Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Narendra Modi: ‘मी बाबा बागेश्वर नाही…’, IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना PM मोदींचा मिश्कील अंदाज

Narendra Modi: IIT दिल्लीच्या 57व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी भविष्यातील स्वप्नांचा उल्लेख करताना मोदींनी मिश्कीलपणे ‘मी बाबा बागेश्वर नाही, पण काहीतरी चाललं असेल’ असे म्हटले. विकसित भारतासाठी पुढील 30-35 वर्षांत योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 08, 2026 | 12:43 PM
‘मी बाबा बागेश्वर नाही...’, IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना PM मोदींचा मिश्कील अंदाज

‘मी बाबा बागेश्वर नाही...’, IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना PM मोदींचा मिश्कील अंदाज

Follow Us
Follow Us:
  • IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना PM मोदींचा मिश्कील अंदाज
  • ‘कालच IITमध्ये प्रवेश घेतल्यासारखं वाटतंय’
  • ‘जग वेगाने बदलत आहे’
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (8 ऑगस्ट 2026) IIT Delhiच्या 57व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोदी यांनी मिश्कील अंदाजात केलेल्या एका वक्तव्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला.

‘मी बाबा बागेश्वर नाही…’

दीक्षांत समारंभात बोलताना नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या मनात भविष्याबाबत सुरू असलेल्या विचारांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, आज सर्व विद्यार्थी दीक्षांत समारंभासाठी येथे उपस्थित आहेत; मात्र त्यांच्या मनात भविष्यासंदर्भात अनेक विचार सुरू असतील. यावेळी मिश्कीलपणे ते म्हणाले, “मी बाबा बागेश्वर तर नाही, पण काहीतरी चाललं असेल.” मोदी यांच्या या वक्तव्यावर विद्यार्थ्यांमध्ये हशा पिकला.

प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात भविष्याची वेगवेगळी चित्रे असतील, असेही त्यांनी सांगितले. काही विद्यार्थ्यांना पहिली नोकरी आणि पहिल्या पगाराची उत्सुकता असेल, तर काही जण स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करत असतील. काही विद्यार्थ्यांचे पुढील स्पर्धा परीक्षांचे लक्ष्य असेल. प्रत्येकाचे स्वप्न आणि ध्येय वेगळे असले तरी आजच्या दिवसाचा उत्साह सर्वांच्या मनात समान असल्याचे मोदी म्हणाले.

PM Narendra Modi: पंतप्रधानांच्या हस्ते IIT दिल्लीत ‘परम प्रज्ञा’ सुपरकंप्यूटर लॉन्च; काय आहेत याची वैशिष्ट्ये? जाणून घ्या

‘कालच IITमध्ये प्रवेश घेतल्यासारखं वाटतंय’

मोदी यांनी विद्यार्थ्यांना IIT दिल्लीतील त्यांच्या पहिल्या दिवसाची आठवण करून दिली. कालच ओरिएंटेशन कार्यक्रम झाला आणि पाहता पाहता दीक्षांत समारंभाचा दिवस आला, असे वाटत असेल, असे ते म्हणाले. आजपासून विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे, असे सांगत त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

‘जग वेगाने बदलत आहे’

पंतप्रधान मोदी यांनी तंत्रज्ञानामुळे जगात वेगाने होत असलेल्या बदलांवरही भाष्य केले. जागतिक व्यवस्थेत वेगाने बदल होत असून त्यामागे तंत्रज्ञान हा महत्त्वाचा घटक आहे, असे त्यांनी सांगितले. पुढील 20 ते 30 वर्षांत जगाचे स्वरूप कसे असेल, याचा अचूक अंदाज बांधणे कठीण आहे. तंत्रज्ञान बदलेल, जग बदलेल; मात्र या बदलत्या जगात जो सातत्याने शिकत राहील, तोच पुढे जाईल, असा संदेश मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला.

‘मेडल मिळवणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या आणखी वाढायला हवी’

IIT दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करताना मोदी यांनी पदक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मात्र यामध्ये विद्यार्थिनींची संख्या आणखी वाढायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. “काही विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीसाठी पदक मिळाले आहेत. मी तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. मात्र यात आणखी काही मुली असत्या तर आणखी चांगले झाले असते. फक्त एक-दोनच का? आणखी असायला हव्यात,” असे मोदी म्हणाले.

‘प्रत्येक पिढीचे स्वतःचे राष्ट्रीय कर्तव्य असते’

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्यपूर्व काळातील पिढीच्या संघर्षाचीही आठवण करून दिली. प्रत्येक पिढीसमोर एक विशिष्ट राष्ट्रीय कर्तव्य असते, असे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यपूर्व काळात देशाला गुलामगिरीतून मुक्त करणे हे त्या पिढीसमोरील सर्वात मोठे ध्येय होते. त्यासाठी असंख्य लोकांनी दीर्घकाळ संघर्ष केला, त्याग केला आणि बलिदान दिले. आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेत आहोत, त्यामागे त्या पिढीचा संघर्ष आणि त्याग आहे, असे मोदी यांनी नमूद केले.

‘पुढील 30-35 वर्षांत तुमच्या कामाचा देशावर परिणाम होईल’

आजच्या पिढीसमोरील आव्हाने वेगळी असल्याने तिची जबाबदारीही वेगळी आहे, असे मोदी म्हणाले. विद्यार्थ्यांनी पुढील 30 ते 35 वर्षे जे काम केले, त्याचा विकसित भारताच्या प्रवासावर परिणाम होणार आहे. त्यामुळे प्रत्येक निर्णय घेताना “यामुळे देशाला काय फायदा होईल आणि देशाची कोणती गरज पूर्ण होईल?” याचा विचार करण्याचे आवाहन मोदी यांनी IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांना केले.

विद्यार्थ्यांना मोदींचा संदेश

एकूणच, IIT दिल्लीच्या दीक्षांत समारंभात नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना केवळ करिअरच्या दृष्टीने नव्हे, तर देशाच्या भविष्यातील योगदानाच्या दृष्टीनेही विचार करण्याचा संदेश दिला. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात सतत शिकत राहणे, स्वतःची स्वप्ने पूर्ण करणे आणि त्याचवेळी विकसित भारताच्या निर्मितीत योगदान देणे, हीच पुढील पिढीची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोदी-शहा भेटीमागचं खरं कारण काय? सुनील तटकरेंचा मोठा खुलासा, राजकीय भेटींमुळे तर्कवितर्कांना उधाण

Web Title: Narendra modi iit delhi convocation baba bageshwar comment students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 12:43 PM

Topics:  

  • delhi
  • narendra modi

संबंधित बातम्या

Youth Innovation : DTU ची नवी योजना जाहीर! गावातील समस्यांवर शोधा उपाय अन् मिळवा कोटींचे बक्षीस
1

Youth Innovation : DTU ची नवी योजना जाहीर! गावातील समस्यांवर शोधा उपाय अन् मिळवा कोटींचे बक्षीस

DUSU Election Result 2026: DUSU निवडणुकीत ABVPचे यश; अध्यक्ष, सचिव अन् संयुक्त सचिवपद जिंकले, उपाध्यक्षपदी दीपांशु शौकीन
2

DUSU Election Result 2026: DUSU निवडणुकीत ABVPचे यश; अध्यक्ष, सचिव अन् संयुक्त सचिवपद जिंकले, उपाध्यक्षपदी दीपांशु शौकीन

Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?
3

Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?

Delhi Crime: दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार अन् नंतर…
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार अन् नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.