणांचे परिणाम असल्याचे म्हटले आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एका वृत्तपत्रातील एक लेख शेअर करताना राहुल गांधी यांनी लिहिले की इंडिगोचे संकट ही या सरकारच्या मक्तेदारी मॉडेलची किंमत आहे. सामान्य भारतीय पुन्हा एकदा उड्डाण विलंब, रद्दीकरण आणि असहाय्यतेचा सामना करत आहेत. प्रत्येक क्षेत्रात निष्पक्ष स्पर्धा हवी आहे, मॅच फिक्सिंगसारख्या मक्तेदारीचा नाही, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.

Indigo flights cancelled : Indigo च्या फाईट रद्द झाल्याने विमानतळावर उडाला सावळा गोंधळ; राहुल गांधींनी सरकारला घेरले

त्यांनी आरोप केला की देशातील संस्था आता सामान्य लोकांसाठी काम करत नाहीत, तर मक्तेदार गटांसाठी काम करत आहेत. लाखो छोटे व्यवसाय कोसळत आहेत आणि रोजगार निर्माण होत नाहीत. राहुल गांधी यांनी व्यावसायिकांवरही हल्ला चढवला आणि म्हटले की सरकार आणि मक्तेदारांच्या दबावामुळे त्यांना त्यांचे व्यवसाय विकावे लागत आहेत. त्यांना आयटी, सीबीआय आणि ईडीकडून छापे पडण्याची भीती वाटते.


Web Title: Mp amol kolhe post on indigo flight cancel airlines marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 02:43 PM

Topics:  

  • amol kolhe
  • IndiGo
  • indigo news

संबंधित बातम्या

राहुल वैद्यचे लाखो रुपये पाण्यात; अंजली अरोरा – निया शर्माचा ही झाला संताप; Indigo मुळे कलाकार अडचणीत
1

राहुल वैद्यचे लाखो रुपये पाण्यात; अंजली अरोरा – निया शर्माचा ही झाला संताप; Indigo मुळे कलाकार अडचणीत

ऐनवेळी इंडिगोची फ्लाईट रद्द, नवदाम्पत्याने स्वतःच्याच रिसेप्शनला लावली ऑनलाईन हजेरी; Video Viral
2

ऐनवेळी इंडिगोची फ्लाईट रद्द, नवदाम्पत्याने स्वतःच्याच रिसेप्शनला लावली ऑनलाईन हजेरी; Video Viral

Indigo flights cancelled : Indigo च्या फ्लाईट रद्द झाल्याने विमानतळावर उडाला सावळा गोंधळ; राहुल गांधींनी सरकारला घेरले
3

Indigo flights cancelled : Indigo च्या फ्लाईट रद्द झाल्याने विमानतळावर उडाला सावळा गोंधळ; राहुल गांधींनी सरकारला घेरले

Indigo flights cancelled : विमान रद्द केल्याने इंडिगो कंपनीचं निघालं दिवाळं! नुकसानीचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
4

Indigo flights cancelled : विमान रद्द केल्याने इंडिगो कंपनीचं निघालं दिवाळं! नुकसानीचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.