Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today:१४ राज्यांमध्ये वादळी पावसासह ‘हाय अलर्ट’; ताशी ७५ किमी वेगाने वारे वाहणार

पुढील १२ तासांत काही राज्यांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी ७५ किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे. या वादळी वाऱ्यांमुळे झाडे पडणे किंवा मालमत्तेचे नुकसान होण्याचा धोका लक्षात घेता संबंधित भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 13, 2026 | 09:30 AM
LIVE
Maharashtra Breaking News Updates Today

Maharashtra Breaking News Updates Today

Follow Us
Follow Us:
  • 13 Jul 2026 09:59 AM (IST)

    13 Jul 2026 09:59 AM (IST)

    पवित्र पोर्टलअभावी पालिका शाळांना शिक्षक मिळेना!

    मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे मोठे दावे केले जात असतानाच, दुसरीकडे मात्र शिक्षक भरतीचा पुरता बोजवारा उडाला आहे. राज्य सरकारच्या ‘पवित्र पोर्टल’च्या अत्यंत संथ आणि ढिसाळ कारभारामुळे मुंबई महापालिका शाळांमधील सुमारे १,२०० शिक्षकांची भरती गेल्या अनेक वर्षांपासून रखडली असल्याची माहिती समोर आली आहे. नियमानुसार शिक्षकांची सर्व भरती केवळ या सर्वसमावेशक शासकीय पोर्टलद्वारेच करणे बंधनकारक असल्याने महापालिका प्रशासनाचे हात पूर्णपणे बांधले गेले आहेत.

  • 13 Jul 2026 09:50 AM (IST)

    13 Jul 2026 09:50 AM (IST)

    देशात गेल्या १० वर्षांत ९४ हजार सरकारी शाळांना कुलूप

    Government Schools Closed India : सरकारी शाळांबाबत समोर आलेल्या एका नवीन रिपोर्टने देशभराचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या १० वर्षांत भारतात मोठ्या संख्येने सरकारी शाळा बंद झाल्या आहेत. यासोबतच सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या संख्येतही मोठी घट नोंदवली गेली आहे. नीती आयोगाच्या (Niti Aayog) अहवालानुसार, दोन किंवा त्यापेक्षा जास्त शाळांचे एकमेकांमध्ये विलीनीकरण करणे, घटणारा जन्मदर आणि उच्च वर्गातील (बड्या वर्गातील) विद्यार्थ्यांना शाळेत टिकवून ठेवण्याचे आव्हान ही या बदलाची प्रमुख कारणे आहेत. या अहवालात सरकारी आणि खाजगी शाळांची संख्या, विद्यार्थ्यांचे नावनोंदणी आणि ड्रॉपआउट (शाळा सोडणे) याशी संबंधित अनेक महत्त्वाचे आकडे समोर आले आहेत.

  • 13 Jul 2026 09:40 AM (IST)

    13 Jul 2026 09:40 AM (IST)

    महेश मांजरेकरांच्या पत्नी मेधा मांजरेकरांचा कॅन्सरशी लढा

    Medha Manjrekar :मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पत्नी तसेच अभिनेत्री आणि निर्माती मेधा मांजरेकर यांनी नुकत्याच केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मेधा यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपल्याला कर्करोगाचे निदान झाल्याची माहिती दिली. सेच उपचारादरम्यानचा भावनिक प्रवास आणि या काळात साथ देणाऱ्या प्रत्येकाचे त्यांनी मनापासून आभार मानले.

  • 13 Jul 2026 09:30 AM (IST)

    13 Jul 2026 09:30 AM (IST)

    Thailand Nightclub  Fire: बँकॉकच्या पबमध्ये मध्यरात्री भीषण आग; २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ जखमी

    Thailand Nightclub  Fire: थालँडची राजधानी बँकॉकमधून एक अत्यंत धक्कादायक आणि भयंकर घटना समोर आली आहे. येथील एका पबमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीत २७ जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अग्नितांडवामध्ये ६३ जण गंभीर जखमी झाले असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    मृतांचा आकडा वाढण्याची भीती मिळालेल्या माहितीनुसार, आगीची भीषणता एवढी मोठी होती की पबमधील लोकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. जखमी झालेल्या ६३ जणांना तात्काळ वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, या जखमींपैकी २२ जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

  • 13 Jul 2026 09:30 AM (IST)

    13 Jul 2026 09:30 AM (IST)

    प्रवेशबंदी झुगारून गेलेले दोन पर्यटक पाण्यात बुडाले

    रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध देवकुंड धबधब्यावर प्रशासनाने लागू केलेली प्रवेशबंदी झुगारून चोरवाटेने धबधब्याकडे गेलेल्या पर्यटकांवर काळाने घाला घातला. पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसी परिसरातील विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या २६ जणांच्या गटातील दोन तरुण रविवारी दुपारी पाण्यात बुडाले. सायंकाळपर्यंत त्यांचा शोध लागला नसल्याने अंधारामुळे शोधमोहीम स्थगित करण्यात आली असून सोमवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे.

  • 13 Jul 2026 09:25 AM (IST)

    13 Jul 2026 09:25 AM (IST)

    Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण योजने'तून तब्बल ९२ लाख महिलांची नावे वगळली 

    Ladki Bahin Yojana : राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि बहुचर्चित असलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'तून एक धक्कादायक आणि अत्यंत मोठी आकडेवारी समोर आली आहे. राज्य सरकारने राबवलेल्या विशेष डिजिटल पडताळणी मोहिमेनंतर (Digital Purge) या योजनेच्या लाभार्थी यादीतून आतापर्यंत तब्बल ९२ लाख महिलांची नावे वगळण्यात आली आहेत. अवघ्या महिनाभरापूर्वी सरकारने सुमारे ८० लाख लाभार्थी कमी झाल्याचे म्हटले होते, मात्र ई-केवायसी (e-KYC) आणि अपात्रतेच्या छाननीनंतर हा आकडा आता ९२ लाखांवर पोहोचला आहे. मूळ २.४ कोटी लाभार्थ्यांच्या तुलनेत ही घट तब्बल ३८ टक्के एवढी मोठी आहे.

  • 13 Jul 2026 09:20 AM (IST)

    13 Jul 2026 09:20 AM (IST)

    शेअर बाजारात अस्थिरतेचे संकेत

    जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, आज १३ जुलै रोजी घसरणीसह उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण अमेरिका-इराण युद्धातील वाढ आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील अनिश्चिततेमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे आणि महागाईची भीती वाढली आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-डाउन सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास २०७ पॉइंट्सच्या डिस्काउंटवर, २४,०३४ च्या पातळीवर ट्रेड करत होता.

  • 13 Jul 2026 09:10 AM (IST)

    13 Jul 2026 09:10 AM (IST)

    -चांदीच्या दरात मोठी उलथापालथ

    भारतात 13 जुलै रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,432 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,229 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,824 रुपये आहे. भारतात 13 जुलै रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,32,290 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,44,320 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,08,240 रुपये आहे. भारतात 13 जुलै रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 234.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,34,900 रुपये आहे.

  • 13 Jul 2026 09:05 AM (IST)

    13 Jul 2026 09:05 AM (IST)

    Aaditya Thackeray: 'खरे देशद्रोही भाजपावालेच';  आदित्य ठाकरेंचा घणाघात

    Aaditya Thackeray: "खरे हिंदूद्रोही आणि खरे देशद्रोही हे भाजपावालेच आहेत. जर हिम्मत असेल तर पहिले जाऊन अयोध्येमध्ये भाजपने मंदिराला का लुटलं, याच्यावर प्रश्न विचारण्याची हिम्मत दाखवा," अशी घणाघाती टीका शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. राम मंदिर हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे बनले असून, भाजपने यासाठी ना शासन केले ना कायदा आणला, तरीही भाजप याचे क्रेडिट लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला त्यांनी लगावला. भाजपच्या धार्मिक धोरणांवर सडकून टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, वाराणसीमध्ये अनेक मंदिरे कॉरिडॉरच्या नावाखाली सपाट करण्यात आली आहेत. तसेच कालच उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी काली मातेचे मंदिर पाडल्याचा आरोप त्यांनी केला.

  • 13 Jul 2026 09:00 AM (IST)

    13 Jul 2026 09:00 AM (IST)

    Nitin Gadkari on Ethanol Fuel: 'इथेनॉलविरोधी सोशल मीडिया मोहीम ही पेड कॅम्पेन';  नितीन गडकरींचा इंधन आयातदारांवर गंभीर आरोप

    Nitin Gadkari on Ethanol Fuel: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा इंधनातील इथेनॉल (Ethanol) आणि जैवइंधनाच्या (Biofuel) वापराचे जोरदार समर्थन केले आहे. एका वृत्तवाहिनीच्या विशेष सन्मान सोहळ्यामध्ये बोलताना त्यांनी, इथेनॉल वापराच्या केंद्र सरकारच्या धोरणावर सोशल मीडियावरून होणारी टीका ही 'पेड कॅम्पेन' (पुरस्कृत मोहीम) असल्याचा थेट आरोप केला. ही मोहीम देशातील इंधन आयात करणाऱ्या मोठ्या लॉबीकडून आणि घटकांकडून चालवली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    २२ लाख कोटींची इंधन आयात आणि वाढते प्रदूषण

    आपल्या भूमिकेचे ठासून समर्थन करताना नितीन गडकरी म्हणाले की, भारत दरवर्षी तब्बल २२ लाख कोटी रुपयांचे फॉसिल फ्युएल म्हणजेच पेट्रोल, डिझेल आणि गॅस परदेशातून आयात करतो. देशातील एकूण वायू प्रदूषणापैकी ४० टक्के प्रदूषण हे केवळ वाहनांमुळे होते. केंद्रीय परिवहन मंत्री या नात्याने या समस्येचे गांभीर्य मला ठाऊक असून, यावर जैवइंधन हाच एकमेव उत्तम पर्याय आहे.

  • 13 Jul 2026 08:55 AM (IST)

    13 Jul 2026 08:55 AM (IST)

    मुंबई हादरली! ७ वर्षांच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा अत्याचार

    मुंबई: मुंबईतील पायधुनी परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका इमारतीमध्ये वॉशरुमसाठी गेलेल्या ७ वर्षीय निष्पाप मुलीवर तेथील सुरक्षारक्षकाने अमानुष लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या पाशवी कृत्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे.

    घटनेची माहिती मिळताच शेकडो रहिवासी रस्त्यावर उतरले. संतप्त जमावाने थेट पायधुनी पोलीस ठाण्याबाहेर एकत्र येत जोरदार निदर्शने केली आणि मुख्य रस्ता अडवून धरत ‘रास्तारोको’ केला. यामुळे परिसरातील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सध्या पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • 13 Jul 2026 08:50 AM (IST)

    13 Jul 2026 08:50 AM (IST)

    Vinayak Raut Family Dispute Case:  सून गिरीजा राऊत यांच्या तक्रारीनंतर विनायक राऊतांना दिलासा 

    Vinayak Raut Family Dispute Case: शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून गिरीजा राऊत यांनी दाखल केलेल्या कौटुंबिक छळ आणि जादूटोणा विरोधी गुन्ह्याप्रकरणी एक महत्त्वाची कायदेशीर घडामोडी समोर आली आहे. याप्रकरणी विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने या अर्जावरील पुढील सुनावणी आता २३ जुलै रोजी निश्चित केली असून, तोपर्यंत विनायक राऊत आणि त्यांचे सुपुत्र गितेश राऊत यांची कोणतीही पोलीस चौकशी होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राऊत कुटुंबीयांना तात्पुरता मोठा दिलासा मिळाला आहे.

Maharashtra to National And International Breaking News:

Monsoon Rain Alert : १४ राज्यांमध्ये वादळी पावसासह ‘हाय अलर्ट’; ताशी ७५ किमी वेगाने वारे वाहणार

Monsoon Rain Alert : दोन दिवसांपूर्वीपर्यंत उत्तर भारतातील राज्यांमध्ये मुसळधार धुमाकूळ घालणारा मान्सूनचा पाऊस आता पुन्हा एकदा ओसरताना दिसत आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये सध्या पावसाची चिन्हे नसून, मान्सूनचा हंगाम सुरू असतानाही राजस्थानच्या बहुतांश भागांत नागरिकांना कडक उन्हाच्या तडाख्याचा सामना करावा लागत आहे. मात्र, एकीकडे हा दिलासा असतानाच, भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील १४ राज्यांमध्ये वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा तीव्र इशारा (हाय अलर्ट) जारी केला आहे.

पुढील १२ तास अत्यंत महत्त्वाचे; ताशी ७५ किमी वेगाने वाऱ्याचा इशारा

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील १२ तासांत काही राज्यांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी ७५ किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे. या वादळी वाऱ्यांमुळे झाडे पडणे किंवा मालमत्तेचे नुकसान होण्याचा धोका लक्षात घेता संबंधित भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या मान्सूनचा मुख्य पट्टा हरियाणा आणि उत्तर प्रदेशपासून थेट मणिपूरपर्यंत विस्तारलेला आहे.

Web Title: 13 july 2026 live breaking news marathi maharashtra politics national sports maharashtra monsoon rain alert cjp protest supreme court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 08:39 AM

Topics:  

  • international news
  • maharashtra breaking news
  • national news

संबंधित बातम्या

Phu Quoc Island: 5 मिनिटात पोहोचली मदत, तरीही 15 भारतीयांनी गमावला जीव; व्हिएतनाममधील भीषण अपघाताने देश हादरला
1

Phu Quoc Island: 5 मिनिटात पोहोचली मदत, तरीही 15 भारतीयांनी गमावला जीव; व्हिएतनाममधील भीषण अपघाताने देश हादरला

Contempt of Court: बूट भिरकावण्यापासून ते अपशब्दांपर्यंत! सर्वोच्च न्यायालयातील ‘त्या’ घटनांमुळे कोर्टाचा अवमानाचा मुद्दा चर्चेत
2

Contempt of Court: बूट भिरकावण्यापासून ते अपशब्दांपर्यंत! सर्वोच्च न्यायालयातील ‘त्या’ घटनांमुळे कोर्टाचा अवमानाचा मुद्दा चर्चेत

Maharashtra Breaking News Updates Today: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार टाकणार मोठा डाव?
3

Maharashtra Breaking News Updates Today: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार टाकणार मोठा डाव?

US Iran War: आज रात्री अमेरिका इराणचा गेम करणार? Donald Trump यांचा इराणवर हल्ला करण्याचा इशारा; जगाची धाकधूक वाढली
4

US Iran War: आज रात्री अमेरिका इराणचा गेम करणार? Donald Trump यांचा इराणवर हल्ला करण्याचा इशारा; जगाची धाकधूक वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.