वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतरही CJP चे आंदोलन सुरुच राहणार; अभिजित दिपकेंनी म्हटलं आता...
नवी दिल्ली : नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन करण्यात आले. यात सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांपासून उपोषण सुरु ठेवले होते. या काळात अनेक घडामोडी घडल्याचे पाहिला मिळाले. चर्चेनंतर वांगचुक यांनी मध्यरात्री उपोषण मागे घेतले. मात्र, सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतरही कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरुच राहणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा अभिजित दीपके यांनी केली.
कॉक्रोच जनता पक्षाने (सीजेपी) पोलिस अत्याचाराच्या बळींना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. ‘प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक दिवशी एक मागणी’ या घोषणेखाली पक्ष शुक्रवारी (दि.२४) देशव्यापी शांततापूर्ण आंदोलन सुरू करणार आहे. पक्षाने प्रसिद्ध केलेल्या पोस्टरनुसार, या मोहिमेत देशातील प्रत्येक जिल्ह्यातील लोक एकाच दिवशी एकत्र येऊन एकच मागणी मांडतील. देशाच्या विविध भागांतील पोलिस अत्याचाराच्या बळींप्रति एकता दर्शवणे आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवणे, हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे.
Delhi CJP Protest Live : जंतरमंतरवर राडा, इंटरनेट बंद, विद्यार्थी आक्रमक; CJPचा पोलिसांवर गंभीर आरोप
दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीने कार्यकर्त्यांना आणि विद्यार्थी संघटनांना प्रशासनाकडून एकत्रितपणे परवानगी मिळवून कार्यक्रमाची रूपरेषा तयार करण्याचे आवाहन केले आहे.
शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल
अभिजित दीपके यांनी पुढे म्हटले की, ”सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्याने आम्हाला आनंद आणि दिलासा मिळाला आहे. मात्र, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान जोपर्यंत राजीनामा देत नाहीत तोपर्यंत कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन असेच सुरु राहणार आहे. दिल्ली पोलिसांनी जी क्रूरता दाखवली आहे, तिच्याविरोधात आम्ही आवाज उठवणार आहोत. विद्यार्थ्यांचा त्याग आम्ही वाया जावू देणार नाही. त्यामुळे आम्ही प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार आहे”.
सरकारला चर्चा करायची असेल तर जंतरमंतरवर यावं
सरकारला चर्चा करायची असेल, तर त्यांनी जंतर मंतरवर यावे किंवा तटस्थ ठिकाणी चर्चा करावी. आम्ही कोणाच्याही घरी किंवा कार्यालयात जाणार नाही. पंतप्रधानांचे वक्तव्य म्हणजे केवळ एक मलमपट्टी आहे, असे कॉक्रोच जनता पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास दास यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्यावर म्हटले आहे.
Protest Day 34 : जंतरमंतरवरील रात्रीच्या राड्यानंतर आता कशी आहे परिस्थिती? रात्री नेमकं काय घडलं?






