Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Constitutional Amendment: १३० व्या घटनादुरुस्ती विधेयकावरून देशात नवा राजकीय वाद; विरोधकांचा बहिष्कार

Constitutional Amendment : ऑगस्ट २०२५ मध्ये सादर झालेल्या या विधेयकात अशी तरतूद होती की, पंतप्रधान, मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांनी अटकेच्या ३१ व्या दिवसापर्यंत राजीनामा दिला नाही, तर त्यांना आपोआप पदावरून हटवले जाईल

  • By anuradha sagar
Updated On: Jul 13, 2026 | 04:56 PM
'महाराष्ट्राला 3 वर्षांत 520 कोटींचा निधी'; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांची राज्यसभेत माहिती

'महाराष्ट्राला 3 वर्षांत 520 कोटींचा निधी'; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांची राज्यसभेत माहिती

Follow Us
Follow Us:

130th Constitutional Amendment:  पंतप्रधान, केंद्रीय मंत्री किंवा मुख्यमंत्री यांना गंभीर गुन्ह्याच्या आरोपाखाली सलग ३० दिवस कोठडीत ठेवले तर त्यांना पदावरून हटवण्याऐवजी निलंबित केले जावे, अशी शिफारस एका संसदीय समितीने केली आहे. विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध करूनही ही शिफारस केली आहे. समितीने अशीही एक प्रणाली प्रस्तावित केली आहे, ज्यानुसार अशा व्यक्ती आरोपातून निर्दोष सुटल्यास किंवा विहित कालावधीत खटल्याची सुनावणी न झाल्यास, निलंबन आपोआप संपुष्टात येईल.

१३० व्या घटनादुरुस्ती विधेयकाचा आढावा घेणाऱ्या संसदेच्या संयुक्त समितीने दोन विशिष्ट आणि तीन सामान्य शिफारसी केल्या. ऑगस्ट २०२५ मध्ये सादर झालेल्या या विधेयकात अशी तरतूद होती की, पंतप्रधान, मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांनी अटकेच्या ३१ व्या दिवसापर्यंत राजीनामा दिला नाही, तर त्यांना आपोआप पदावरून हटवले जाईल. तथापि, विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोधी पक्षांच्या नेतृत्वाखालील सरकारे अस्थिर करण्याचे एक साधन म्हटले होते. बहुतेक विरोधी पक्षांनी विधेयकाचा आढावा घेणाऱ्या संयुक्त समितीपासून स्वतःला दूर ठेवले.

Gyanvapi Case: ज्ञानवापी, मथुरा अन् संभल वादात मध्यस्थीचा प्रस्ताव फेटाळला; हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षांचा ‘या’ कारणासाठी नकार

संसदीय समितीचा अहवाल लवकरच मंजूर होण्याची शक्यता आहे. आपल्या अहवालात, समितीने असा प्रस्ताव दिला आहे की, ‘गंभीर फौजदारी आरोपांचा सामना करणाऱ्या मंत्र्यांना कायदेशीर कार्यवाही पूर्ण होईपर्यंत पदावरून कायमस्वरूपी दूर करण्याऐवजी निलंबित करावे. या संरक्षणामुळे संबंधित नेत्याला पुनर्नियुक्तीची संधी मिळू शकते.

सरकार तुरुंगातून चालवण्यास प्रतिबंध

संयुक्त समितीने असेही म्हटले आहे की, प्रस्तावित कायद्यात पाच वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षेच्या गुन्ह्यांसाठी एक स्वतंत्र अनुसूची असावी, जेणेकरून निलंबनास कारणीभूत ठरू शकणारे गुन्हे स्पष्टपणे ओळखता येतील, सरकार तुरुगातून चालवले जाऊ नये, है सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने हे विधेयक सादर करण्यात आले, शिफारसी स्वीकारल्यास, गृह मंत्रालय प्रस्तावित सुधारणासह केंद्रीय मंत्रिमंडळाकडे जाईल आणि त्यानंतर सुधारणा विधेयक लोकसभेत अधिकृतपणे सादर केले जाईल.

निर्दोष मुक्तता किंवा विलंब झाल्यास निलंबन आपोआप संपणार

समितीने निलंबनाबाबत महत्त्वाची तरतूदही सुचवली आहे. एखाद्या मंत्र्याची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता झाल्यास किंवा निर्धारित कालावधीत खटल्याची सुनावणी पूर्ण झाली नाही, तर त्यांचे निलंबन आपोआप संपुष्टात यावे, अशी शिफारस करण्यात आली आहे. समितीच्या मते, या तरतुदीमुळे निर्दोष ठरलेल्या व्यक्तींना पुन्हा पदावर नियुक्तीची संधी मिळेल आणि त्यांच्यावर कायमस्वरूपी अन्याय होणार नाही.

Ayodhya Ram Mandir : राम मंदिर ट्रस्ट अडचणीत? सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली, एसआयटीचा अहवाल मागवला

जलदगती न्यायालयांत खटले चालविण्याचीही सूचना

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा हवाला देत समितीने उच्च घटनात्मक पदांवरील व्यक्तींशी संबंधित गुन्हेगारी प्रकरणांची सुनावणी जलदगती किंवा विशेष न्यायालयांमध्ये करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे अशा प्रकरणांचा लवकर निकाल लागण्यास मदत होईल, असे समितीचे मत आहे.

पुढील प्रक्रिया काय?

समितीच्या शिफारसी सरकारने स्वीकारल्यास गृह मंत्रालय आवश्यक सुधारणा करून प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवेल. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित सुधारणा विधेयक लोकसभेत सादर केले जाण्याची शक्यता आहे. सरकारचे कामकाज प्रभावीपणे सुरू राहावे आणि गंभीर फौजदारी आरोपांचा सामना करणाऱ्या व्यक्तींमुळे प्रशासनावर परिणाम होऊ नये, हा या प्रस्तावामागील प्रमुख उद्देश आहे.

 

Web Title: National news parliamentary committee recommends suspension instead of removal for pm cms in custody

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • national news
  • prime minister

संबंधित बातम्या

BRICS SUMMIT : इंडोनेशिया, फिलीपिन्ससह अनेक देशांतील सर्वोच्च नेते भारतात दाखल; चीनचे जिनपिंगही येणार
1

BRICS SUMMIT : इंडोनेशिया, फिलीपिन्ससह अनेक देशांतील सर्वोच्च नेते भारतात दाखल; चीनचे जिनपिंगही येणार

मोठी बातमी ! आज अनेक बँका राहणार बंद; विविध मागण्यांसाठी बँक कर्मचारी देशव्यापी संपावर
2

मोठी बातमी ! आज अनेक बँका राहणार बंद; विविध मागण्यांसाठी बँक कर्मचारी देशव्यापी संपावर

Eton College UK: कुठली आहे प्रिन्स जॉर्जची ही खास शाळा? जिथे ब्रिटनचे २० पंतप्रधान शिकलेत
3

Eton College UK: कुठली आहे प्रिन्स जॉर्जची ही खास शाळा? जिथे ब्रिटनचे २० पंतप्रधान शिकलेत

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा
4

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.