Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Contempt of Court: बूट भिरकावण्यापासून ते अपशब्दांपर्यंत! सर्वोच्च न्यायालयातील ‘त्या’ घटनांमुळे कोर्टाचा अवमानाचा मुद्दा चर्चेत

Contempt of Court : भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 129 नुसार, सर्वोच्च न्यायालय हे 'कोर्ट ऑफ रेकॉर्ड' (Court of Record) आहे. त्यामुळे न्यायालयाला स्वतःच्या अवमानासाठी कोणत्याही व्यक्तीला शिक्षा करण्याचा अधिकार आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 11, 2026 | 12:57 PM
CJI Abuse Case, Contempt of Court Act 1971, Supreme Court,

CJI Abuse Case, Contempt of Court Act 1971, Supreme Court,

Follow Us
Follow Us:
  • एका वकीलाने  न्यायाधीशांवर कागदपत्रे उधळत सरन्यायाधिशांबाबत अपशब्द उच्चारले
  • न्यायप्रक्रियेत अडथळा निर्माण करणारे कृत्य करणे हे कोर्टाचा अवमान
  • न्यायालयाला स्वतःच्या अवमानासाठी कोणत्याही व्यक्तीला शिक्षा करण्याचा अधिकार आहे.
 

Contempt of Court: सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी सुरू असतानाच एका वकीलाने समोर बसलेल्या न्यायाधीशांवर कागदपत्रे उधळत सरन्यायाधिशांना अपशब्द उच्चारले. या प्रकरणाने सर्वोच्च न्यायालयात य काही वेळासाठी चांगलाच गोंधळ उडाला होता. काही महिन्यांपूर्वीदेखील न्यायालयात असाच प्रकार घडला होता. एका ज्येष्ठ वकिलाने थेट सरन्यायाधिशांच्या दिशेने बूट भिरकावला होता. पण न्यायालयाने या दोघावरही कोणतीही कारवाई करणार नसल्याचे स्पष्ट केले. या घटनांमुळे न्यायालयाची अवमानना चा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

न्यायालयाचा अवमान म्हणजे काय?

न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करणे किंवा न्यायप्रक्रियेत अडथळा निर्माण करणारे कृत्य करणे हे कोर्टाचा अवमान (Contempt of Court) मानले जाते. अशा प्रकरणांवर कारवाई करण्यासाठी ‘कोर्टाचा अवमान अधिनियम, 1971’ लागू करण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 129 आणि अनुच्छेद 142(2) मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानासंदर्भातील अधिकार स्पष्ट करण्यात आले आहेत.

भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 129 नुसार, सर्वोच्च न्यायालय हे ‘कोर्ट ऑफ रेकॉर्ड’ (Court of Record) आहे. त्यामुळे न्यायालयाला स्वतःच्या अवमानासाठी कोणत्याही व्यक्तीला शिक्षा करण्याचा अधिकार आहे.

‘कोर्ट ऑफ रेकॉर्ड’ म्हणजे न्यायालयातील सर्व कार्यवाही, आदेश आणि नोंदी या अधिकृत व कायमस्वरूपी अभिलेख म्हणून जतन केल्या जातात. या नोंदींच्या सत्यतेवर प्रश्न उपस्थित करता येत नाही. त्यामुळे या अभिलेखांच्या विश्वासार्हतेला धक्का पोहोचवणारे कृत्य किंवा विधान न्यायालयाचा अवमान मानले जाऊ शकते.

Supreme Court News: कागदपत्रे उधळली, सरन्यायाधीशांविरोधात अपशब्द…! सुप्रीम कोर्टात वकीलाचा पुन्हा हायव्होल्टेज ड्रामा

कोर्टाचा अवमान ठरण्यासाठी आवश्यक बाबी

कोणत्याही व्यक्तीला न्यायालयाच्या अवमानासाठी दोषी ठरविण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण होणे आवश्यक आहे.

दिवाणी अवमान: हा न्यायालयाच्या कोणत्याही निर्णयाचे, हुकूमनाम्याचे, निर्देशाचे, आदेशाचे, रिटचे किंवा इतर प्रक्रियेचे हेतुपुरस्सर उल्लंघन करणे किंवा न्यायालयाला दिलेल्या आश्वासनाचा हेतुपुरस्सर भंग करणे होय.

फौजदारी अवमान:  कोणत्याही बाबीचे प्रकाशन किंवा इतर कोणत्याही कृतीचा समावेश होतो, ज्यामुळे न्यायालयाच्या अधिकाराला कमीपणा येतो किंवा त्याला कलंक लागतो, किंवा कोणत्याही न्यायिक कार्यवाहीच्या योग्य प्रक्रियेत हस्तक्षेप होतो, किंवा इतर कोणत्याही प्रकारे न्यायदानाच्या कार्यात अडथळा येतो.

शिक्षेची तरतूद:

संविधानातील कलम १२ अंतर्गत सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) आणि उच्च न्यायालय (High Court) अवमान करणाऱ्यास ६ महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास, रु. २,००० पर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. घटनेच्या कलम १२९ व २१५ अंतर्गत या न्यायालयांना स्वतःच्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचे विशेष अधिकार (Inherent Powers) देण्यात आले आहेत

मात्र, आरोपीने प्रामाणिकपणे माफी मागितली आणि ती न्यायालयाला समाधानकारक वाटल्यास त्याला माफी दिली जाऊ शकते किंवा शिक्षा रद्द केली जाऊ शकते. केवळ माफी सशर्त असल्याच्या कारणावरून ती फेटाळली जाणार नाही.

Supreme Court News: बाल लैंगिक शोषणाची तक्रार दडपणे पडणार महाग! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

2006 च्या दुरुस्तीनंतर बदलेल्या तरतुदी ?

कोर्टाचा अवमान (दुरुस्ती) अधिनियम, 2006 अंतर्गत कलम 13 मध्ये महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या.

कलम 13(अ) नुसार, अवमानामुळे न्यायप्रक्रियेत गंभीर अडथळा निर्माण झाला आहे किंवा होण्याची शक्यता आहे, याची खात्री झाल्याशिवाय न्यायालय शिक्षा सुनावणार नाही.

कलम 13(ब) नुसार, संबंधित व्यक्तीने कृती जनहितासाठी करण्यात आली असल्यास आणि बचाव प्रामाणिकपणे मांडला गेला असल्यास, न्यायालय सत्याच्या आधारे बचावाचा स्वीकार करू शकते.

 

Web Title: Httpswwwnavarashtracomindiasupreme court overturns principal acquittal in school pocso case section 21 1275816html

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • Contempt Of Court
  • national news
  • Supreme Court of India

संबंधित बातम्या

‘5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्षही त्यांचाच होणार का?’; देवदत्त कामतांचा सुप्रीम कोर्टात थेट सवाल, ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद
1

‘5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्षही त्यांचाच होणार का?’; देवदत्त कामतांचा सुप्रीम कोर्टात थेट सवाल, ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद

Supreme Court News: मुलांना स्व-अर्जित संपत्तीतून बाहेर काढण्याचा पालकांना अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
2

Supreme Court News: मुलांना स्व-अर्जित संपत्तीतून बाहेर काढण्याचा पालकांना अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court : कोण आहेत कोस्ट गार्डच्या साहसी अधिकारी प्रियंका त्यागी? ज्यांच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला जाब विचारला!
3

Supreme Court : कोण आहेत कोस्ट गार्डच्या साहसी अधिकारी प्रियंका त्यागी? ज्यांच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला जाब विचारला!

Shivsena Symbol Disqualification Hearing: आम्ही शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? न्यायमूर्तींचा महत्त्वाचा प्रश्न
4

Shivsena Symbol Disqualification Hearing: आम्ही शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? न्यायमूर्तींचा महत्त्वाचा प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.