
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
विमान कंपनी निवडक ग्राहकांना प्रति PNR ₹१०,००० पर्यंतचे भाडे परत करेल. ही परतफेड ४ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट २०२६ दरम्यान केलेल्या देशांतर्गत बुकिंगसाठी लागू होईल. ही ऑफर फक्त इंडिगोच्या वेबसाइट, मोबाइल ॲप आणि एआय व्हर्च्युअल असिस्टंट ‘6Eskai’ यांसारख्या थेट माध्यमांद्वारे केलेल्या बुकिंगवरच लागू आहे. इंडिगोच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त ही ऑफर सुरू करण्यात आली आहे. इंडिगोने ४ ऑगस्ट २००६ रोजी गुवाहाटीमार्गे दिल्ली आणि इम्फाळ दरम्यान आपल्या पहिल्या विमानाने कामकाज सुरू केले. आज, कंपनीकडे ४३० हून अधिक विमानांचा ताफा असून ती दररोज अंदाजे २,२०० उड्डाणे चालवते.
ऑफरच्या कालावधीत जे पात्र असतील असे देशांतर्गत विमानप्रवास बुक करणाऱ्या ग्राहकांना निवड प्रक्रियेत समाविष्ट केले जाईल. निवडलेल्या ग्राहकांना एक ईमेल आणि व्हॉट्सॲप संदेश मिळेल, ज्यामध्ये त्यांना एका सोप्या प्रश्नाचे उत्तर देण्यास सांगितले जाईल. प्रत्येक निवडलेल्या ग्राहकाला अचूक उत्तर देण्यासाठी तीन संधी मिळतील. अचूक उत्तर देणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या बुकिंग शुल्काचा रिटर्न मिळणार आहे.
ही रक्कम प्रति PNR ₹10,000 पर्यंत असेल आणि रिटर्न तीन ते पाच कामकाजाच्या दिवसांत दिला जाईल. ही ऑफर इकॉनॉमी क्लास आणि इंडिगोस्ट्रेच या दोन्ही बुकिंगसाठी वैध आहे. यामध्ये देशांतर्गत मार्गांवरील एकेरी आणि परतीच्या प्रवासाचा समावेश आहे. इंडिगोने म्हटले आहे की, ही ऑफर कंपनीच्या वेबसाइटवर नमूद केलेल्या अटी व शर्तींनुसार असणार आहे.