Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sonam Wangchuk Demands Accepted: केंद्र सरकारने सोनम वांगचुक यांच्या कोणत्या तीन अटी मान्य केल्या?

केंद्र सरकारच्या या आश्वासनानंतर आणि वरिष्ठ मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आणि मागण्यांना मोठे यश मिळाले असल्याचे मानले जात आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 24, 2026 | 10:03 AM
Sonam Wangchuk Demands Accepted: केंद्र सरकारने सोनम वांगचुक यांच्या कोणत्या तीन अटी मान्य केल्या?
Follow Us
Follow Us:

Sonam Wangchuk Demands Accepted: लडाखचे प्रसिद्ध समाजसेवक आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपोषण व आंदोलनाची दखल अखेर केंद्र सरकारने घेतली आहे. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी रुग्णालयात जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान जे. पी. नड्डा यांनी केंद्र सरकारचे अधिकृत आश्वासन पत्र वाचून दाखवले आणि सरकारने स्वीकारलेल्या अटींची माहिती दिली.

शैक्षणिक प्रणालीतील सुधारणा आणि ‘नीट’ (NEET) परीक्षेतील अनियमिततेविरोधात पुकारलेल्या आंदोलनानंतर सरकारने सकारात्मक पाऊल उचलत ३ महत्त्वाच्या अटी पूर्णपणे मान्य केल्या आहेत.

वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतरही CJP चे आंदोलन सुरु

सरकारने मान्य केलेल्या ३ मुख्य अटी

विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होणार नाहीत

२० जुलै रोजी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत संसदेवर मोर्चा काढणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यावर अथवा आंदोलकावर पोलीस गुन्हा दाखल करणार नाहीत, असे स्पष्ट आश्वासन सरकारने दिले आहे.

पेपरफुटी आणि शिक्षण सुधारणांवर संसदेत चर्चा

परीक्षेशी संबंधित ‘पेपरफुटी’चे वाढते प्रकार आणि देशातील शिक्षण प्रणालीत आवश्यक सुधारणा घडवून आणण्यासाठी आगामी संसद अधिवेशनात सविस्तर चर्चा घडवून आणण्यास केंद्र सरकार तयार झाले आहे.

आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना भरपाई

‘नीट’ (NEET) पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे आणि झालेल्या मानसिक तणावामुळे ज्या दुर्दैवी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या पीडित कुटुंबीयांना आर्थिक नुकसानभरपाई देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करेल.केंद्र सरकारच्या या आश्वासनानंतर आणि वरिष्ठ मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आणि मागण्यांना मोठे यश मिळाले असल्याचे मानले जात आहे.

सोनम वांगचुक यांनी सोडले उपोषण! केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची

NEET पेपरफुटी प्रकरणावर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी प्रतिक्रीया दिली आहे. “गेल्या दोन दिवसांपासून सरकारसोबत सातत्याने चर्चा सुरू होती आणि केवळ तोंडी आश्वासनावर उपोषण सोडण्यास आपण तयार नव्हतो. सरकारने प्रमुख मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतरच उपोषण मागे घेतले. आम्हाला ठोस आणि लेखी हमी हवी होती. त्यामुळे चर्चेला दोन दिवस अधिक लागले आणि मला दोन दिवस अतिरिक्त उपोषण करावे लागले. सरकारने आमच्या प्रमुख मागण्या मान्य करत लेखी आश्वासन दिले आहे.”

‘आंदोलनाचे मोठे यश’

उपोषण मागे घेतल्यानंतर वांगचुक यांनी देशभरातून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. “स्वतःचा जीव धोक्यात घालून उपोषण सुरू ठेवण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही तीन ठोस आणि महत्त्वाची आश्वासने मिळवणे हे आंदोलनाचे मोठे यश आहे. तसेच,  सर्व समर्थकांनी शांतता राखावी आणि आंदोलनाच्या नावाखाली कोणताही हिंसाचार होऊ देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ संदेश

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रात्री उशिरा व्हिडिओ संदेश जारी करून पेपरफुटी रोखण्यासाठी आणि दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी नवीन व कडक कायदा आणण्याचा सरकारचा मानस व्यक्त केला. या कायद्याच्या मसुद्यावर गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार असून, मंजुरी मिळाल्यानंतर तो पुढील आठवड्यात संसदेत मांडला जाईल आणि शक्य तितक्या लवकर मंजूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: National news sonam wangchuk ends 26 day hunger strike centre accepts three demands jp nadda jitendra singh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 09:20 AM

Topics:  

  • neet paper leak
  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

Supreme Court of India on NEET Protest: सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश
1

Supreme Court of India on NEET Protest: सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.